मविआची विधानपरिषदेची एकमेव जागा, सुप्रिया सुळेंची 'त्या' नेत्यासाठी फिल्डिंग, थेट फेसबुक पोस्ट

मुंबई तक

23 Apr 2026 (अपडेटेड: 23 Apr 2026, 04:17 PM)

Supriya Sule : महाविकास आघाडीकडे विधानपरिषदेवर निवडून आणता येईल, अशी केवळ एकमेव जागा आहे. या जागेवर शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जाणार असतील तरच आमचा पाठिंबा असेल, अशी भूमिका काँग्रेस पक्षाने घेतलीेये. आता खासदार सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादीची भूमिका स्पष्ट केलीये.

Supriya Sule

Supriya Sule

Google CTA

बातम्या हायलाइट

point

मविआची विधानपरिषदेची एकमेव जागा

point

सुप्रिया सुळेंची 'त्या' नेत्यासाठी फिल्डिंग, थेट फेसबुक पोस्ट

Supriya Sule on Legislative Council  Election : शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदा विधानपरिषदेवर गेले. आता काही दिवसांत म्हणजेच 13 मे रोजी  त्यांचा विधानपरिषदेचा कार्यकाळ संपणार आहे. खरं तर 2019 साली प्रथमच ठाकरे कुटुंबातील 2 व्यक्ती विधीमंडळात पोहोचल्या होत्या. त्यापूर्वी शिवसेना प्रमुखांच्या रिमोट कंट्रोलची राज्यभर चर्चा असायची. मात्र, बाळासाहेब ठाकरे कधीही कोणत्या सभागृहाचे सदस्य झाले नाहीत. दरम्यान, विधानपरिषदेतून काही दिवसांत निवृत्त होत असलेल्या उद्धव ठाकरेंना पुन्हा एकदा त्याच सभागृहाचे सदस्य होण्याची संधी आहे. 

हे वाचलं का?

हेही वाचा : ‘..तर भाजपला दोष देऊन काय उपयोग? याची गरज नव्हती’, श्रीनिवास पवार रोहित अन् जय पवारांबाबत काय म्हणाले?

महाविकास आघाडीकडे विधानपरिषदेवर निवडून आणता येईल, अशी एकमेव जागा आहे. काँग्रेसने या जागेसाठी उद्धव ठाकरे हे उमेदवार असतील तरच पाठिंबा दिला जाईल, अशी भूमिका घेतली होती. असं असतानाही ठाकरेंच्या शिवसेनेतून काही लोकं विधानपरिषदेवर जाण्यासाठी इच्छुक असल्याच्या चर्चा आहेत. मात्र, उद्धव ठाकरे कोणता निर्णय घेणार? ते विधानपरिषदेवर जाण्यासाठी खरंच इच्छुक आहेत का? यावर पुढील गणित ठरणार आहेत. दरम्यान, अशातच खासदार सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या राष्ट्रवादीची भूमिका स्पष्ट केली आहे. त्या नेमकं काय म्हणाल्या? जाणून घेऊयात.. 

हेही वाचा : महाराष्ट्र : पैसा, प्लॉट अन् घर गेलं, आईची आत्महत्या, शहीदपुत्राची कहाणी, नोकरीसाठी 2 कोटींची फसवणूक

सुप्रिया सुळे यांची फेसबुक पोस्ट जशीच्या तशी 

"महाराष्ट्रात विधानपरिषदेची निवडणूक होऊ घातलेली आहे. ही निवडणूक राज्याचे माजी मुख्यमंत्री मा. उद्धवजी ठाकरे यांनीच लढावी अशी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाची आग्रहाची विनंती आहे. उद्धवजी हे राज्यातील ज्येष्ठ व अनुभवी नेते आहेत. त्यांच्या अनुभवाचा राज्याला तसेच सभागृहाला सदैव फायदाच होत राहील, असा आम्हा सर्वांना विश्वास आहे. उद्धवजींनी या मागणीचा सकारात्मक विचार करावा ही नम्र विनंती", असं सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या पोस्टमध्ये नमूद केलंय. 

इतर महत्त्वाच्या बातम्या 

नवऱ्याची बायकोच्या चारित्र्यावर शंका, धडापासून मुंडकं केलं वेगळं अन् गावभर फिरला... पतीत सैतान जागा झाला