लबाड लांडगा..! भ#वा म्हणत आमदार तान्हाजी मुटकुळे यांना शिवीगाळ, संतोष बांगर यांची जीभ घसरली

Santosh Bangar : हिंगोलीतील एका प्रचारसभेत शिवसेना नेते संतोष बांगर यांनी आमदार तान्हाजी मुटकुळे यांना प्रचारसभेत शिवीगाळ केल्याची घटना आहे. ही घटना 27 नोव्हेंबर रोजी गुरुवारी रात्री घडली.

santosh bangar

santosh bangar

मुंबई तक

28 Nov 2025 (अपडेटेड: 28 Nov 2025, 02:16 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

संतोष बांगर यांच्याकडून शिवीगाळ

point

संतोष बांगर यांच्या आरोपावर तान्हाजी मुळकुटेंचे प्रत्यारोप

Santosh Bangar : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. आरोपांवर प्रत्यारोपांच्या फौरी बघायला मिळत आहे. टीका टीप्पणी करताना अनेकदा नेते मंडळींना भान न राहता ते वादग्रस्त विधान करतात. अशीच एक घटना समोर आली आहे. हिंगोलीतील एका प्रचारसभेत शिवसेना नेते संतोष बांगर यांनी आमदार तान्हाजी मुटकुळे यांना प्रचारसभेत शिवीगाळ केल्याची घटना आहे. ही घटना 27 नोव्हेंबर रोजी गुरुवारी रात्री घडली.

हे वाचलं का?

हे ही वाचा : Astrology : काही लोकांना मिळणार कुटुंबाची साथ, तर काहींना करिअरमध्ये मिळणार यश, पण 'या' राशींचं खरं नाही

प्रचारसभेत बोलताना संतोष बांगर यांनी आमदार तानाजी मुळकुटे यांचं नाव न घेता टीकेची तोफ डागली. पण, त्याचक्षणी टीका करताना संतोष बांगर म्हणाले की, 'आमदार भ#वा लबाड' आहे. त्यांच्या या वक्तव्याने हिंगोलीच्या स्थानिक राजकारणावर नेमका कसा परिणाम होईल हे सांगता येणार नाही. 

नेमकं काय म्हणाले संतोष बांगर? 

ते म्हणाले की, 'माझ्या माता बहिणी जर माहेरी- सासरी गेल्यास आणि कोणी विचारलं तुम्ही कुठल्या हिंगोलीच्या का? तर तेथील लोक विचारतात तुम्ही संतोष बांगरकडचे आहात, हेच काम संतोष बांगरने केलं, पण येथील आमदार लबाड लांडगा आहे. बोलते एक चालते एक आणि करते एक. 2014 साली त्यांच्याकडे काय होतं का? आज 20 कोटींचा महल आहे. त्याने सोयाबीन विकलं की शेत विकलं या भ#व्याने?' असा सवाल करताना त्यांची जीभ घसरली. 

पुढे ते म्हणाले की, 'माझ्या माता बहिणीला विनंती आहे की, तुमच्या भावाच्या घराची झडती घेण्यात आली होती. माझी तुम्हाला विनंती आहे की, 2 तारखेला तुम्हाला वाचपा काढायचा आहे. जिथे धनुष्यबाणाचं बटण दिसेल ते दाबा', असं संतोष बांगर म्हणाले. संतोष बांगर यांच्या आरोपानंतर आमदार तान्हाजी मुळकुटे यांनी प्रत्यारोप केले आहेत. 

हे ही वाचा : शिंदेंच्या शिवसेनेनं दिलं 'त्या' दिग्गज नेत्यासह कुटुंबातील 6 जणांना तिकिट!

संतोष बांगर यांच्या आरोपावर तान्हाजी मुळकुटेंचे प्रत्यारोप

संतोष बांगर आणि तान्हाजी मुटकुळे यांच्यात आरोप प्रत्यरोपांचं युद्ध रंगल आहे. आमदार संतोष बांगर यांनी रात्री एका प्रचारसभेत बोलत असताना तान्हाजी मुटकुळे यांना शिवीगाळ केली होती. त्यानंतर, आता आमदार तान्हाजी मुटकुळे यांनी संतोष बांगर यांना सुनावलं आहे. 'ते विकासावर बोलत नाहीत नुसतं बरबळत असतात', असं म्हणत त्यांनी आता संतोष बांगर यांना सुनावलं आहे.  त्यानंतर ते म्हणाले की, 'हिंगोली शहराचा विकास व्हावा, यासाठीच आम्ही काम करत आहोत. अनेक  काम सुरु आहेत. तसेच पाणी पुरवठ्याचे काम सुरु आहे. या शहरातील कामे आम्ही करत असल्याने भाजपवरच जनतेचा विश्वास आहे', असे ते म्हणाले. 

    follow whatsapp