पोलिसांचा ड्रग्जप्रकरणी 'तो' व्हिडिओ, राज ठाकरेंनी धरलं धारेवर

मुंबई तक

23 Jul 2026 (अपडेटेड: 23 Jul 2026, 02:01 PM)

Raj Thackeray : "माझ्याकडे नुकताच एक व्हिडिओ आलेला आहे, एका पोलिसांच्या गाडीत मुले होती, त्या मुलांना पोलीस म्हणतात की, जर या परिसरात दिसलात तर खिसात तुमच्या 50 ग्रॅमची पाऊडर टाकेन. आता पाऊडर पण मिळायला लागली का? हा पोलीस कोण ड्रग्स सप्लायर्स आहे का? हे काय सुरूये मला कळत नाहीये, असं म्हणत त्यांनी पोलिसांच्या कामावर प्रश्न उपस्थित केला आहे.

Raj Thackeray

Raj Thackeray

Google CTA

बातम्या हायलाइट

point

नेमकं काय म्हणाले राज ठाकरे? 

point

उद्धव ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल 

Raj Thackeray : "माझ्याकडे नुकताच एक व्हिडिओ आलेला आहे, एका पोलिसांच्या गाडीत मुले होती, त्या मुलांना पोलीस म्हणतात की, जर या परिसरात दिसलात तर तुमच्या खिशात 50 ग्रॅमची पाऊडर टाकेन. आता पाऊडर पण मिळायला लागली का? हा पोलीस कोण ड्रग्स सप्लायर आहे का? हे काय सुरूये मला कळत नाहीये. पेपरफुटीप्रकरणात कोण आहेत, त्यांना अटक करावी. हे होणार नाही, याची शाश्वती द्यावी. हे प्रकरण इथवरं आलंच नसतं," असं म्हणत राज ठाकरे यांनी  आज 23 जुलै 2026 रोजी मुंबईत पत्रकार परिषद घेत पोलीस यंत्रणेसह सत्ताधाऱ्यांवर टिकेची तोफ डागली.  

हे वाचलं का?

हे ही वाचा : विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जवरून ठाकरे बंधू आक्रमक; 26 जुलैला मुंबईत भव्य मोर्चाची घोषणा!

नेमकं काय म्हणाले राज ठाकरे? 

"गेली काही दिवसांपासून विद्यार्थ्यांचं दिल्लीत आंदोलन सुरू आहे, तेच आंदोलन चिरडलं जाण्याचा प्रयत्न केला जात आहे. ज्या पद्धतीने मुलांना-मुलींना मारहाण केली जाते, याचेच पडसाद आता देशभरात उमटू लागल्याचं चिन्ह आहे. महाराष्ट्रासह मुंबईत देखील पडसाद उमटू लागले होते. जेव्हा रझा अकादमीच्या वेळी आम्ही मोर्चा काढला होता, तेव्हा आम्ही मुंबई पोलीस कमिश्नर यांचा राजीनामा मागितला होता, तेव्हा त्यांनी काँग्रेस सरकारच्या काळात राजीनामा दिला", असं राज ठाकरे म्हणाले 

पुढे ते म्हणाले की, "जेव्हा मुंबईवर बॉम्बस्फोट झाला होता, तेव्हा आर.आर. आबा हे गृहमंत्री होते, ते म्हणाले की, बडे बडे शहरो मे छोटी छोटी बाते होती रहती है! त्या वाक्यावरून त्यांना गृहमंत्रीपदावरून टाकलं जातं. जेव्हा तुम्ही ज्या पदावर असता, त्या पदातून तुम्हाला अपयश आलेलं असतं, त्याची जबाबदारी तुम्ही घेतली पाहिजे हीच मागणी या मुलांची आहे", असं ते म्हणाले. 

'तीन वेळा पेपरफुटी'

"पहिल्यांदा नीटचे पेपर फुटलेत असं नाही, तीन वेळा पेपरफुटी झालेली आहे. आम्हीच सांगितलं की, केंद्रीय पद्धतीनुसार अशा परीक्षा घेऊ नका. सत्ताच एवढं होती की, त्यांची तेव्हाही ऐकायची नव्हती आणि आजही नाही. मागणी धर्मेंद्र प्रधानांचा राजीनाम्याची होती, मात्र आता ती मागणी तेवढीच राहिली नाही, पंतप्रधानांपर्यंत पोहोचली आहे. आज पंतप्रधान यांनी ट्विट केलंय, त्या ट्विटला काही एक अर्थ उरलेला नाही", असं म्हणत त्यांनी संताप व्यक्त केला. 

"जेव्हा शेतकरी शिखांचं आंदोलन झालं, तेव्हा ते कोणालाच भेटण्यास नव्हते. ते देखील त्यांनी तसंच मोडण्याचा प्रयत्न केला होता. ग्रामीण भागात देखील आंदोलन सुरू आहे, त्यांचं कशाकडेच लक्ष नाहीये. ही कुठली सत्ता? आणि कुठला सत्तेचा माज? नीटच्या परीक्षेसाठी किती त्रास होतो, हे कधी तरी विचारा त्यांना. मी एका व्हिडिओत म्हटलं होतं की आज शेतकरी आत्महत्या करतायत, उद्या विद्यार्थी आत्महत्या करतील," असं ते म्हणाले.  

या विद्यार्थ्यांचा राग हा एकूणच सिस्टिमविरुद्ध आहे, यामुळे आम्ही शक्तीप्रदर्शन मोर्चा या मुलांना करणार आहोत. आम्ही सर्व मुलं आणि पालक येतील, शिवाजीपार्कला मोर्चा सुरू होईल आणि तो मोर्चा सिद्धिविनायक मंदिरापर्यंत असेल. देवाला साकडं घालणार आहोत, या सरकारला सुबुद्धी दे, असं राज ठाकरे म्हणाले. पुढे उद्धव ठाकरे यांनी देखील पत्रकार परिषदेत सरकारवर हल्ला चढवला.

उद्धव ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल 

हा विषय केवळ नीट परीक्षेपुरताच मर्यादीत राहिलेला नाही, माझ्यासोबत संजय राऊत होते, अनिल देसाई आणि अरविंद सावंत होते. इतर काही खासदार देखील होते. तिथं काही मुली भेटल्या त्या म्हणाल्या की मला मारहाण करण्यात आली, कपडे फाडले गेले होते. काही ठिकाणी गंजलेले खिळे लावून मारहाण करण्यात आली. डोकी फुटेपर्यंत मारहाण केली. 

न्यायालयाला कबुतरं, कुत्रे यांच्याकडे लक्ष देण्यास वेळ आहे, मात्र कॉक्रोचकडे लक्ष देण्यास वेळ नाही. न्यायालयाकडे द्रोपदीने ध्रुतराष्ट्राकडे न्याय मागण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली. हे एकूणच सुरू आहे, राज म्हणाला की, हे राजीनाम्यापुरतं मर्यादीत नसून या विद्यार्थ्यांना हे सरकार आता नकोसं झालेलं आहे. 

पंतप्रधानांनी जे ट्विट केलंय, सरकारनं मुलांसोबत चर्चा करणं गरजेचं होतं. पहिल्या दिवशी जर बोलावलं असतं, तर हे आंदोलन ताणलं नसतं. लोकांचा साठलेला राग आता उफाळून येत आहे. आम्ही फक्त या मोर्चातून वाट मोकळी करून देतोय.