Sharad Pawar : PM मोदींच्या टीकेवर पवारांचा पलटवार, कृषीमंत्री असतानाची आकडेवारी देत प्रत्युत्तर

प्रशांत गोमाणे

28 Oct 2023 (अपडेटेड: 28 Oct 2023, 09:30 AM)

शरद पवारांनी आता पंतप्रधान मोदींवर पलटवार केला. शरद पवारांनी थेट 2004 ते 2014 या कार्यकाळात कृषीमंत्री असताना घेतलेल्या निर्णयाची आकडेवारी सादर केली. या आकडेवारीच्या माध्यमातून शरद पवारांनी पंतप्रधानांच्या टीकेचा समाचार घेतला.

sharad pawar reply pm narendra modi share statistics during his tenure as agriculture minister maharashtra politics

sharad pawar reply pm narendra modi share statistics during his tenure as agriculture minister maharashtra politics

follow google news

Sharad Pawar Reply Pm Narendra modi : ”कृषीमंत्री असताना त्यांनी काय केले?” असे विधान करून पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendra Modi) यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांचा नामोल्लेख टाळत टीका केली होती. या टीकेला आता शरद पवारांनी पलटवार केला. शरद पवारांनी थेट 2004 ते 2014 या कार्यकाळात कृषीमंत्री असताना घेतलेल्या निर्णयाची आकडेवारी सादर केली. या आकडेवारीच्या माध्यमातून शरद पवारांनी पंतप्रधानांच्या टीकेचा समाचार घेतला. (sharad pawar reply pm narendra modi share statistics during his tenure as agriculture minister maharashtra politics)

हे वाचलं का?

शरद पवार यांनी आज पत्रकार परीषद घेऊन मोदींच्या टीकेला उत्तर दिले आहे. यावेळी शरद पवार म्हणाले, प्रधानमंत्री पद हे इन्स्टीट्यूशन आहे, त्याची प्रतिष्ठा राखली पाहिजे. त्यामुळे पदाची प्रतिष्ठा राखून त्यांनी जी माहिती दिली ती वास्तवापासून दुर असेल, तर त्याचं चित्र मांडाव यासाठी मी तुम्हाला बोलावलं आहे, असे शरद पवार म्हणालेत.

हे ही वाचा : Beed : टाकीवरून उडी मारून मराठा तरूणाची आत्महत्या, आरक्षणासाठी संपवलं जीवन

2004 ला अन्नधान्यांची टंचाई होती. अगदी शपथ घेतल्याच्या पहिल्याच दिवशी नाईलाजाने कटू निर्णय़ घ्यावा लागला. तो म्हणजे अमेरिकेच्या गव्हाचा आयात करणे, ती फाईल माझ्याकडे आली आणि मी दोन दिवस मी काही सही केली नाही. मी विचार करत होतो आणि अस्वस्थ होतो, कृषीप्रधान देश म्हणायचं आणि परदेशातून आयात करायचं हे पटतं नव्हतं. त्यामुळे दोन दिवस फाईल पडतं होती.

दोन दिवसांनी तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी मला फोन केला. पवार साहेब तुम्ही देशाची स्टॉकची परीस्थिती पाहिली का? मी म्हटलं थोडी माहिती आहे. तुम्ही फाईलवर सही केली नाही तर चार आठवड्यात आपण धान्य पुरवठा करू शकत नाही. त्यानंतर मी सही केली. यावरून कळतं देशातील धान्याची परिस्थिती काय होती, असे शरद पवार यांनी सांगितले.

शरद पवारांनी यावेळी मी 62 हजार कोटी कर्जमाफी करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती दिली. तसेच गहु, कापूस, तांदुळ यासारख्या पिकांच्या हमीभावात दुप्पटीने वाढ केल्याचेही त्यांनी सांगितले.

पंतप्रधान मोदींचं विधान काय?

महाराष्ट्राचे एक ज्येष्ठे नेते केंद्र सरकारमध्ये अनेक वर्ष कुषीमंत्री राहिले आहेत. वैयक्तिक पातळीवर मी त्यांचा सन्मानही करतो. पण त्यांनी शेतकऱ्यांसाठी काय केले? असा सवाल मोदी यांनी नाव न घेता शरद पवारांना केला आहे. तसेच सात वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी देशातील शेतकऱ्यांना फक्त एमएसपीवर साडे तीन लाख रूपये दिले. त्या तुलनेत आमच्या सरकारने 7 वर्षात साडे तेरा लाख कोटी रूपये शेतकऱ्यांना दिल्याचे मोदी यांनी सांगितले.

    follow whatsapp