PM नरेंद्र मोदींनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं केलं तोंडभरून कौतुक, अर्थ काय?

भागवत हिरेकर

23 Jul 2023 (अपडेटेड: 23 Jul 2023, 07:04 AM)

भाजप-शिवसेना युती सरकारमध्ये अजित पवार गट सामील झाला. अजित पवार उपमुख्यमंत्री झाले, पण ते लवकरच मुख्यमंत्री होणार आहेत, ही चर्चा सातत्याने सुरू आहे.

mumbaitak

mumbaitak

follow google news

Narendra Modi meet Eknath Shinde : अजित पवार लवकरच राज्याचे मुख्यमंत्री होणार आहेत, अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. अलिकडेच भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर्सही झळकले. अशातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सहकुटुंब पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. दिल्लीतील या भेटीनंतर पंतप्रधान मोदींनी शिंदेंचं तोंडभरून कौतुक केलं आहे. राज्यात सुरू असलेल्या वेगवेगळ्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर मोदींनी केलेल्या कौतुकाचा अर्थ काय, हेच समजून घेणं महत्त्वाचं आहे. (Prime Minister Narendra Modi praised chief Minister Of Maharashtra Eknath Shinde)

हे वाचलं का?

भाजप-शिवसेना युती सरकारमध्ये अजित पवार गट सामील झाला. अजित पवार उपमुख्यमंत्री झाले, पण ते लवकरच मुख्यमंत्री होणार आहेत, ही चर्चा सातत्याने सुरू आहे. एकनाथ शिंदेंसह 16 आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार असून, त्यामुळेच या चर्चेला हवा मिळताना दिसत आहे.

एकनाथ शिंदेंनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट

राज्यात मुख्यमंत्री बदलाच्या चर्चा सुरू असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची दिल्लीत सहकुटुंब भेट घेतली. या भेटीनंतर मुख्यमंत्री शिंदेंनी पंतप्रधान मोदींचे आभार मानले.

वाचा >> ‘आम्हाला चक्की पिसायला जायचं नाही म्हणून मोदी हवेत’, राऊतांनी सांगितला किस्सा

“देशाचे पंतप्रधान म्हणून कणखर आणि सक्षम असलेल्या नरेंद्र मोदीजी यांनी माझे वडील, पत्नी, मुलगा खासदार श्रीकांत शिंदे, सून आणि नातू यांच्यासह मला सदिच्छा भेटीला बोलावून आपलेपणाने विचारपूस केली. माझ्या कुटुंबाशी निवांत गप्पा मारल्या. त्यांच्या व्यस्त कार्यक्रमातून आमच्यासाठी वेळ काढला. गेले वर्षभर केंद्र सरकारचे भक्कम पाठबळ राज्य सरकारला मिळत आहे. ते सहकार्य यापुढेही कायम मिळो, ही मागणी मान्य करत पंतप्रधानांनी आश्वस्तही केले. पंतप्रधानांची आपुलकी, आशीर्वादाचा हात आणि आस्था नवे बळ देणारी आहे”, असं मुख्यमंत्री शिंदे या भेटीनंतर म्हणाले.

पंतप्रधान मोदी मुख्यमंत्री शिंदेंबद्दल काय म्हणाले?

“महाराष्ट्राचे गतिशील आणि कष्टाळू मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी यांना आणि त्यांच्या कुटुंबाला भेटून आनंद झाला. महाराष्ट्राच्या प्रगतीसाठीची त्यांची तळमळ आणि विनम्र स्वभाव कौतुकास्पद आहे”, अशा शब्दात पंतप्रधान मोदींनी कौतुक केलंय.

मुख्यमंत्री बदलाच्या चर्चा, मोदींचं ट्विट

अजित पवार यांनी त्यांच्या मुख्यमंत्री होण्याच्या महत्त्वाकांक्षा वारंवार बोलून दाखवल्या आहेत. ते उपमुख्यमंत्री झाल्यापासून लवकरच मुख्यमंत्री होणार असल्याचे दावे विरोधकांकडून आणि राजकीय वर्तुळातील नेत्यांकडून केले जात आहे. भाजपकडून मात्र, हे दावे फेटाळून लावले जात आहेत. शिवसेनेकडून मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदेंचं राहणार असे दावा केला जात आहे.

वाचा >> Irshalwadi Landslide : 6 महिन्यांच्या चिमुकलीसह 27 जणांची दुर्दैवी मृत्यू,अखेर मृतांची नावं आली समोर

अशात पंतप्रधान मोदींनी केलेल्या कौतुकाचा अर्थ एकनाथ शिंदेंच मुख्यमंत्री पदी राहणार असा लावला जात आहे. गेल्या आठवड्यात झालेल्या बैठकीतच पंतप्रधान मोदींनी शिवसेना फुटीवर भाष्य करताना बाळासाहेब ठाकरेंचे वैचारिक वारसदार आपल्यासोबत असल्याचं विधान केलं होतं.

काही दिवसांपूर्वी खातेवाटपावरून बराच खल झाला. अजित पवार यांना अर्थ व नियोजन खाते देण्यास एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा विरोध होता. मात्र, हे खातं अजित पवारांकडेच आलं. खातेवाटपासंदर्भात दिल्लीतही बरीच खलंबतं झाली. याच काळात भाजपच्या पक्षश्रेष्ठीने शिवसेनेला अर्थ खाते अजित पवारांना द्या, नाहीतर मुख्यमंत्री पद सोडा, असं सांगितल्याचं बोललं गेलं. याला भाजपकडून दुजोरा दिला गेला नाही.

    follow whatsapp