मुख्यमंत्र्यांच्या सभेसाठी माता-भगिनींवर दबाव, रोहिणी खडसेंची 'ती' ऑडिओ क्लिप व्हायरल

मुंबई तक

ADVERTISEMENT

Rohini khadase muktainagar
Rohini khadase muktainagar
social share
google news

बातम्या हायलाइट

point

मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमासाठी महिला बचत गटांना फतवा

point

मुक्ताईनगरमध्ये महिला बचत गटांना शिंदे गटाचा आदेश

Jalgaon News : राज्यात एकीकडे लोकसभा निवडणुकीची (Loksabha election 2024) रणधुमाळी सुरू आहे, तर दुसरीकडे राजकीय पक्षांनी आपापल्या प्रचारासाठी लोकांबरोबर संवाद साधण्यासाठी वेगवेगळ्या पातळीवर कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. शासन आपल्या दारी हा कार्यक्रम मुक्ताईनगरमधील (Muktanagar) ऐनपूरमध्ये करण्यात आला होता. मात्र त्या कार्यक्रमाला महिला बचत गटातील महिला उपस्थित राहिल्या नसल्यास त्यांना 50 रुपयांचा दंड भरण्याची सक्ती करण्यात आली. त्यामुळे आता मुक्ताईनगरबरोबरच जळगाव जिल्ह्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. 

ऑडिओ क्लिपही व्हायरल

या प्रकरणातील सोशल मीडियावर एक मेसेज व्हायरल झाला असून जाब विचारणाऱ्या रोहिणी खडसेंची ऑडिओ क्लिपही आता व्हायरल झाली आहे. यामुळे ज्या आमदार चंद्रकांत पाटील यांनी या महिला बचत गटाच्या बैठकीचे आयोजन केले होते, त्यांच्यावर आता टीका होऊ लागली आहे. 

हे ही वाचा >> 'गुवाहाटीत एअर होस्टेसचा विनयभंग कोणी केला?', असीम सरोदेंचा शिंदे गटावर आरोप

दंड भरण्याचा आदेशच

ऐनपूर महिला बचत गटावरील व्हाटस्अप ग्रुपवरील मेसेजमध्ये 17 महिला बचत गटातील सदस्यांना थेट सूचना देण्यात आली आहे. त्यामध्ये स्पष्टपणे सांगितले आहे की, आमदार चंद्रकांत पाटील येणार असून त्यांच्याबरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ही उपस्थित राहणार आहेत.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

त्यामुळे महिला बचत गटातील महिलानी बैठकीला उपस्थित राहावे आणि ज्यांना जमणार नाही त्यांनी 50 रुपये दंड भरावा असा आदेशच काढण्यात आला आहे. 

मी रोहिणी खडसे बोलतेय...

या मेसेजनंतर महिला बचत गटातील ज्या महिलेने मेसेज केला आहे, त्यांना फोनवरून एक महिला माझ्या मुलाची तब्बेत बरी नाही, त्यामुळे मी येऊ शकत नाही असं सांगते. मात्र तिला तू 50 रुपये तर फक्त दंड असल्याचे सांगून तू तो दंड भरण्याची सूचना दिली जात आहे.

ADVERTISEMENT

त्यानंतर तो फोन आपण रोहिणी खडसे बोलत असल्याचे सांगितल्यानंतर तुमच्याविरोधात आपण तक्रार करणार असल्याचे रोहिणी खडसे यांना म्हटले आहे.

ADVERTISEMENT

हे ही वाचा >>ISRO प्रमुख एस.सोमनाथ यांना कॅन्सर

    follow whatsapp

    ADVERTISEMENT