'गुवाहाटीत एअर होस्टेसवर लैंगिक अत्याचार कोणी केला?', असीम सरोदेंचा शिंदे गटावर गंभीर आरोप
एकनाथ शिंदे गट ज्यावेळी 40 आमदारांसह गुवाहाटीला गेला होता. त्यावेळी त्या थांबलेल्या हॉटेलमध्ये एअर होस्टेसचा विनयभंग कोणी केला. पळून गेलेल्या आमदाराला पकडून आणून हॉटेलवर मारहाण कोणी केली असे अनेक गंभीर आरोप असीम सरोदे यांनी शिंदे गटावर केले आहेत.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
गुवाहाटीत एअर होस्टेसवर लैंगिक अत्याचार कोणी केला?
गुवाहाटाती एअर होस्टेसचा विनयभंग, आमदारांना मारहाण कोणी केली?
Shiv sena : राज्यात लोकसभा निवडणुकीची (Lok sabha election 2024 ) रणधुमाळी उडाली असतानाच शिंदे गटावर अॅड. असीम सरोदे यांनी गंभीर आरोप केला आहे. सरोदेंनी केलेल्या आरोपामुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. असीम सरोदे (Asim Sarode) यांनी शिंदे गटावर आरोप करत असताना गुवाहाटीमध्ये गेलेल्या शिंदे गटाचे आमदार ज्या हॉटेलमध्ये थांबले होते, त्या हॉटेलमध्ये थांबलेल्या एअर होस्टेसदेखील (Air hostess) राहत होत्या, त्यांचा विनयभंग (molestation) कोणी केला असा गंभीर सवाल उपस्थित केला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात प्रचंड मोठी खळबळ उडाली आहे.
ADVERTISEMENT
निर्भय बनो
धाराशिवमध्ये आयोजित केलेल्या निर्भय बनो या सभेत बोलताना त्यांनी असे अनेक गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे गुवाहाटातील त्या प्रकरणाची निष्पक्षपणे चौकशी करावी अशी मागणीही असीम सरोदे यांनी केली आहे.
एअर होस्टेसचा विनयभंग
उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे यांनी बंड करून 40 आमदारांसह त्यांनी गुवाहाटी गाठली होती. ज्या हॉटेलमध्ये शिंदे गटाचे 40 आमदार थांबले होते, त्या हॉटेलमध्ये इतर कोणीच नव्हते. मात्र त्याच हॉटेलमध्ये दोन विमान कंपन्यांच्या एअर होस्टेस थांबल्या होत्या. त्यावेळी त्या एअर होस्टेसचा विनयभंग करण्याचा कोणी प्रयत्न केला गेला असा थेट आरोप असीम सरोदे यांनी केला आहे.
हे वाचलं का?
राजकीय वर्तुळात खळबळ
अॅड. असीम सरोदे यांनी शिंदे गटावर गंभीर आरोप करत त्यांनी अनेक सवाल उपस्थित केले गेले असले तरी त्यांनी अजूनही थेट कोणाचेच नाव घेतले नाही. त्यामुळे सरोदेंनी केलेल्या आरोपामुळे राजकीय वर्तुळात प्रचंड मोठी खळबळ उडाली आहे.
आमदाराला मारहाण
शिंदे गटातील 40 आमदारांपैकी एका आमादाराने त्यांच्यापासून पळून जाण्याचाही प्रयत्न केला. मात्र ते आमदार पळून गेल्यावर त्यांना पुन्हा हॉटेलमध्ये पकडून आणण्यात आले. त्यानंतर पळून का गेला असा सवाल उपस्थित करून त्यांना तिथे मारहाणही केल्याचा आरोप असीम सरोदे यांनी केला आहे.
ADVERTISEMENT
ठाकरे गट खूश
असीम सरोदे यांनी शिंदे गटावर असे गंभीर आरोप केल्यामुळे शिंदे गटानेही त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे. ठाकरे गटाच्या नेत्यांना खूश करण्यासाठी अशा प्रकारचे बेछूट आरोप त्यांच्याकडून केले जात असल्याची टीका आमदार संजय शिरसाठ यांनी केला आहे. इतके दिवस त्यांनी का आरोप केले नाहीत, आणि आताच का त्यांच्याकडून असे गंभीर आरोप केले जात आहेत असा सवालही शिरसाठ यांनी उपस्थित केला आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा >> शिंदे गटाच्या आमदाराच्या कारने युवकाला उडवले, जागीच ठार
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT