नांदेड वाघाळा शहर महापालिका माहिती, अंतिम निकाल आणि इतिहास, 2025-26 मध्ये कोणाची हवा?

Nanded Muncipal Corporation : काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी नांदेड वाघाळ महापालिकेत एकहाती सत्ता स्थापन करत भाजपचा सुपडासाफ केला. काँग्रेसनं 81 पैकी तब्बल 73 जागा पटकावून मोठा विजय मिळवला होता. अशातच 2025-26 मध्ये या महापालिकेवर कोण बाजी मारणार हे पाहणं गरजेचं आहे.

Nanded Muncipal Corporation

Nanded Muncipal Corporation

मुंबई तक

14 Jan 2026 (अपडेटेड: 14 Jan 2026, 09:41 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

नांदेड वाघाळा महापालिका अंतिम निकाल 2017

point

नांदेड वाघाळा महापालिका इतिहास

Nanded Muncipal Corporation : नांदेड शहराचे काम हे नांदेड वाघाळा शहर महापालिकेच्या माध्यमातून चालते. या महापालिकेची स्थापना ही 26 मार्च 1997 रोजी झाली होती. यात नांदेड नगरपालिका आणि वाघाळा नगरपालिका यांचे विलीनकरण करण्यात आले होते. ती बॉम्बे प्रांतीय महानगरपालिका अधिनियम, 1949 अंतर्गत कार्यरत असल्याची माहिती आहे.

हे वाचलं का?

हे ही वाचा : मुंबईत EVM बंद पडल्यास PADU वापरणार, विरोधकांचा संताप

नांदेड महापालिका जेव्हा अस्तीत्वात होती तेव्हा तिचे पहिले नगराध्यक्ष हे शंकरराव चव्हाण होते. तर पहिले महापौर म्हणून शिवसेनेचे सुधाकर पांढरे यांनी धुरा सांभाळली होती. अशातच याच महापालिकेच्या अंतिम निकालाबाबत पुढीलप्रमाणे माहिती नमूद करण्यात आली आहे.

नांदेड महापालिकेच्या अंतिम निवडणुकीत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी निर्विवाद वर्चस्व गाजवलं होतं. तत्कालीन काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी नांदेड वाघाळ महापालिकेत एकहाती सत्ता स्थापन करत भाजपचा सुपडासाफ केला. काँग्रेसनं 81 पैकी तब्बल 73 जागा पटकावून मोठा विजय मिळवला होता.

नांदेड वाघाळा महापालिका अंतिम निकाल 2017

काँग्रेस - 73

भाजप - 06

एमआयएम - 00

शिवसेना - 01

अपक्ष/इतर - 01

हे ही वाचा : तरुणाने अंघोळ करणाऱ्या महिलेचे अश्लील व्हिडिओ केले रेकॉर्ड, नंतर ब्लॅकमेल करत केली 'ती' मागणी, पीडितेनं छतावरून उडी मारत..

सर्वात महत्वाची बाब म्हणजे नांदेड महापालिका निवडणूक 2017 मध्ये पहिला महापौर सुधाकर पांढरे यांची मुलगी स्नेहा पांढरे यांचा परभव झाला होता. 2017 मधील नांदेड महापालिकेचं चित्र हे जरा वेगळं होतं. तर सध्याचं चित्र हे वेगळं आहे. कारण सध्या तत्कालीन काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानं 2025-26 मधील निकाल कसा असेल याबाबतची माहिती लवकरच समोर येईल.

    follow whatsapp