Hatkanangle Lok Sabha Election : राजू शेट्टींसोबत उद्धव ठाकरेंचं का फिस्कटलं?

भागवत हिरेकर

03 Apr 2024 (अपडेटेड: 03 Apr 2024, 04:09 PM)

Hatkanangale Lok Sabha Election 2024 : महाविकास आघाडी हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून राजू शेट्टी यांना पाठिंबा देणार अशी चर्चा होती, मात्र त्यांच्यासोबतची चर्चा फिस्कटली आहे.

उद्धव ठाकरे यांनी राजू शेट्टींना एक प्रस्ताव दिला होता.

राजू शेट्टी यांनी उद्धव ठाकरेंचा प्रस्ताव फेटाळला.

follow google news

Raju Shetti, Uddhav Thackeray, Hatkanangle Lok Sabha Election 2024 : हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट झाले आहे. स्वाभिमानी शेतकरी कामगार पक्षाचे नेते राजू शेट्टी यांच्यासमोर आता दुहेरी आव्हान असणार आहे. उद्धव ठाकरे यांनी सत्यजित पाटील यांची शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उमेदवार म्हणून घोषणा केली. त्यामुळे राजू शेट्टी आणि उद्धव ठाकरे यांच्यात का फिस्कटलं, याची चर्चा होतेय. याबद्दल आता खुद्द उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी भूमिका स्पष्ट केली. (Why Uddhav Thackeray announced Shiv Sena Candidate against raju shetti?)

हे वाचलं का?


राजू शेट्टींबरोबर दोन बैठका?

उद्धव ठाकरे यांना जेव्हा राजू शेट्टींसोबत झालेल्या दोन बैठकांबद्दल विचारण्यात आले, तेव्हा ते म्हणाले, "बोलणी फिस्कटण्याचा प्रश्न नाहीये. पण शेवटी जर का हुकुमशाही गाडायची असेल, तर तिकडे विरोधी पक्ष आम्हाला म्हटलं जातं, या पक्षांची ताकद ही वाढली पाहिजे. म्हणून आम्ही असं ठरवलं की, यापूर्वीच्या २०१९ च्या निवडणुकीत कोल्हापुरांनी जिल्ह्यातील दोन्ही जागांवर शिवसेनेला विजयी केलं होतं."

हेही वाचा >> श्रीकांत शिंदेंविरोधात ठाकरेंचा उमेदवार ठरला! चार उमेदवारांची घोषणा

"त्यातील कोल्हापूरची जागा आम्ही शाहू महाराजांचा मान ठेवून, ती काँग्रेसला दिली. साहजिक आहे की, दुसरी जागा जर आम्ही सोडली तर तिथला शिवसेना प्रेमी हिंदूत्ववादी मतदार आहे, तो नाराज होण्याची शक्यता आहे. म्हणून आम्ही हातकणंगले आणि सांगली लढवण्याचा निर्णय घेतलेला आहे", असे ठाकरे म्हणाले. 

संजय राऊतांनी सांगितलं कशामुळे बिनसलं?

राजू शेट्टींसोबत जुळवून घेण्याबद्दल संजय राऊत म्हणाले, "आम्ही त्यांच्याशीच बोलत होतो. उद्धवजी आणि राजू शेट्टी यांच्या मातोश्रीवर दोन बैठका झाल्या. राजू शेट्टी यांच्या कामाविषयी, त्यांच्या पक्षाविषयी आमची स्पष्ट भूमिका होती. शेतकऱ्यांचं काम करताहेत, आंदोलन करताहेत. पण, हातकणंगले हा शिवसेनेचा मतदारसंघ आहे. राजू शेट्टी यांचा पराभव शिवसेनेच्या उमेदवाराने केला."

हेही वाचा >> संजय निरूपमांची काँग्रेसमधून हकालपट्टी

"राजू शेट्टी यांची भूमिका अशी होती की, आम्ही त्यांना पाठिंबा द्यावा. तिथले राजकीय गणित पाहता, आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी, माजी आमदारांनी आम्हाला आणि राजू शेट्टींना अशी विनंती केली की, शिवसेनेच्या मतदारसंघामध्ये शिवसेनेचाच उमेदवार असावा. आणि तो मशालीवर लढत असेल, तर उद्याच्या राजकारणात आम्हाला त्याचा फायदा होईल. आम्ही राजू शेट्टींनी विनंती केली की, आपला पक्ष रीतसर महाविकास आघाडीत सामील होऊ द्या", असे संजय राऊत यांनी सांगितले.

हेही वाचा >> "चुकीचा अर्थ...", अजित पवार गटाचे सुप्रीम कोर्टाने टोचले कान 

"दुसरी विनंती आम्ही त्यांना केली की, तुम्ही मशाल हे चिन्ह घ्या. आम्ही तिन्ही पक्ष तुम्हाला पाठिंबा देतो. त्यांनी विचार करायला वेळ घेतला आणि त्यांच्याकडून निरोप आला की, मला मशाल चिन्ह घेता येणार नाही. त्यामुळे शिवसेनेचे माजी आमदार शाहूवाडीचे सत्यजित पाटील यांची उमेदवारी उद्धवजींनी जाहीर केली. आम्ही शेवटपर्यंत राजू शेट्टींना विनंती करत होतो की, तुम्ही मशाल चिन्हावर निवडणूक लढा", अशी माहिती संजय राऊत यांनी दिली. 

    follow whatsapp