Ramdas Kadam : "शिवसेनेच्या उमेदवाराला पाडायचं अन्...", भाजपबद्दल कदमांचा मोठा गौप्यस्फोट

हर्षदा परब

04 Mar 2024 (अपडेटेड: 04 Mar 2024, 05:14 PM)

Ramdas Kadam, Shiv Sena BJP Seats allocation for Lok Sabha : शिवसेना आणि भाजपमध्ये लोकसभा जागावाटपावरून संघर्ष उभा राहिला आहे.

रामदास कदम यांची भाजपवर सडकून टीका.

Ramdas kadam on mahayuti Lok sabha allocations

follow google news

Ramdas Kadam Latest news : लोकसभा जागावाटपावरून शिंदेंच्या शिवसेनेचे नेते रामदास कदम भाजपविरुद्ध चांगलेच आक्रमक झाल्याचे दिसत आहे. मुंबई Tak शी बोलताना रामदास कदमांनी मोठा गौप्यस्फोट केला. (BJP had caste their votes to nationalist congress party candidates instead of shiv sena, says Ramdas kadam) 

हे वाचलं का?

मुंबई Tak शी बोलताना रामदास कदम म्हणाले, "महाराष्ट्रामधून आपलीच पोळी भाजून घेण्यासाठी वरच्या नेत्यांचा, मंडळींचा गैरसमज करून कदाचित हे चाललंय असा माझा अंदाज आहे. कारण शाहजी आणि मोदीजी असा अन्याय करणार नाहीत, असा माझा पूर्ण विश्वास आहे."

"महाराष्ट्रात आतापर्यंत तेच झालंय की, शिवसेनेच्या आमदारांना भाजपची मते द्यायची नाही. २०१९ मध्ये दापोलीत निवडणूक झाली. माझा मुलगा मतदारसंघातून उभा होता. भाजपने उघड उघड राष्ट्रवादीला मते टाकली, युती असताना. आणि माझ्या मुलाला पाडण्याचा प्रयत्न केला. असं एकाच ठिकाणी झालं नाही. संबंध महाराष्ट्रात अनेक ठिकाणी झालं आहे", असा गौप्यस्फोट कदम यांनी केला. 

भाजपचे आमदार निवडून आणायचे...

रामदास कदम पुढे म्हणाले की, "शिवसेनेच्या उमेदवाराला पाडायचं आणि शिवसेनेची मते घेऊन आपण आपले आमदार निवडून आणायचे आणि जागा वाढवायच्या. हे सातत्याने चाललं आहे, हे थांबलं पाहिजे. यामध्ये मोदी-शाह यांनी स्वतः लक्ष घातलं पाहिजे."

"मी काल एक शब्द बोलून गेलो की, आपला पक्ष फक्त वाढला पाहिजे. आणि बाकी सगळे पक्ष संपले पाहिजेत, अशी भूमिका आहे की काय काही लोकांची? संशयाला जागा आहे म्हणून मी बोललो", अशी खदखद शिवसेना नेते कदम यांनी व्यक्त केली.

हेही वाचा >> हर्षवर्धन पाटलांचं गृहमंत्री फडणवीसांना पत्र, महायुतीत मोठी खळबळ 

पुढे ते म्हणाले की, "आता रत्नागिरी जिल्ह्यामध्ये विनायक राऊत हे खासदार उबाठाकडे आहेत. पण, ती जागा शिवसेनेची म्हणजे आमची आहे ना. मग तुम्ही तिथे नारायण राणेंना कशी देऊ शकता? किंवा राणे साहेब ती जागा कशी मागू शकतात?", असा सवाल त्यांनी भाजपला केला. 

"मागच्या वेळी विनायक राऊतांचा प्रचार मी स्वतः जाऊन केला. कणकवलीमध्ये. असं असताना... तिथे आमचा हक्क असताना आमचा उमेदवार देण्याऐवजी तुम्ही तिथे वेगवेगळी नावे पुढे आणाल, तर ते कसं आम्ही सहन करून घेणार... मग तोंड दाबून बुक्क्यांचा मार आम्ही सहन करून घ्यायचा का?", असा सवाल कदम यांनी भाजपला केला. 

रामदास कदमांचे खडेबोल

"मला युतीमध्ये कुठेही ठिणगी पाडायची नाही, मी काल नाईलाजाने बोललो. आम्ही भाऊ भाऊ आहे... भावा-भावाप्रमाणेच ते चालले पाहिजे, अशी इच्छा आहे. पण आम्ही मागच्या वेळी जेवढ्या जागा लढवल्या, तेवढ्या जागा तुम्ही आम्हाला दिल्याच पाहिजे ना", अशी भूमिका कदम यांनी घेतली आहे. 

याच मुद्द्याला जोडून ते पुढे म्हणाले की, "आता संभाजीनगरची जागा आमची आहे. मग असं असताना तुम्ही तिथे भाजपच्या केंद्रीय राज्यमंत्र्याला कामाला लावलं आहे. हे सगळं जे चाललंय ते ठिक नाही, असं मला निश्चितपणे वाटतं. म्हणून मी म्हणालो की, आपण दोघे भाऊ भाऊ, तुझं वाटून खाऊ आणि माझ्याला हात नको लावू. असं होत नाही ना?", अशी टीका कदम यांनी केली. 

हेही वाचा >> मुख्यमंत्र्यांच्या सभेसाठी माता-भगिनींवर दबाव, रोहिणी खडसेंची 'ती' ऑडिओ क्लिप व्हायरल

"आमचा पक्ष वेगळा आहे. तुमचा पक्ष वेगळा आहे. आपण युतीमध्ये आलोय. तुमच्या हातात केंद्र सरकार आहे, पण त्या केंद्र सरकारला सपोर्ट आम्हीच दिलाय ना? आमचे खासदार तुमच्यासोबत दिले आहेत ना? मग भविष्यात राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे खासदार न येता फक्त भाजपचेच आले पाहिजे... जास्त संख्येने आणि आम्हाला तिकिटेच द्यायची नाहीत, असं कटकारस्थान महाराष्ट्रातील काही मंडळींचं असेल. वरिष्ठ पातळीवर दखल घेतली पाहिजे, असं मला वाटतं", अशी शंका रामदास कदम यांनी बोलून दाखवली.

    follow whatsapp