Ind vs Pak: दोन JF-17 आणि एक F-16... भारताकडून पाकिस्तानच्या 3 लढाऊ विमानांचा टप्प्यात कार्यक्रम!

हल्ल्याच्या उद्देशाने पाकिस्तानने आपली लढाऊ विमानं भारताच्या दिशेने पाठविल्यानंतर भारताने त्याला चोख प्रत्युत्तर दिलं आहे. भारताच्या हवाई संरक्षण यंत्रणेने पाकिस्तानची तीन विमानं खाली पाडली आहेत.

भारताने पाकिस्तानची तीन लढाऊ विमाने पाडली!

भारताने पाकिस्तानची तीन लढाऊ विमाने पाडली!

मुंबई तक

08 May 2025 (अपडेटेड: 09 May 2025, 12:28 AM)

follow google news

नवी दिल्ली: भारतीय लष्कराने पाकिस्तानचे दोन JF-17आणि एक JF-17  अशी 3 लढाऊ विमान पाडल्याची प्राथमिक माहिती नुकतीच हाती आली आहे. त्याच वेळी, पंजाब प्रांतात पाकिस्तानी हवाई दलाचे AWACS विमान नष्ट करण्यात आले. हे विमान पाकिस्तानच्या सीमेत पडण्यात आलं. याशिवाय, लष्कराच्या हवाई संरक्षण तुकड्यांनीही सीमेवर झालेल्या ड्रोन हल्ल्यांना प्रत्युत्तर देत ते निष्क्रिय केले आहेत. 

हे वाचलं का?

भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, गुरुवारी (8 मे) पाकिस्तानने जम्मूमधील एका हवाई तळावर क्षेपणास्त्र सोडले. पण, भारतीय सैन्याच्या सतर्कतेमुळे आणि हवाई संरक्षण यंत्रणेमुळे हा हल्ला यशस्वीपणे परतवून लावला आहे.

हे ही वाचा>> पाकिस्तानकडून पुन्हा हल्ला, कुठे Attack.. कुठे ब्लॅक आऊट? सगळ्यात अचूक माहिती फक्त मुंबई Tak वर

भारतीय लष्कराच्या आधुनिक S-400 क्षेपणास्त्र संरक्षण प्रणालीने तातडीने कारवाई करत पाकिस्तानने डागलेल्या 8 क्षेपणास्त्रांना हवेतच उडवून टाकलं. लष्कराच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या क्षेपणास्त्रांचे लक्ष्य जम्मू विमानतळ आणि तेथील धावपट्टी होती, परंतु वेळीच ही क्षेपणास्त्र निकामी केल्याने आपलं मोठं नुकसान टळलं आहे.

भारतीय लष्कराने पाकिस्तानचं F-16 लढाऊ विमान केली नष्ट

यासोबतच, भारतीय लष्कराच्या हवाई दलाने पाकिस्तानचं F-16 लढाऊ विमानही पाडलं असल्याचं समोर आलं आहे. पाकिस्तानी विमानांनी भारतीय हवाई हद्दीत घुसखोरी करण्याचा प्रयत्न करताच भारताने जोरदार कारवाई करत विमान खाली पाडलं.

हे ही वाचा>> Ind vs Pak: भारताचा लाहौरवर सर्वात मोठा हल्ला सुरू, पाकच्या दिशेने भारताचे फायटर झेपावले!

त्याच वेळी, पाकिस्तानने भारतीय सीमेवर अनेक ड्रोन पाठवले होते, जे लष्कराच्या हवाई संरक्षण युनिट्सनी वेळीच लक्ष्य केले आणि पाडले. नियंत्रण रेषेजवळील केजी टॉप परिसरात हे ड्रोन दिसले होते.

लष्कराच्या हवाई संरक्षण तुकड्यांनी उधळून लावले ड्रोन हल्लेही

देशाच्या सुरक्षेशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असे भारतीय लष्कराने म्हटले आहे. सैन्य प्रत्येक परिस्थितीसाठी सज्ज आहे आणि प्रत्युत्तर देण्यासाठी पूर्णपणे तयार आहे.

    follow whatsapp