Tamil Nadu CM Oath Ceremony : तामिळनाडूमध्ये विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर रंगलेला बहुमताचा पेच अखेर संपला असून, तमिळगा वेत्री कळघम (TVK) पक्षाचे प्रमुख थलपती विजय आज (दि.10 मे) राज्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. चेन्नई येथील नेहरू स्टेडियमवर सकाळी 10 वाजता हा भव्य शपथविधी सोहळा पार पडणार आहे. विशेष म्हणजे, विजय यांनी आधी दुपारी 3:45 वाजता शपथ घेण्याचे ठरवले होते, परंतु त्यांच्या ज्योतिषाने दिलेल्या सल्ल्यानुसार त्यांनी सकाळी 10 वाजताची वेळ निश्चित केली आहे. 9 मे रोजी विजय यांनी राजभवनात राज्यपालांची भेट घेऊन आमदारांच्या पाठिंब्याचं पत्र दिलं, त्यानंतर राज्यपालांनी त्यांना सरकार स्थापनेसाठी आमंत्रित केले. विजय यांना 13 मे 2026 रोजी किंवा त्यापूर्वी विधानसभेत आपले बहुमत सिद्ध करावे लागणार आहे. या ऐतिहासिक क्षणाबद्दल विजय यांचे वडील आणि प्रसिद्ध दिग्दर्शक एस.ए. चंद्रशेखर यांनी प्रचंड आनंद व्यक्त करत, हा तामिळ जनतेचा विजय असल्याचे म्हटले आहे.
ADVERTISEMENT
हेही वाचा : Maharashtra Weather : राज्यात पुन्हा दुहेरी संकट, कुठे ऊन तर कुठे पाऊस; 14 जिल्ह्यांचं अवघड होणार
राहुल गांधींची उपस्थिती आणि स्टालिन यांना निमंत्रण; भव्य सोहळ्याची तयारी
या शपथविधी सोहळ्याला लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी सकाळीच दिल्लीहून चेन्नईकडे रवाना झाले आहेत. शिष्टाचारानुसार, राज्याचे मावळते मुख्यमंत्री एम. के. स्टालिन यांनाही या सोहळ्याचे निमंत्रण पाठवण्यात आले आहे. विजय यांच्या या शपथविधीमुळे तामिळनाडूच्या राजकारणात एका नव्या पर्वाची सुरुवात मानली जात आहे. तामिळनाडूच्या जनतेसाठी हा 'मोठा दिवस' आहे, असं शिवकाशीच्या नवनिर्वाचित आमदार एस. कीर्तना म्हणाल्या. संपूर्ण राज्य या क्षणाची आतुरतेने वाट पाहत असल्याचे सांगितले आहे. तसेच व्हीसीकेचे अध्यक्ष थोल थिरुमावलवन यांनीही सोशल मीडियावरून विजय यांना मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी स्वीकारल्याबद्दल मनापासून शुभेच्छा दिल्या आहेत.
हेही वाचा : अखेर थलपती विजय यांनी गेम पलटवला, 'त्या' पक्षाचा बिनशर्त पाठिंबा अन् मॅजिक फिगर गाठली!
29 वर्षीय कीर्तना ठरणार सर्वात तरुण मंत्री; विजय यांच्या मंत्रिमंडळातील 9 नावांची घोषणा
थलपती विजय यांच्यासोबत आज त्यांच्या मंत्रिमंडळातील 9 आमदारही मंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. यामध्ये प्रामुख्याने थिरू एन. आनंद, सीटीआर निर्मल कुमार, अरुण राज आणि आधव अर्जुना यांचा समावेश आहे. याशिवाय राजमोहन, व्यंकटरमणन आणि सेनगोट्टैयान हे देखील मंत्रिपदाची जबाबदारी स्वीकारतील. या मंत्रिमंडळाचे विशेष आकर्षण म्हणजे 29 वर्षीय एस. कीर्तना, ज्या शिवकाशी मतदारसंघातून निवडून आल्या आहेत, त्या विजय यांच्या कॅबिनेटमधील सर्वात तरुण मंत्री म्हणून शपथ घेतील. विशेष बाब म्हणजे, या शपथविधी सोहळ्यात त्यांच्या मित्रपक्षांपैकी काँग्रेसचा कोणताही नेता मंत्री म्हणून शपथ घेणार नाही, असे स्पष्ट झाले असून केवळ टीव्हीकेच्याच आमदारांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले आहे.
5 पक्षांच्या पाठिंब्याने 'जादूई आकडा' पार; विधानसभेत बहुमत सिद्ध करण्याचे आव्हान
तामिळनाडू विधानसभेत सत्ता स्थापनेसाठी 118 आमदारांच्या पाठिंब्याची गरज होती, तर विजय यांच्या टीव्हीके पक्षाने 107 जागांवर विजय मिळवला होता. मात्र, काँग्रेस (5 जागा), सीपीआय (2 जागा), सीपीआय-एम (2 जागा), व्हीसीके (2 जागा) आणि आययुएमएल (2 जागा) या पाच पक्षांनी विजय यांना पाठिंबा जाहीर केल्यामुळे त्यांचे संख्याबळ बहुमतापेक्षा पुढे गेले आहे. या भक्कम पाठिंब्याच्या जोरावर विजय आता राज्याची सूत्रे हाती घेण्यास सज्ज झाले आहेत. सत्तास्थापनेच्या या प्रक्रियेत मित्रपक्षांची भूमिका मोलाची ठरली असून, आता 13 मे रोजी विधानसभेत विश्वासदर्शक ठराव मंजूर करून घेणे हे विजय यांच्या समोरील पहिले मोठे आव्हान असणार आहे. तामिळनाडूच्या या राजकीय बदलाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.
विजय यांच्यसोबत 'हे' 9 आमदार घेणार मंत्रिपदाची शपथ
1. N. Anand
2. Aadhav Arjuna
3. Dr. K.G. Arunraj, M.B.B.S.,
4. K.A. Sengottaiyan
5. P. Venkataramanan, M.Com., M.Β.Α., Μ.L.,
6. R. Nirmalkumar
7. Rajmohan
8. Dr. TK. Prabhu, BDS., M.Sc.D., M.Sc., ICDI, FICOI
9. Selvi S. Keerthana, M.Sc.,
इतर महत्त्वाच्या बातम्या
Maharashtra Weather : राज्यात पुन्हा दुहेरी संकट, कुठे ऊन तर कुठे पाऊस; 14 जिल्ह्यांचं अवघड होणार
ADVERTISEMENT











