संभाजी भिंडेंनी साईबाबांना घातल्या शिव्या, रोहित पवारांनी फडणवीसांचाच दाखवला फोटो

संभाजी भिडेंनी शिर्डीच्या साईबाबांवर शिवराळ भाषेत टीका केली होती. त्यानंतर आता आमदार रोहित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांचा फोटो शेअर करत पलटवार केलाय.

rohit pawar shared devendra fadnavis photo and hits out at sambhaji bhide.

rohit pawar shared devendra fadnavis photo and hits out at sambhaji bhide.

भागवत हिरेकर

18 Aug 2023 (अपडेटेड: 18 Aug 2023, 03:32 PM)

follow google news

Sambhaji Bhide Controversy : शिव प्रतिष्ठानचे संभाजी भिडे यांनी महापुरुषांबद्दल गरळ ओकताना साईबाबांवर शिवराळ भाषेत टीका केली. यावरून बरंच राजकारण झालं. भिडे आमचे गुरूजी आहे, म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी यावर भूमिका मांडली. पण, आता फडणवीसांचा एक फोटो दाखवत आमदारा रोहित पवार यांनी संभाजी भिडेंची कोंडी केलीये. महत्त्वाचं म्हणजे रोहित पवारांनी फडणवीसांचे आभार मानलेत.

हे वाचलं का?

आमदार रोहित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांचं अभिनंदन का केलं? हे समजून घेण्यापूर्वी संभाजी भिडे शिर्डीच्या साईबाबांबद्दल काय बोलले होते, हे बघणं आवश्यक ठरतं.

वाचा >> Sambhaji Bhide: शिर्डीच्या साईबाबांना शिव्या दिल्या, आता भिडेंवर थेट…

अमरावतीत झालेल्या एका कार्यक्रमात बोलताना संभाजी भिडेंनी महात्मा गांधी, महात्मा फुले यांच्याबरोबरच शिर्डीच्या साईबाबांबद्दल अर्वाच्य भाषेत टीका केली होती. भिडे म्हणाले होते की, “हिंदू समाज साईबाबाला पुजतो, तो साईबाबा काय लायकीचा भ@#वा आहे, एकदा पाहा तुम्ही. मी काय बोलतोय, जागा आहे बरं का… मी काय टकूरं सरकलेला माणूस नाहीये. हराम@#$ साईबाबा देवाच्या सिंहासनावर जाऊन बसलाय.”

रोहित पवारांचं ट्विट काय?

हा वाद राज्यात बराच गाजला. या वादाची धूळ खाली बसलेली असतानाच आता रोहित पवारांनी संभाजी भिंडेंना डिवचलंय. रोहित पवारांनी एक फोटो ट्विट केला आहे. या फोटोत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे साईबाबाचे दर्शन घेत आहेत. त्यांच्यासोबत अजित पवारही दिसत आहे.

वाचा >> Sambhaji Bhide : “भिडे हिंदुत्वाकरिता काम करतात”,देवेंद्र फडणवीसांनी काय दिलं उत्तर?

हा फोटो ट्विट करत रोहित पवारांनी म्हटलंय, “श्री साईबाबा हे आमचं श्रद्धास्थान आहे, हे त्यांच्या चरणी नतमस्तक होऊन देवेंद्र फडणवीस साहेब आपण आपल्याच कथित ‘गुरुजीं’ना ज्ञानामृत पाजलं, हे बरं झालं. याबद्दल आपले खरंच आभार! या कृतीतून आपण मोठं मन केलं आहेच पण आता इतर थोर व्यक्ती आणि संतांविषयी चुकीची वक्तव्य करणाऱ्यांविरोधातही कारवाई करून आपलं गृहमंत्र्यांचं मनगट आहे, हेही दाखवून द्यावं”, असे म्हणत रोहित पवारांनी भिडेंच्या वर्मावरच बोट ठेवलं.

देवेंद्र फडणवीस संभाजी भिंडेंबद्दल काय म्हणालेले?

“कुठल्याही राष्ट्रीय नेत्याच्या संदर्भात कोणीही जर अवमानजनक वक्तव्य केलं, तर त्यांच्यावर गुन्हा दाखल होईल. त्यांच्यावर पोलीस कारवाई होईल. संभाजी भिडे गुरुजी, हे हिंदुत्वा करिता काम करतात. ते छत्रपती शिवाजी महाराजांची, त्यांच्या किल्ल्यांशी बहुजन समाजाला जोडतात. हे कार्य चांगलं आहे, तरी देखील त्यांना महापुरुषांवर अशा प्रकारे वक्तव्ये करण्याचा कुणीही अधिकार दिलेला नाही. त्यांनाच काय कुणालाही अशा प्रकारचा अधिकार नाही”, असं फडणवीसांनी सभागृहात सांगितलं होतं. याचवेळी आम्ही त्यांना गुरुजी मानतो असं विधानही फडणवीसांनी केलं होतं.

    follow whatsapp