"तुला घरात घुसून मारु, पानसरेंना भेटायला वर जा", संजय गायकवाडांकडून शिवीगाळ अन् मारहाणीची भाषा

मुंबई तक

23 Apr 2026 (अपडेटेड: 23 Apr 2026, 04:17 PM)

Sanjay Gaikwad : शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांची एक ऑडिओ क्लीप सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालीये. त्यांनी कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या 'शिवाजी कोण होता?' या पुस्तकावर आक्षेप घेत प्रकाशकाला शिवीगाळ केली असून मारहाण करण्याची धमकी दिली आहे.

Shivaji Kon Hota

Shivaji Kon Hota

Google CTA

बातम्या हायलाइट

point

"तुला घरात घुसून मारु, पानसरेंना भेटायला वर जा"

point

संजय गायकवाडांकडून शिवीगाळ अन् मारहाणीची भाषा

Sanjay Gaikwad : जका खान - शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांची एक ऑडिओ क्लीप सोशल मीडियावर व्हायरल झाली असून त्यांनी कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या 'शिवाजी कोण होता?'  या पुस्तकावर आक्षेप घेतलाय. संजय गायकवाड यांनी पुस्तकातील मजकूर आणि शिवरायांचा एकेरी उल्लेख केल्याचा दावा करत प्रकाशकाला शिवीगाळ केलीये. 'शिवाजी कोण होता?' या पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत अंबी यांना संजय गायकवाडांनी घाणेरड्या भाषेत शिव्या दिल्या आहेत. शिवाय "तुला घरात घुसून मारु, पानसरेंना भेटायला वर जा", अशी धमकी देत गोविंद पानसरे यांच्याबाबतही आक्षेपार्ह भाषा वापरली आहे. दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाबाबत संजय गायकवाड यांनी पत्रकार परिषद घेत भाष्य केलंय. ते काय म्हणाले? सविस्तर जाणून घेऊयात.. 

हे वाचलं का?

हेही वाचा : मतदानानंतर सुनेत्रा पवारांना अश्रू अनावर, दादांच्या आठवणीने कंठ दाटला; नेमकं काय म्हणाल्या?

संजय गायकवाड ऑडिओ क्लीपबाबत स्पष्टीकरण देताना म्हणाले, :"माझी ऑडिओ क्लीप व्हायरल झाली. त्यामध्ये त्याने तोडून मोडून शब्द कट करुन क्लीप शेअर केली. माझ्या पत्नीला 21 तारखेला एका कार्यक्रमात हे पुस्तक भेट देण्यात आलं होतं. तिने ते घरी आणल्यानंतर मी वाचलं. छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरवशील इतिहासाला छेडछाड करुन एकेरी भाषेत उल्लेख करण्यात आलाय. प्रत्येक पानावर शिवाजी कोण होता? शिवाजी क्षत्रिय होता की नव्हता? शिवाजी मराठा होता की नव्हता? 96 कुळी होता की नव्हता? अशा प्रकारचे बेछुट प्रश्न या पुस्तकात विचारले आहेत. "

पुढे बोलताना संजय गायकवाड म्हणाले,  मी पुस्तकाच्या प्रकाशकाला फोन केला. मी सुरुवातीला त्याला प्रकाश भाऊ म्हटलं होतं. हे पुस्तक तुम्ही प्रकाशित केलं आहे का? तो म्हणाला हो.. मग मी विचारलं की, तुम्ही शिवाजी महाराजांबाबत एकेरी भाषा का वापरली? ते म्हणाले पुस्तक जुने आहे. अमूक-तमूक व्यक्तीने लिहिलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची वारंवार महाराष्ट्रात वारंवार विटंबना केली जाते. त्यांचा अपमान केला जातो. हे मला सहन होत नाही. मला गोविंद पानसरेंनी काय देणं घेण आहे? ते वर गेले आहेत. तू पण जा तिकडे... अशा प्रकारची मुजोरी त्याने केली आहे. तो सारखं सारखं मला डिवचत होता. त्यामुळे मी त्याला शिव्या दिल्या. अशा माणसाची जीभ हासडली पाहिजे. शिवरायांबद्दल अशा प्रकारची पुस्तक आहेत, ती नष्ट केली पाहिजेत. 

इतर महत्त्वाच्या बातम्या 

नाशिक : 'माझ्या गळ्यात रुद्राक्ष..ती दैवी शक्ती..', भोंदूचा महिलेवर अत्याचार; अंनिसमुळे बाबाचा पर्दाफाश