Rohini acharya emotional post : बिहार निवडणुकीच्या निकालानंतर राजदचे सर्वेसर्वा लालू प्रसाद यादव यांच्या कुटुंबातात मोठे वाद सुरु झाले आहेत. या पार्श्वभूमीवर लालू यादव यांच्या कन्या रोहिणी आचार्य यांनी एक्स या सोशल मीडियावर प्लॅटफॉर्मवर एकामागून एक पोस्ट करत खळबळ उडवून दिलीये. काही दिवसांपूर्वीच त्यांनी राजकारण सोडण्याची आणि कुटुंबाशी संबंध तोडण्याची घोषणा केली होती. आता त्यांनी आपल्या ताज्या पोस्टमध्ये ज्या पद्धतीने आपलं वेदनादायक मनोगत व्यक्त केलं आहे, त्यामुळे लोकांमध्ये आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
ADVERTISEMENT
लालू यादव यांची कन्या काय म्हणाली?
रोहिणी यांनी एक्स या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर लिहिले की, "काल एका मुलीला, एका बहिणीला, एका विवाहित महिलेला, एका आईला अपमानित करण्यात आलं. घाणेरड्या शिव्या दिल्या गेल्या, मारण्यासाठी चप्पल उचलली गेली. मी माझ्या स्वाभिमानाशी तडजोड केली नाही, सत्याचा त्याग केला नाही, फक्त आणि फक्त याच कारणामुळे मला अपमान सहन करावा लागला. काल एक मुलगी मजबुरीने आपल्या रडणाऱ्या आई-वडिलांना आणि बहिणींना मागे सोडून निघून गेली. माझ्याकडून माझं माहेर हिरावून घेतलं गेलं… मला अनाथ केलं गेलं. तुम्ही कधीही माझ्यासारखा मार्ग निवडू नका, कोणत्याही घरात रोहिणीसारखी मुलगी किंवा बहीण जन्माला येऊ नये."
रोहिणी आचार्य यांनी एक्सवर पोस्ट करून राजकारणातून पूर्णपणे बाहेर पडण्याची आणि आपल्या कुटुंबाशी सर्व संबंध तोडण्याची घोषणा केली आहे. त्यांच्या या निर्णयाने राजकीय वर्तुळात नव्या चर्चा सुरू झाल्या आहेत. नेहमी वडील लालू प्रसाद यांच्या बाजूने ठामपणे उभ्या राहणाऱ्या रोहिणी यांचे हे पाऊल कुटुंबातील ताणतणाव गंभीर पातळीवर गेल्याचे संकेत देत आहे.
लालू यादव यांच्या कुटुंबावर अशी वेळ का आलीये? त्याच्या कुटुंबात नेमकं काय सुरु आहे? असा सवाल रोहिणी यांच्या भावनिक पोस्ट पाहून लोकं विचारत आहेत. विशेष बाब म्हणजे RJD कडून किंवा लालू कुटुंबाकडून अद्याप या संपूर्ण प्रकरणावर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.
राजकीय तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, निवडणुकीच्या निकालामुळे निर्माण झालेली निराशा आणि कुटुंबातील अंतर्गत मतभेद आता स्पष्टपणे दिसू लागले आहेत. RJD आधीच निवडणुकीच्या धक्क्यातून सावरायचा प्रयत्न करत आहे, अशा वेळी घरातील हा वाद पक्षासाठी आणखी एक मोठे आव्हान ठरू शकतो.
इतर महत्त्वाच्या बातम्या
ADVERTISEMENT











