ठाणे : ठाणे जिल्ह्यातील भायंदर परिसरात मराठीत न बोलल्याच्या कारणावरून एका फूड स्टॉल मालकाला मनसैकांनी चोप दिल्याची घटना घडली आहे. ही घटना मंगळवारी (1 जुलै) घडली असून, यासंदर्भातील एक व्हिडिओ रात्री सामाजिक माध्यमांवर व्हायरल झाला.
ADVERTISEMENT
व्हिडिओमध्ये काही लोक फूड स्टॉल चालकाला मारहाण करताना दिसत आहेत. त्यांच्या गळ्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं चिन्ह असलेला गमछा घातलेला दिसतोय.
हे ही वाचा >> विद्यार्थींनीची छेडछाड, पालकांनी शिक्षकाला शाळेच्या मैदानातच चोपलं, मुश्रीफांनी फोन केला आणि म्हणाले...
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका व्यक्तीनं खाद्यपदार्थ खरेदी करताना स्टॉल मालकाला मराठीत बोलण्यास सांगितलं. यावर स्टॉल मालकानं त्याला प्रश्न केला, ज्यामुळे त्या व्यक्तीला राग आला. त्याने स्टॉल मालकावर ओरडण्यास सुरुवात केली. यावेळी त्या व्यक्तीबरोबर असलेल्या इतर काही लोकांनीही स्टॉल मालकाला थोबाडीत मारली.
या घटनेनंतर स्टॉल मालकाच्या तक्रारीवरून कश्मीरी पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांखाली अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, तपास सुरू आहे.
हे ही वाचा >> मुंबई हादरली! अल्पवयीन विद्यार्थ्याला शिक्षिका घेऊन जायची फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये अन्... शिक्षिक विद्यार्थ्याच्या नात्याला काळीमा
दरम्यान, सध्या राज्यभर मनसेचे कार्यकर्ते राज्यातील व्यावसायिक ठिकाणी आणि बँकांमध्ये मराठी भाषेच्या वापरावर जोर देत आहेत. यापूर्वीही मराठी भाषेच्या मुद्द्यावरून एका मॉलमध्ये मनसेच्या कार्यकर्त्यांनी कर्मचाऱ्याशी वाद घालून त्याच्याकडून माफी मागण्यास भाग पाडले होते. या घटनेमुळे मराठी भाषेच्या वापरासंदर्भातील वाद पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
ADVERTISEMENT
