'काँग्रेस ही अजरामर म्हातारी, ती कधीच मरणार...' चव्हाणांच्या राजीनाम्यावर राऊतांची प्रतिक्रिया 

मुंबई तक

12 Feb 2024 (अपडेटेड: 12 Feb 2024, 08:26 PM)

काँग्रेसला सोडून अनेक जणांनी भाजपचे कमळ हातात घेतले आहे, त्यावर बोलताना खासदार संजय राऊत यांनी सांगितले की, 'आज जे नेते काँग्रेसला सोडून जात आहेत, ते आणि त्यांचे घराणे हे काँग्रेसने मोठी केली आहेत, त्यामुळे काँग्रेस सोडणं म्हणजे मुलाने आईला नाकारण्यासारखे आहे' असं मतं खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले.

shiv sena congress

Ashok chavan Sanjay Raut

follow google news

Ashok Chavan : लोकसभा निवडणुका (Lok sabha) तोंडावर असतानाच काँग्रेसला (Congress) आज मोठी धक्का बसला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Former MLA Ashok Chavan) यांनी आमदारकीचा राजीनामा देत काँग्रेस सदस्यत्वाचाही त्यांनी राजीनामा दिला आहे. त्यामुळे राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. यावर बोलताना खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी अशोक चव्हाणांच्या राजीनाम्यावर खोचक प्रतिक्रिया देत नेत्यांनी काँग्रेस सोडली तरी काँग्रेस संपणार नसल्याचे सांगितले आहे. 

हे वाचलं का?

आदर्श घोटाळा पवित्र 

खासदार संजय राऊत यांनी त्यांच्या राजीनाम्यावर बोलताना सांगितले की, 'महाविकास आघाडीच्या बैठकीत अशोक चव्हाण सहभागी झाले होते. त्यावेळी त्यांनी जागांबाबत चर्चाही केली होती. मात्र त्यांनी जर राजीनामा देऊन ते भाजपमध्ये जात असतील तर भाजपाला आदर्श घोटाळा पवित्र करुन घ्यायचा असल्याचा टोला त्यांनी भाजपला लगावला आहे.'

भाजपनं जंग जंग पछाडले

माजी मुख्यमंत्री असलेले अशोक चव्हाण आणि त्यांच्या कुटुंबाला काँग्रेसनेच मोठे केले आहे. नेते म्हणून ते आज मोठे असले तरी त्यांना ते काँग्रेसमुळेच मिळाले आहे. भाजपने त्यांना तुरुंगात टाकण्यासाठी अनेक प्रयत्न केले आहेत. त्यामुळे आता भाजप त्यांच्या आदर्श घोटाळ्याला पवित्र करून घेण्यासाठीच त्यांना भाजप प्रवेश देत असतील अशी खोचक प्रतिक्रियाही त्यांनी त्यांना दिली आहे. 

हे ही वाचा >> 'मी पण पक्षाला बरंच काही', असं का म्हणाले अशोक चव्हाण?

मुलाने आईला नाकारण्यासारखे

खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, 'शंकरराव चव्हाण यांचे पुत्र जर काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत असतील तर हे मुलाने आईला नाकारण्यासारखे होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी हे ही विचारण्यात आले होते की, 'काँग्रेस पक्ष फोडण्यात येईल का? त्यावर बोलताना त्यांनी सांगितले की, काँग्रेस ही अजरामर म्हातारी आहे ती कधीच मरणार नसल्याचेही त्यांनी विश्वासाने सांगितले.'

भूमिका स्पष्ट नाही

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आपल्या राजीनाम्याविषयी आणि पुढील राजकीय वाटचालीविषयी स्पष्ट भूमिका व्यक्त केली नाही. यावेळी त्यांनी राजीनामा दिला असून अजून पुढील राजकीय भूमिका स्पष्ट नसल्याचेही त्यांनी सांगितले.

    follow whatsapp