मुंबईत EVM बंद पडल्यास PADU वापरणार, विरोधकांचा संताप

अतिक शेख

BMC election 2025 padu machine : मुंबई महानगरपालिकेसाठी पुढच्या काही तासांमध्ये मतदान सुरू होणारय. परंतु त्यापूर्वीच मतदान प्रक्रियेत पाडू नवं यंत्र वापरण्यावरून वाद सुरू झालाय. महापालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांनी कंट्रोल युनिटमध्ये बिघाड झाल्यास पाडू म्हणजेच प्रिंटिंग अॅक्सेलरी डिस्प्ले युनिट हे नवीन मशीन वापरलं जाणार असल्याची घोषणा केली. आता यावरच मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आक्षेप घेत निवडणूक आयोगावर आरोप केलेत.

ADVERTISEMENT

BMC election 2025
BMC election 2025
social share
google news

बातम्या हायलाइट

point

पाडू मशीन म्हणजे नेमकं काय आहे? 

point

पाडू मशीनवरून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंचा आक्षेप

BMC Election 2025 padu Machine : मुंबई महानगरपालिकेसाठी पुढच्या काही तासांमध्ये मतदान सुरू होणारय. परंतु त्यापूर्वीच मतदान प्रक्रियेत पाडू नवं यंत्र वापरण्यावरून वाद सुरू झालाय. महापालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांनी कंट्रोल युनिटमध्ये बिघाड झाल्यास पाडू म्हणजेच प्रिंटिंग अॅक्सेलरी डिस्प्ले युनिट हे नवीन मशीन वापरलं जाणार असल्याची घोषणा केली. आता यावरच मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आक्षेप घेत निवडणूक आयोगावर आरोप केलेत. दुसरीकडे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने पाडू मशीनचा वापर रोखण्यात यावा, या मागणीसाठी निवडणूक आयोगाला पत्र लिहिलंय. त्यामुळे आता पाडू नावाचं मशीन नेमकं काय आहे? त्याचा वापर कसा केला जातो? तसेच राज ठाकरेंचे नव्या मशीनवर आक्षेप नेमके काय आहे? आणि ठाकरेंच्या आरोपांना भाजपने काय उत्तर दिलं? या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घ्यायचीत.

पाडू मशीन म्हणजे नेमकं काय आहे? 

पाडू म्हणजे प्रिंटिंग अॅक्सेलरी डिस्प्ले युनिट, हे छोटं अतिरिक्त यंत्र आहे जे कंट्रोल युनिटला जोडलं जाईल. ज्यामुळे मतदारांना मतदान प्रक्रियेची अधिक आणि स्पष्ट माहिती मिळेल, असा पालिका आयुक्तांचा दावा आहे. मतदान सुरू असताना जर कंट्रोल युनिटमध्ये बिघाड झाला त्याचवेळी पाडू मशीन वापरलं जाणारय. कंट्रोल युनिटचा डिस्प्ले खराब झाला तर  PADU संबंधित माहिती डिस्प्ले करेल, परंतु VVPT मशीनमध्ये जशी पावती दिसते, तशी पावती पाडू मशीनमध्ये दिसणार नाहीये. म्हणजे एकप्रकारे तांत्रिक बिघाडावेळी बॅकअप मशीन म्हणून पाडूचा वापर केला जावू शकतो. PADU मशीन मतदान केंद्रातील रिटर्निंग ऑफिसरकडे असेल, परंतु ते संपूर्ण मुंबईत सरसकट वापरलं जाणार नाहीये. केवळ अपवादात्मक स्थितीत PADU मशीन वापरलं जाणार असल्याची माहिती देण्यात आलीय.

12 जानेवारी रोजी महापालिका आयुक्तांनी निवडणूक प्रक्रियेत पाडू मशीनचा वापर केला जाईल असं स्पष्ट केलं, त्याची माहिती देताना त्यांनी पाडू मशीनविषयीची माहिती दिली आहे. पाडू मशीन कसं काम करतं, ते कुठे-कुठे वापरलं जाईल? याची माहिती देखील त्यांनी 12 जानेवारीला दिली होती.

पाडू मशीनवरून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंचा आक्षेप

पाडू मशीन वापरलं जाणार होतं, तर त्याची माहिती राजकीय पक्षांना आधी का दिली गेली नाही? असा सवाल विरोधी पक्ष करताहेत. हे मशीन आम्हाला का दाखवलं गेलं नाही? असं म्हणत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी पाडू मशीनच्या वापरावर आक्षेप नोंदवला आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी आरोप केल्यानंतर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पालिका आयुक्त आणि निवडणूक आयोगाचा बचाव केलाय. बावनकुळेंनी ठाकरे बंधूंवर जोरदार टीका करत त्यांचे आरोप खोडून काढलेत. 

हे वाचलं का?

    follow whatsapp