दिवगंत मनसे नेते रमेश वांजळेंची कन्या पुणे मनपा निवडणुकीतील दुसऱ्या क्रमांकाची श्रीमंत उमेदवार, संपत्ती किती?

Pune Mahanagar Palika Election 2026 : दिवंगत आमदार रमेश वांजळे यांच्या कन्या सायली वांजळे यांचं नाव आहे. सायली वांजळे यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांच्या नावावर एकूण 77.65 कोटी रुपयांची मालमत्ता आहे.

Pune Mahanagar Palika Election 2026 (5)

Pune Mahanagar Palika Election 2026 (5)

मुंबई तक

03 Jan 2026 (अपडेटेड: 03 Jan 2026, 10:04 AM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

दिवगंत मनसे नेते रमेश वांजळेंची कन्या पुणे मनपा निवडणुकीतील दुसऱ्या क्रमांकाची श्रीमंत उमेदवार

point

पुणे मनपा निवडणुकीतील सर्वांत श्रीमंत उमेदवार कोण?

Pune Mahanagar Palika Election 2026 : पुणे महानगरपालिकेच्या निवडणूक रिंगणात असलेल्या उमेदवारांच्या संपत्तीचे तपशील समोर आले आहेत. दिवंगत मनसे नेते आणि माजी आमदार रमेश वांजळे यांच्या कन्या सायली वांजळे या पुणे मनपा निवडणुकीतील दुसऱ्या क्रमांकाच्या श्रीमंत उमेदवार ठरल्या आहेत. निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार सायली वांजळे यांच्या नावावर मोठ्या प्रमाणात संपत्ती असून, त्यामुळे त्यांची विशेष चर्चा होत आहे.

हे वाचलं का?

दरम्यान, या यादीत दुसऱ्या क्रमांकावर खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे दिवंगत आमदार रमेश वांजळे यांच्या कन्या सायली वांजळे यांचं नाव आहे. सायली वांजळे यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांच्या नावावर एकूण 77.65 कोटी रुपयांची मालमत्ता आहे. त्यामुळे त्या पुणे मनपा निवडणुकीतील दुसऱ्या क्रमांकाच्या श्रीमंत उमेदवार ठरल्या आहेत. सायली वांजळे यांच्या संपत्तीत विविध स्थावर आणि जंगम मालमत्तेचा समावेश असून, यामध्ये रिअल इस्टेटमधील गुंतवणूक, बँक ठेवी तसेच इतर आर्थिक साधनांचा समावेश असल्याची माहिती आहे. त्यांच्या प्रतिज्ञापत्रात नमूद केलेल्या आकड्यांमुळे निवडणूक रिंगणात उमेदवारांच्या आर्थिक पार्श्वभूमीवर चर्चा सुरू झाली आहे.

हेही वाचा : कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या निवडणुकीपूर्वी महायुतीच्या विजयाचा मार्ग मोकळा? 'एवढे' उमेदवार बिनविरोध विजयी

या निवडणुकीत सर्वाधिक संपत्ती असलेले उमेदवार म्हणून भाजपचे सुरेंद्र पठारे पुढे आले आहेत. सुरेंद्र पठारे यांनी निवडणूक आयोगाकडे दिलेल्या प्रतिज्ञापत्रात स्वतःची एकूण मालमत्ता 271.85 कोटी रुपये असल्याचं नमूद केलं आहे. पुणे महापालिकेच्या निवडणुकीत सहभागी झालेल्या उमेदवारांमध्ये ही सर्वात जास्त संपत्ती मानली जात आहे. प्रतिज्ञापत्रातील माहितीनुसार, सुरेंद्र पठारे यांची गुंतवणूक प्रामुख्याने रिअल इस्टेट क्षेत्रात आहे. त्यांच्याकडे मर्सिडिज बेंझ, बीएमडब्ल्यू आणि इनोव्हा क्रिस्टा यांसारख्या आलिशान वाहनांचा समावेश आहे. याशिवाय, त्यांच्या नावावर सुमारे 1.75 किलो सोन्याचे दागिने असल्याची नोंद करण्यात आली आहे. संपत्तीच्या बाबतीत ते इतर सर्व उमेदवारांपेक्षा आघाडीवर असल्याचं स्पष्ट होत आहे.

पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत उमेदवारांच्या संपत्तीचे तपशील समोर येत असताना, मतदारांमध्येही या बाबींबाबत उत्सुकता दिसून येत आहे. एकीकडे सुरेंद्र पठारे यांची कोट्यवधींची संपत्ती, तर दुसरीकडे सायली वांजळे यांची मोठ्या प्रमाणातील मालमत्ता, यामुळे या निवडणुकीत आर्थिक ताकदीचीही चर्चा रंगताना दिसत आहे. आगामी काळात इतर उमेदवारांच्या प्रतिज्ञापत्रांमधून आणखी माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या

मुंबई Tak महाचावडी: मराठी माणूस ते मुंबईचा महापौर... मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा प्रत्येक शब्द जसाच्या तसा..

    follow whatsapp