Ram Mandir : राऊतांनी फडणवीसांना पुन्हा डिवचलं, ‘ते कुठल्याही स्टेशनला फोटो…’

प्रशांत गोमाणे

• 05:53 AM • 24 Jan 2024

एका बाजूला रामाच्या भक्तीचे नाटक करायचे आणि दुसऱ्या बाजूला असत्याची कास धरून तुम्ही विरोधकांचा आवाज दडपताय, अशी टीका ही राऊतांनी भाजपवर केली.तसेच संपूर्ण महाविकास आघाडी रोहित पवारांसोबत असल्याचेही राऊत यांनी यावेळी स्पष्ट केले.

sanjay rraut criticize devendra fadnavis on ayodhya ram mandir kar sewak nashik state adhiveshan ram mandir pran pratishtha

sanjay rraut criticize devendra fadnavis on ayodhya ram mandir kar sewak nashik state adhiveshan ram mandir pran pratishtha

follow google news

Sanjay Raut Crirticize Devendra Fadnavis : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा राम मंदिरावरून देवेंद्र फडणवीसांना डिवचलं आहे. ‘आमच्या कारसेवकांनी घुमटावर जाऊन तो कलंक नष्ट केला होता. ते कुठल्याही स्टेशनवर उभे राहून फोटो काढत नव्हते’, अशा शब्दात राऊतांनी पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीसांवर टीका केली आहे. या टीकेवर आता देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)  काय उत्तर देतात,हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. (sanjay rraut criticize devendra fadnavis on ayodhya ram mandir kar sewak nashik state adhiveshan ram mandir pran pratishtha)

हे वाचलं का?

संजय राऊत माध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी रोहित पवार यांच्यावरील ईडी कारवाईवरही भाष्य केले.8 हजार कोटीचा अॅम्ब्युलन्स घोटाळा आम्ही बाहेर काढला. राहुल कुलचं 500 कोटीचं मनी लॉन्ड्रींग, दादा भूसे दिडशे कोटी गिरणा मोसम सहकारी कारखाना, आरोग्य, नगर विकास खात्यातला घोटाळा, अशा सर्व घोटाळ्यांचे स्फोट आम्ही करतोय, पण त्यांना ईडी नोटीस पाठवत नाही, जे भाजपच्या भ्रष्टाचाराविरोधी बोलतायत त्यांच्या गळ्याभोवती ईडीचा फास टाकला जातोय, असा आरोप करत संजय राऊत यांनी रोहित पवारांना देखील आज त्याच पद्धतीने बोलावल असल्याचे सांगितले.

हे ही वाचा : Uddhav Thackeray : आशिष शेलारांची ठाकरेंवर जोरदार टीका, ‘वाचाळवीरांची…’

एका बाजूला रामाच्या भक्तीचे नाटक करायचे आणि दुसऱ्या बाजूला असत्याची कास धरून तुम्ही विरोधकांचा आवाज दडपताय, अशी टीका ही राऊतांनी भाजपवर केली.तसेच संपूर्ण महाविकास आघाडी रोहित पवारांसोबत असल्याचेही राऊत यांनी यावेळी स्पष्ट केले.

आमचे कारसेवक आपण काल व्यासपीठावर बसलेले पाहिले असतीलच, ज्यांनी प्रत्यक्ष त्या घुमटावर जाऊन तो कलंक नष्ट केला. ते कुठल्याही स्टेशनवर उभे राहून फोटो काढत नव्हते. ते प्रत्यक्ष पोहोचले आणि त्याचे घुमटावरचे छायाचित्र, फोटो आपण पाहिले असतील, असा टोला राऊतांनी देवेंद्र फडणवीसांना लगावला. शिवसेनेचे योगदान कितीही नाकारल्याचा प्रयत्न केला नतद्रष्टांनी या महाराष्ट्राच्या तरी देशाला माहितीय या संपूर्ण संघर्षात शिवसेना कुठे होती, असे देखील राऊतांनी सांगितले.

    follow whatsapp