'राहुलला गोळ्या घालून मारलं पाहिजे... ठेचा आणि गाडा', उदयनराजे प्रचंड भडकले

अभिनेता राहुल सोलापूरकर याने केलेल्या वादग्रस्त विधानावर आता खासदार उदयनराजे भोसले हे प्रचंड संतापले आहेत. पाहा त्यांनी नेमकी काय टीका केली.

 उदयनराजे प्रचंड संतापले

उदयनराजे प्रचंड संतापले

मुंबई तक

• 07:30 PM • 05 Feb 2025

follow google news

सातारा: अभिनेता राहुल सोलापूरकर याने छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत एक अत्यंत वादग्रस्त विधान केलं आहे. ज्यावरून आता भाजप खासदार आणि छत्रपतींचे वंशज उदयनराजे भोसले यांनी प्रचंड संताप व्यक्त केला आहे. अशी विधानं करणाऱ्याला गोळ्या घालून मारलं पाहिजे, जिथे दिसेल तिथे ठेचा आणि गाडा..' असं म्हणत उदयनराजेंनी सोलापूरकरवर जोरदार टीका केली. 

हे वाचलं का?

साताऱ्यात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना उदयनराजेंनी राहुल सोलापूरकरचा खरपूस शब्दात समाचार घेतला. 

पाहा राहुल सोलापूरकरच्या वादग्रस्त विधानावर उदयनराजे नेमकं काय म्हणाले

'या जगाच्या पाठीवर एकमेव राजा, एकमेव महापुरूष होऊन गेला की, त्याने त्या काळात संपूर्ण जे विचार दिले. त्या विचाराच्या आधारावर केवळ आपला देश नाही तर इतरही अनेक देश चालले आहेत. सर्वधर्माच्या भूमिकेतून प्रत्येक जाती-धर्माच्या लोकांना एकत्र केलं. एकता हा त्यामागचा मूळ मंत्र होता.' 

हे ही वाचा>> राहुल सोलापूरकरची दिलगिरी पण म्हणाला, 'लाचखोर मंडळी औरंगजेबाची होती एवढं मात्र...'

'महाराजांनी ज्यांनी कधीही स्वत:चा स्वार्थ पाहिला नाही. देशाताील सर्व लोकांना वेगवेगळ्या लोकांना आपलं कुटुंब समजलं. शिवाजी महाराजांनी तत्वाशी कधी त्यांनी तडजोड केली नाही. असं असताना त्यांच्याबद्दल गलिच्छ विधानं केली जातात. केवळ मलाच नाही तर संपूर्ण शिवभक्तांना वेदना होतात की, का त्यांनी असं विधान केलं?' 

'हा राहुल सोलापूरकर कोण आहे? तो जो म्हणाला लाच.. मला असं वाटतं जे लोकं लाच घेतात त्यांना लाच पलीकडे काही समजत नाही. असं बोलताना.. जीभेला हाड नसतं हे मला माहीत आहे. पण लावली जीभ टाळ्याला.. आणि काही पण बोलायचं. अशा लोकांची जीभ हासडलीच पाहिजे.' 

'जे-जे महापुरुषांबाबत अशी विधानं करतात. ते कोणी असू दे... त्या सगळ्यांना जनतेने ठेचून काढलं पाहिजे. दिसेल तिथे ठेचलं पाहिजे, वेचून ठेचलं पाहिजे. कारण ही जी विकृती.. या विकृतीची वाढ झाली तर तुम्हाला सांगतो की, या देशाच्या अखंडतेला धोका निर्माण होणार आहे.' 

'वेगवेगळ्या जातीधर्मात तेढ निर्माण केले जातात. या अशा विकृत लोकांमुळे.. या अगोदर सुद्धा राज्य आणि केंद्र शासनाकडे.. मी अमित शाह आणि देवेंद्र फडणीस यांना भेटणार आहे आणि कडक कारवाईची मागणी करणार आहे.'

हे ही वाचा>> 'शिवाजी महाराज चक्क लाच देऊन आग्र्यावरून सुटलेले', राहुल सोलापूरकरचं 'ते' वादग्रस्त विधान जसंच्या तसं..

'अशा लोकांना यापुढे.. त्यांचे चित्रपट कुठलेही असतील किंवा जिथे अभिनय करत असतील ते हाणून पाडले पाहिजे. अशा लोकांना थारा दिला नाही पाहिजे. त्यांना गाडलं पाहिजे.' 

'खरं तर मला जर विचारलं.. मला असं वाटतं की, त्याला गोळ्या घालून मारलं पाहिजे. त्यालाच नाही असे जे-जे लोकं असतील ना त्या सगळ्यांना. कोणी पण बेताल वक्तव्य करायचं..' 

'ज्या व्यक्तीने संपूर्ण आयुष्य परकीय आक्रमणाला विरोध करताना जीवाची पर्वा केली नाही. पण अशा लोकांबद्दल अशी वक्तव्य होत असतील तर याला दुसरा काही पर्याय नाही. फार बोलण्यापेक्षा मी एवढंच बोलेन की, तो जिथे दिसेल या सगळ्यांना ठेचा आणि गाडा..' 

'एकमेव शिवाजी महाराज आहेत की, ज्यांची प्रतिमा आपण देव्हाऱ्यात ठेवून पूजा करतो.' 

'कोणत्याही क्षेत्रात काम करणारे असो.. पण शिवाजी महाराजांबाबत असं विधान करणाऱ्यांना ठेचून गाडलं पाहिजे. ही चूक नाही तर घोडचूक आहे. त्याला माफी असूच शकत नाही.' 

'जर राहुल्याचा विचार केला तर त्याचं म्हणणं असं असणार की, महाराजांना लाच दिली म्हणून ते भेटीला गेले असं म्हणेल. पण तसं नाही. ते महाराजांच्या शौर्याचं प्रतिक आहे. लाच घेणाऱ्यांपैकी महाराज नव्हते.' असं म्हणत उदयनराजेंनी राहुल सोलापूरकरवर टीका केली.

 

    follow whatsapp