Maharashtra Political latest News : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांना आज राज्यपाल रमेश बैस यांनी उपमुख्यमंत्री पदाची तर इतर 9 आमदारांना मंत्रीपदाची शपथ घेतली. या शपथविधीनंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी जितेंद्र आव्हाड यांची विरोधी पक्षनेते पदी निवड केली या निवडीनंतर आता जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परीषद घेऊन अजित पवारांवर टीका केली आहे. 25-25 वर्ष तुम्ही मंत्रीपद उपभोगलीत,अजून शरद पवारांनी तुम्हाला काय द्यायला हवं होतं. आता काय त्यांचे सिल्व्हर ओक घर काढून तुम्हाला द्याव का? अशा शब्दात जितेंद्र आव्हाड यांनी टीका केली आहे. (sharad pawar appoint jitendra awhad opposition leader criticize ajit pawar)
ADVERTISEMENT
विरोधी पक्ष नेतेपदी निवड झाल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. शऱद पवार यांना माझ्या भुमिकेवर नेहमीच प्रेम होते.त्यांच्या प्रेमामुळेच मी अशा भूमिका घेऊ शकत होतो. त्यामुळे सोशितांच्या बाजूने उभा राहणाऱ्या चेहऱ्याला आज साहेबांनी आज विरोधी पक्षनेता केले आहे, अशी प्रतिक्रिया आव्हाड यांनी दिली आहे.
महाराष्ट्राला माहितीये. 25-25 वर्षे मंत्रिपद उपभोगली आहेत. अजून शरद पवार तुम्हाला काय देणार? त्यांचं सिल्व्हर ओक घर काढून तुम्हाला देणार आहे का? असा सतंप्त सवाल जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी उपस्थित केला आहे. यासोबत ज्या नेत्याने पराकाष्ठा केली. ज्यांनी तुम्हाला फोन करून सांगितलं की, महसूल मंत्री हो, अर्थमंत्री हो, यासाठी तुम्हाला सांगावंही लागलं नाही. त्या माणसाला त्यांच्या या वयात… जो त्याचा अखेरचा काळ आहे. ज्या बापाने आपल्याला सगळी समृद्धी दिली. सगळे मानसन्मान दिले. त्या बापाला अशा परिस्थितीत आणणं आज माणुसकीला शोभणारं नाही, अशा कठोर शब्दात जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवार यांच्यावर टीका केली आहे. तसेच मला येण्याबद्दल कुणी विचारलं नाही. मला विचारलं नाही, ते बरं झालं. मी मेलो तरी शरद पवारांना सोडून जाणार नाही,असे देखील स्पष्ट शब्दात जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले.
माझ्या दृष्टीने राष्ट्रवादीचे नेते एकच आहेत, त्यांचे नाव शरदचंद्र गोविंदराव पवार आहे. आणि त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितले आहे पक्ष आणि निषाणी ही कोणीही घेऊ शकत नाही, ती आमचीच आहे आणि आमचीच राहणार आहे, असा विश्वास देखील जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केला.
दरम्यान शरद पवार यांनी जितेंद्र आव्हाड यांची विरोधी पक्ष नेतेपदी निवड केल्यानंतर आता त्यांना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची आणि कॉग्रेसची मान्यता मिळते का हे पाहावे लागणार आहे.कारण सध्य़ा महाराष्ट्रात कॉग्रेसकडे सर्वाधिक आमदार आहेत.त्यामुळे ते जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधी पक्ष नेतेपदी निवडीला मान्यता देतात का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
ADVERTISEMENT











