Amruta फडणवीस सापडल्या अडचणीत ठाकरे धावले मदतीला, स्वत:च्या विमानात...

ऋत्विक भालेकर

05 Mar 2024 (अपडेटेड: 05 Mar 2024, 04:07 PM)

Uddhav Thackeray: देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस जामनगरला जाताना काहीशा अडचणीत सापडल्या त्याचवेळी ठाकरे कुटुंबीयांनी त्यांना एक मोठी मदत केली. ज्याची सध्या खूप चर्चा सुरू आहे.

अमृता फडणवीसांना ठाकरेंची मदत

अमृता फडणवीसांना ठाकरेंची मदत

follow google news

Uddhav Thackeray and family fly together with Amruta Fadnavis: मुंबई: देशातील सर्वात श्रीमंत उद्योजक अशी ओळख असलेले मुकेश अंबानी यांचे पुत्र अनंत अंबानी यांचा दोनच दिवसांपूर्वी गुजरातमधील जामनगरमध्ये प्री-वेडिंग सोहळा पार पडला. जो कार्यक्रम सध्या बराच चर्चेत आहे. पण याशिवाय एक अशी घडामोड घडली आहे की, ज्याची महाराष्ट्राच्या राजकारणात अधिक चर्चा आहे. (uddhav thackeray and family fly together with amruta fadnavis for anant ambanis pre wedding)

हे वाचलं का?

त्याचं झालं असं की, देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी चक्क उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबीयांसोबत चार्टर्ड विमानाने गुजरातच्या जामनगरपर्यंत प्रवास केला. ज्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

अमृता फडणवीसांना नेमका का करावा लागला ठाकरे कुटुंबासोबत प्रवास? 

मुकेश अंबानी यांचे सुपुत्र अनंत अंबानी-राधिक मर्चंट यांच्या प्री-वेडिंग सोहळ्याला उद्धव ठाकरे आणि त्यांच्या संपूर्ण कुटुबांनी हजेरी लावली. यासोबतच देवेंद्र फडणवीसांच्या पत्नी अमृता फडणवीस या देखील मुलगी दिविजासोबत जामनगरला गेल्या होत्या.

गुजरातच्या जामनगरमध्ये अत्यंत शानदार सोहळा पार पडला. याच सोहळ्यासाठी ठाकरेंसोबत अमृता फडणवीस यांनी मुंबई ते जामनगर असा एकाच विमानातून प्रवास केला असल्याचं आता समोर आलं आहे. 

अनंत अंबानींच्या प्री-वेडिंग सेलिब्रेशनकरता जामनगरला जाताना अमृता फडणवीस आणि उद्धव ठाकरेंच्या परिवारानं एकाच विमानानं प्रवास केल्याने या दोन्ही कुटुंबातील कटुता दूर करून ते जवळ आले असल्याची आता चर्चा रंगली आहे. 
 
या विमान प्रवासादरम्यान, अमृता फडणवीस आणि ठाकरे कुटुंबीयांमध्ये काही चर्चाही झाल्याची माहिती समजते आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, 29 फेब्रुवारीला संध्याकाळी 7.30 वाजता अमृता फडणवीस आणि ठाकरे कुटुंबीय हे एकाच सुमारास जामनगरसाठी निघालेले. पण यावेळी अमृता फडणवीस यांच्याकडे बरंच सामान होतं. ज्यामुळे त्यांच्या त्या विमानातून प्रवास करणं शक्य नव्हतं. ऐनवेळी तात्काळ दुसरं विमान मिळणंही कठीण होतं. ज्यामुळे अमृता फडणवीस यांची बरीच पंचाईत झाली. 

अशावेळी त्यांनी जामनगरलाच जाणाऱ्या दुसऱ्या चार्टर्ड विमानाने प्रवास करावा असं त्यांना सुचवण्यात आलं. पण हे त्यावेळी दुसरं विमान होतं ते चक्क ठाकरे कुटुंबीयांचं...

यावेळी अमृता फडणवीस यांनी विमानतळ प्रशासनाला अशी विनंती केली की, त्यांना दुसऱ्या विमानाने प्रवास करु द्यावा. विमानतळ प्रशासनाने देखील याबाबत ठाकरे कुटुंबाला विचारणा केली. ज्याला ठाकरे कुटुंबानेही तात्काळ होकार दिला. त्यामुळे अमृता फडणवीस यांना वेळेत जामनगरला पोहचता आलं. दरम्यान, जेव्हा अमृता फडणवीस यांनी ज्या खासगी विमानातून प्रवास केला त्यावेळी त्यांच्यासोबत उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे होते. 

अमृता फडणवीसांनी अनेकदा केलेली उद्धव ठाकरेंवर जहरी टीका

2019 नंतर ज्या उद्धव ठाकरेंमुळे देवेंद्र फडणवीस यांना सत्ता गमवावी लागली होती. त्यानंतर फडणवीसांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी पुढील अडीच वर्षांत उद्धव ठाकरेंवर अत्यंत जहरी शब्दात टीका केली होती. पण आता त्याच उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबीयांसोबत अमृता फडणवीसांना प्रवास करावा लागला. ज्यावरुन आता वेगवेगळ्या प्रतिक्रिया समोर येत आहेत.

पाहा अमृता फडणवीसांनी उद्धव ठाकरेंवर कशाप्रकारे केलेली टीका 

उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असताना असे अनेक ट्वीट अमृता फडणवीस यांनी केले होते.

    follow whatsapp