Pehalgam Attack News Update : दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोयबाचा संस्थापक आणि मोस्ट वॉन्टेड दहशतवादी हाफिज सईद सध्या पाकिस्तानात आहे. तिथे आता त्याची सुरक्षा चार पट वाढवण्यात आल्याची माहिती आहे. कालच पाकिस्तानमधील लाहोरमध्ये एका गुप्त ठिकाणी लपलेला असल्याची माहिती समोर आली आहे.
ADVERTISEMENT
हाफिज लाहोरमधील जोहर टाउनमधील 116E या घरामध्ये राहत असल्याची माहिती समोर आली आहे. पाकिस्तानी यंत्रणा ड्रोनने या जागेवर लक्ष ठेवून आहेत. हाफिज लपलेल्या जागेभोवती पाकिस्तानी सैनिक तैनात करण्यात आले आहेत. त्या ठिकाणाच्या चार किलोमीटरचा रस्ता पूर्णपणे सीसीटीव्हीने सुसज्ज करण्यात आला आहे.
हे ही वाचा >> Maharashtra Day: मुंबईकरांनो 'अशी' बनलेली 'आपली मुंबई' महाराष्ट्राची राजधानी, ही कहाणी तुम्हालाही नसेल माहीत!
पहलगाम हल्ल्यानंतर, पाकिस्तानी सैन्य, आयएसआय आणि लष्करने हाफिज सईदला अतिरिक्त सुरक्षा कवच दिलं आहे. पाकिस्तानी सैन्य त्याच्या जवळच्या नातेवाईकांना आणि खास लोकांनाही सुरक्षा पुरवतंय. पाकिस्तानी सैन्याने त्यांना घराबाहेर न जाण्याचे कडक निर्देश दिले आहेत.
यापूर्वी, हाफिज दाट लोकवस्ती असलेल्या लाहोरमध्ये त्याच्या कुटुंबासह आरामात राहत असल्याची माहिती समोर आली होती. उपग्रह छायाचित्र आणि व्हिडिओंवरून हाफिज सईदचं घर लाहोरमध्ये असल्याची माहिती मिळाी. या छायाचित्रांमध्ये हाफिजचे घर स्पष्टपणे दिसत आहे.
हाफिजच्या सुरक्षेचे सध्या तीन कवच आहेत. तसंच, त्याची वैयक्तिक सुरक्षा देखील चोवीस तास सतर्क असते. अहवालानुसार, हाफिज सईदच्या लपण्याच्या गुप्त ठिकाणाचे फोटो आणि व्हिडिओ समोर आले आहेत. हाफिज त्याच्या कुटुंबासह एका इमारतीत राहतो हे समोर आलंय. हाफिजचं खाजगी पार्क देखील त्याच्या अगदी समोर आहे.
हे ही वाचा >> महाराष्ट्र दिन विशेष: जय जय महाराष्ट्र माझा... हे गाणं कोणी लिहिलेलं, काय आहे नेमका इतिहास?
लष्कर-ए-तोयबाचा संस्थापक हाफिज सईद 2008 च्या मुंबई हल्ल्याचा सूत्रधार मानला जातो. संयुक्त राष्ट्रांनी त्याला जागतिक दहशतवादी घोषित केलं आहे. 'लष्कर'चं मुख्यालय पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील मुरीदके इथे असल्याचं सांगितलं जातं. पाकिस्तानविरुद्धच्या लष्करी कारवाईत भारत त्यावर हल्ला करू शकतो.
हाफिज आणि लष्कर हे भारतासाठी सर्वात मोठा धोका आहेत. काश्मीर आणि इतर भागांमध्ये दहशतवादी कारवायांना प्रोत्साहन देण्याचं काम ते करतायत. गेल्या महिन्यात हाफिज सईदचा जवळचा सहकारी अबू कतालच्या हत्येनंतर पाकिस्तान सरकारने त्याची सुरक्षा कडक केली होती. आयएसआयने सईदच्या सुरक्षेचा आढावा घेतला होता आणि त्याचे निवासस्थान तुरुंगात रूपांतरित केले होते.
22 एप्रिल रोजी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला होता. यामध्ये 26 लोक ठार झाले होते, तर 16 लोक जखमी झाले होते. या हल्ल्यापासून भारत आणि पाकिस्तानमध्ये चांगलाच तणाव वाढला आहे.
ADVERTISEMENT
