पीएम मोदी अ‍ॅक्शन मोडमध्ये, नीट प्रकरणातील आरोपींविरोधात मोठी घोषणा

मुंबई तक

23 Jul 2026 (अपडेटेड: 23 Jul 2026, 11:39 AM)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्सवर पोस्ट करत माहिती दिली आहे. विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जनंतर आलेली त्यांची ही पहिली प्रतिक्रिया आहे. तरुणांच्या भविष्यासोबत खेळणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला सोडण्यात येणार नाही, असं त्यांनी म्हटलं आहे.

Narendra Modi

Narendra Modi

Google CTA

बातम्या हायलाइट

point

विद्यार्थी आंदोलनाचा दबाव वाढल्यानंतर मोदी अ‍ॅक्शन मोडमध्ये

point

मोठी घोषणा

Narendra Modi : जंतर-मंतरवरील विद्यार्थी आंदोलन 34 व्या दिवशीही सुरु आहे, तर सोनम वांगचुक यांच्या उपोषणाला 26 वा दिवस झालेले आहेत. आंदोलक आपल्या मागण्यांवर ठाम असून ते मागं हटायला तयार नाहीत. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्सवर पोस्ट करत माहिती दिली आहे. विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जनंतर आलेली त्यांची ही पहिली प्रतिक्रिया आहे. तरुणांच्या भविष्यासोबत खेळणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला सोडण्यात येणार नाही, असं त्यांनी म्हटलं आहे. मोदींनी नेमकं काय म्हटलंय, जाणून घ्या.

हे वाचलं का?

फास्ट ट्रॅक कोर्ट स्थापन करणार

एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये मोदी म्हणतात की, "देशातील तरुणांचे हित आणि त्यांचे भविष्य ही आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे. पेपर फुटीच्या सर्व प्रकरणांमधील दोषींना लवकरात लवकर कठोर शिक्षा देण्यासाठी आणि खटल्यांचा जलद निपटारा करण्यासाठी फास्ट ट्रॅक कोर्ट स्थापन केले जातील. यासंदर्भात संबंधित विभागाने आवश्यक ती कारवाई करावी, असे निर्देश देण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांचे हित सुरक्षित करण्यासाठी सरकारने घेतलेल्या निर्णयांच्या मालिकेत हे एक महत्त्वाचे पाऊल आहे. तरुणांच्या भविष्याशी खेळणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला सोडले जाणार नाही."

हे ही वाचा : दिल्ली: जंतर मंतरजवळ रात्री अचानक दगडफेक, पोलीस आणि आंदोलक पुन्हा आमनेसामने

'सोनम सरांनी उपोषण सोडावं'

आंदोलनाची पुढील दिशा काय असेल याविषयी सीजेपीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी माध्यमांना माहिती दिली. ते म्हणाले की, 'ज्या पोलिसांनी लाठीचार्ज केला आहे, त्यांच्या विरोधात आम्ही कोर्टात जाणार आहोत. आज आमच्या आंदोलनाचा 34 वा दिवस आहे, तर सोनम सरांच्या उपोषणाचा 26 वा दिवस आहे. जोवर आमच्या मागण्या पूर्ण होत नाहीत, तोवर आंदोलन सुरुच राहील. पण सोनम सरांनी उपोषण सोडावं अशी विनंती आम्ही त्यांना करणार आहे. कारण त्यांचा जीव मोलाचा आहे.'

हे ही वाचा : 'पोलीस माझ्या कानात म्हणाले हे सरकार हटवा', राहुल गांधींनी सगळंच सांगितलं! राडा झाला तेव्हा काय घडलं?

सरकार काय करणार?

दरम्यान, देशभरातून अनेक तरुण जंतर-मंतरवर आलेले आहेत. राहुल गांधींनी मोदींच्या निवासस्थानाबाहेर केलेल्या आंदोलनामुळे सरकारवर मोठा दबाव निर्माण झाला आहे. आता सरकार कोणती पावलं उचलणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलेले आहे.