उद्धव ठाकरेंना एकाच दिवसात दुसरा झटका! कुटुंबीयांसह ‘मातोश्री’च्या सुरक्षेत कपात

मुंबई तक

• 01:14 PM • 21 Jun 2023

राज्याच्या गृहखात्याने ठाकरे कुटुंबियांच्या सुरक्षेत कपात केली आहे. राज्य सरकारने उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, रश्मी ठाकरे आणि तेजस ठाकरे यांच्या सुरक्षेत कपात केली आहे. इतकेच नाही तर मातोश्रीच्या सुरक्षेतही कपात करण्यात आली आहे.

uddhav thackeray aditya thackeray family and motoshree security has been reduced maharahstra politics

uddhav thackeray aditya thackeray family and motoshree security has been reduced maharahstra politics

follow google news

Maharashtra Political News : उद्धव बाळासाहेब ठाकरे (UBT)गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि आदित्य ठाकरे (Aditya Thackeray)यांचे निकटवर्तीय युवा सेनेचे सचिव सूरज चव्हाण यांच्या घरावर आणि इतर 16 ठिकाणी ईडीने आज धाड टाकली आहे. ही घटना ताजी असतानाच आता ठाकरे कुटुबियांच्या सुरक्षेत कपात करण्यात आली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना एकाच दिवसात दुहेरी झटका बसला आहे. त्यातच एकीकडे ठाकरे यांनी मुंबई महापालिकेवर 1 जुलै रोजी विराट मोर्चा काढण्याची घोषणा केली असताना, राज्य सरकारने सुरक्षेत कपात केल्याने ठाकरेंना मोठा धक्का बसला आहे. (uddhav thackeray aditya thackeray family and motoshree security has been reduced maharahstra politics)

हे वाचलं का?

राज्याच्या गृहखात्याने ठाकरे कुटुंबियांच्या सुरक्षेत कपात केली आहे. राज्य सरकारने उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, रश्मी ठाकरे आणि तेजस ठाकरे यांच्या सुरक्षेत कपात केली आहे. इतकेच नाही तर मातोश्रीच्या सुरक्षेतही कपात करण्यात आली आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना आणि आदित्य कॅबिनेट मंत्री असताना त्यांना अतिरिक्त वाहने देण्यात आली होती. ही एस्कॉर्ट व्हॅन कमी केल्याची माहिती आहे.

हे ही वाचा : सुप्रिया सुळे मुख्यमंत्री तर आदित्य उपमुख्यमंत्री, ठाकरे-पवार डीलमुळे शिवसेना फुटली ?

उद्धव ठाकरे यांना Z+,आदित्य ठाकरेंना Z, रश्मी आणि तेजस ठाकरे यांना Y+ सिक्युरीटी होती. यामधील उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना आणि आदित्य कॅबिनेट मंत्री असताना त्यांना अतिरिक्त वाहने देण्यात आली होती. ही एस्कॉर्ट व्हॅन कमी केल्याची माहिती आहे. यासोबतमातोश्रीच्या सुरक्षेतही कपात करण्यात आली आहे. मातोश्रीच्या मागच्या आणि पुढच्या गेटवर देखील सूरक्षारक्षक तैनात करण्यात येतात. ती सूरक्षा देखील कमी करण्यात आली आहे. साधारण 60 चे 70 पोलीस अधिकारी कर्मचारी सुरक्षेत गुंतले होते. ही सुरक्षा आता कमी करण्यात आली आहे.

दरम्यान एकीकडे राज्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे (UBT)गटाचे खासदार संजय राऊत यांना धमकी दिल्याच्या घटना समोर येत असताना ठाकरे कुटुबियांच्या सुरक्षेत कपात त्यांना मोठा धक्का बसला आहे. यासोबतच उद्धव ठाकरे यांनी कालच्या नगरसेवकांच्या बैठकीत मुंबई महापालिकेवर विराट मोर्चा काढण्याची घोषणा केली होती. आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली 1 जुलैला हा मोर्चा काढण्यात येणार आहे.या मोर्चाआधीच राज्य सरकारने उध्दव ठाकरेंना मोठा धक्का दिला आहे.

    follow whatsapp