'शिवाजी महाराज चक्क लाच देऊन आग्र्यावरून सुटलेले', राहुल सोलापूरकरचं 'ते' वादग्रस्त विधान जसंच्या तसं..
'शिवाजी महाराज आग्र्यावरून सुटले त्यात मिठाईचे पेठारे वैगरे काही नव्हते. चक्क लाच देऊन आलेत महाराज.. असं वादग्रस्त विधान अभिनेता राहुल सोलापूरकर याने केलं आहे.
ADVERTISEMENT

मुंबई: 'शिवाजी महाराज आग्र्यावरून सुटले त्यात मिठाईचे पेठारे वैगरे काही नव्हते. चक्क लाच देऊन आलेत महाराज.. त्यासाठी किती हुंडा वटवलाय ते सुद्धा पुरावे आहेत.' असं वादग्रस्त विधान अभिनेते राहुल सोलापूरकरने केलं आहे. ज्यानंतर त्याच्यावर सर्वच स्तरातून टीका होत आहे.
पाहा राहुल सोलापूरकरचं विधान जसंच्या तसं...
'आपल्याकडे दुर्दैवाने फक्त गोष्टींमध्ये अडकलेले आहोत.. शिवनेरीचा जन्म, मग काय नंतर पुण्याला आले.. गोष्टी रुपातच.. हे खरं नाहीच..'
'गमंत म्हणून सांगतो आता.. महाराजांच्या शिस्तीचं मोठेपण म्हणून रचलेली स्टोरी की, गडाचे दरवाजे सूर्यास्ताला बंद व्हायचे. यामधून ती निर्माण ती कथा आहे की, जिने गडावरून उडी मारलेली.. हिरकणी घडलेलीच नाही. असा काही नाहीए. मी रायगडावर फिल्म केली आहे. असं काही नाहीए. असा इतिहासच नाही. पण लिहिलं गेलं.'
'किंवा महाराज आग्र्यावरून सुटले मिठाईचे पेठारे वैगरे काही नव्हते. चक्क लाच देऊन आलेत महाराज.. त्यासाठी किती हुंडा वटवलाय ते सुद्धा पुरावे आहेत. अगदी औरंगजेबाच्या वजीराला आणि त्याच्या बायकोला सुद्धा लाच दिलीए महाराजांनी. मोहसीन खान की मोमीन खान नाव आहे त्याचं बहुतेक... त्याच्याकडून अधिकृत शिक्क्याचे परवान्याने घेऊन सगळे बाहेर पडले आहेत.'










