संजय राऊतांचा निशाणा अजितदादांवर; प्रत्युत्तर दिलं देवेंद्र फडणवीसांनी…

मुंबई तक

24 Apr 2023 (अपडेटेड: 24 Apr 2023, 10:59 AM)

संजय राऊतांचा निशाणा अजितदादांवर; प्रत्युत्तर दिलं देवेंद्र फडणवीसांनी… अजित पवार विरुद्ध संजय राऊत सामन्यात देवेंद्र फडणवीस यांची एन्ट्री?

Sanjay Raut criticized Ajit Pawar but Devendra Fadnavis replied

Sanjay Raut criticized Ajit Pawar but Devendra Fadnavis replied

follow google news

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात मागील काही दिवसांपासून सातत्याने मोठी घडामोड घडणार असल्याचे संकेत दिले जात आहेत. अशात विरोधी पक्ष नेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्या बंडखोरीची चर्चा सुरु झाली.  त्यावरुन शिवसेना (UBT) नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी ‘सामना’तून रोखठोक आणि अग्रलेख लिहुन अजित पवारांवर निशाणा साधला. विशेष म्हणजे आतापर्यंत दबक्या आवाज सुरू असलेल्या या चर्चांना राऊतांनी थेट शरद पवारांचा हवाला दिला. त्यामुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली. (Sanjay Raut criticized Ajit Pawar but Devendra Fadnavis replied)

हे वाचलं का?

याला प्रत्युत्तर म्हणून तुम्ही ज्या पक्षाचे प्रवक्ते आहात, त्या पक्षाचं सांगा ना काय सांगायचं ते. तुम्ही ज्या पक्षाचं मुख्यपत्र आहे, त्याबद्दल बोला. पण, तुम्ही आम्हाला कोट करून… ते असं झालं, तसं झालं… आम्ही आमची स्पष्टपणे भूमिका मांडायला खंबीर आहोत”., असं म्हणतं अजित पवार यांनीही राऊत यांच्यावर टीका केली. यानंतर “मी खरे बोललो आणि मला कोणी टार्गेट केले तर मी मागे हटणार नाही असे म्हटले होते. मी सत्य सांगत राहीन, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही”, असं सांगून संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं. यामुळे अजित पवार विरुद्ध संजय राऊत असा सामना संपूर्ण महाराष्ट्राने अनुभवला होता.

“मुख्यमंत्रीपदावर आताच दावा करू शकतो”, बंडाच्या चर्चानंतर अजित पवारांचं मोठं विधान

अशातच आता संजय राऊत यांनी कब्बडीच्या एका मॅचचा फोटो ट्विट करत महाराष्ट्राचे सध्याचे राजकारण.. खेचा खेची! फोडा फोडी! शेवटी.. शरणागती.. जय महाराष्ट्र! असं म्हटलं. अप्रत्यक्षपणे हा निशाणा अजित पवार यांच्यावर असल्याच बोललं गेलं. अजित पवार यांच्या बंडखोरीची चर्चा, त्यानंतर त्यांची कथित माघार यामुळे राऊत यांनी अजित पवार यांना डिवचलं असल्याचं सांगितलं जातं आहे.

राऊत यांच्या या ट्विटनंतर अवघ्या अर्थ्या तासातच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक व्हिडीओ ट्विट केला. कुस्ती स्पर्धेदरम्यानचा हा व्हिडीओ असून यात त्यांनी कुस्ती आणि राजकारणाची तुलना करत संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला.

“आता देवेंद्र फडणवीसांचा गळा धरू का?”, अजित पवारांचं उत्तर ऐकून…

फडणवीस म्हणाले, राजकारणातही काही कुस्त्या चालल्या आहेत. पण आपल्याला माहित आहे, कुस्तीमध्ये डोपिंग आलं, काही लोकं नशा करुन कुस्ती खेळायला लागले म्हणून त्यांना बाद केलं. आमच्या राजकारणातही अलिकडील काळात सकाळी 9 वाजता काही लोक नशा करुन कुस्ती खेळण्याचा प्रयत्न करतात. पण नशा केलेल्या पैलवानांना कुस्तीतून बादच व्हावं लागतं. जे असली मातीतील पैलवान असतात तेच कुस्ती जिंकतात. तुमच्या आशीर्वादाने आम्ही शिंदे साहेबांच्या नेतृत्वात कुस्ती जिंकली आहे. 2024 मध्ये पुन्हा जिंकू. तुमचा आशीर्वाद असाच आमच्या पाठीशी राहु द्या, असा टोला त्यांनी संजय राऊत यांना लगावला.

    follow whatsapp