महापालिका निवडणूक, ठाकरे बंधु एकत्र, मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव...उद्धव ठाकरेंनी मुलाखतीच्या दुसऱ्या भागात सगळंच सांगितलं

Uddhav Thackeray Interviews : शिवसेना ( उबाठा ) प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मुलाखतीचा दुसरा भाग आज 20 जुलै रोजी सामना या युट्यूब प्रसारमाध्यमावर प्रसारित झाला आहे. ही मुलाखत सामनाचे संपादक आणि शिवसेना ( उबाठा ) खासदार संजय राऊत यांनी घेतली आहे.

Uddhav Thackeray Interviews

Uddhav Thackeray Interviews

मुंबई तक

20 Jul 2025 (अपडेटेड: 20 Jul 2025, 02:19 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

मराठी माणूस हिंदी सक्तीच्या विरोधात पेटून उठलाय? 

point

महापालिकेच्या निवडणुकीत राज आणि उद्धव एकत्र येणार का? 

Uddhav Thackeray Interviews : शिवसेना (उबाठा) प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मुलाखतीचा दुसरा भाग आज 20 जुलै रोजी सामना या युट्यूब प्रसारमाध्यमावर प्रसारित झाला आहे. ही मुलाखत सामनाचे संपादक आणि शिवसेना (उबाठा) खासदार संजय राऊत यांनी घेतली आहे. या मुलाखतीच्या माध्यमातून त्यांनी केंद्र सरकार आणि पहलगाम हल्ल्याबाबत विचारले असता, उद्धव ठाकरेंनी केलेल्या हल्ल्याबाबत अनेक प्रश्न उपस्थित करत सरकारच्या कामगिरीला अपयश आल्याचं म्हणाले. तसेच त्यांनी महापालिका निवडणूक, ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या विषयावर भाष्य केलं. तसेच त्यांनी अदानी प्रकल्प हा थेट धारावीवर कब्जा करत असून हा देशातीलच नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवरील मोठा लँड स्कॅम असल्याचं ते म्हणाले. 

हे वाचलं का?

हेही वाचा : 'आता सोबत राजही आलेला आहे...', उद्धव ठाकरे पुन्हा एकदा तेच म्हणाले; युतीबाबत नेमकं काय सुरू?

प्रश्न : पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यात आपल्या 26 माता भगिणींचं कुंकू पुसलं गेले त्यात आपल्या राज्यातीलही माता भगिणी होत्या, या हल्ल्याकडं आपण कसं पाहता? 

हा हल्ला झाला कसा? काश्मीरमध्ये आता पूर्ववत परिस्थिती झालेली आहे. काश्मीर हा आपल्या देशाचा अविभाज्य भाग आहे. म्हणूनच 370 कलम लागू करण्यासाठी शिवसेनेनं पाठिंबा दिला होता. पर्यटक पुन्हा तिथं येऊ लागले होते. तिथं पुरेसा बंदोबस्त ठेवण्याची गरज होती. सुरक्षेच्याबाबतीत हे सर्व गाफिल राहिले. त्यानंतर सैन्यांनी जी काही कारवाई केली, त्यांच्या शौर्याला सलामच आहे. जे पर्यटक केले होते ते बिंधास्तपणे गेले होते. त्यावेळी आनंदाचे आणि सुखाचे क्षण घालवायला गेले होते. त्यांच्यावर गोळीबार होतो काय? इतक्या आतमध्ये अतिरेकी कसे आले? अतिरेक्यांचा अद्यापही थांग पत्ता नाही. 

प्रश्न : हे सरकारचं अपयश आहे म्हणणं आहे का तुमचं? 

होय...कारण त्यांच्याच भरोवशावर आपले नागरिक तिकडे गेले होते. ते म्हणतात की, आताचं काश्मीर वेगळं आहे, तेव्हाचं काश्मीर वेगळं होतं. त्यांनी काही केलं तर आम्ही त्यांना घुसून मारू. ते सैन्याचं काम आहे आणि सैन्याचं श्रेय तुम्ही नका घेऊ, असे ते म्हणालेत. 

प्रश्न : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याच सरकारमध्ये पठाणकोट झालं, त्यानंतर पुलवामा झालं, त्यानंतर पहलगाममध्ये झालेला हल्ला ऑपरेशन सिंदूर होतं आणि आपण त्याला पाठिंबा दिला? 

हो पाठिंबा दिला होता...पाकिस्तानवरील हल्ल्याच्या अशा अनेक बातम्या आल्या होत्या. काही बातम्या अशा ही होत्या की आता आपण पाकिस्तान मोडूनच टाकणार आहोत. जसं त्यावेळी इंदिराजींनी बांगलादेश हा पाकिस्तानपासून तोडला तसाच पाकिस्तानचेही तुकडे होतायत की काय? असा प्रश्न निर्माण होतोय, पण तसं काही नाही झालं. तुम्ही तुमच्या डिप्लोमॅसीसाठी काहीही करणार. इकडे आपल्या समाजातील लोक तिकडे लढायला जातात आणि यांची मुलं तिकडे दुबईत जाऊन मस्त क्रिकेट मॅच बघतात. यामध्ये अनेक सैनिकांच्या जीवाशी खेळ खेळला गेला आहे. दुसरीकडे अमेरिकेचे डोनाल्ड ट्रम्प यांनी माझ्यामुळे युद्ध थांबल्याचं सांगितलं. मग आता यामागे नेमकं समजायचं काय? असा प्रश्न उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला आहे. याविरोधात जर कोणी काही बोलेल तर आहेच जनसुरक्षा कायदा हे सर्व सुरूच आहे. 

प्रश्न : मराठी माणूस हिंदी सक्तीच्या विरोधात पेटून उठलाय? 

मराठी माणूस हा आततायीपणा करणारा नाही. मराठी माणूस असा आहे की मी बरा आणि माझं काम बरं. मराठी माणूस हा कधीही कोणावर अन्याय करणारा नाही. पण याच मराठी माणसावर अन्याय झाला तर ऐकूण घेणार नाही. आम्ही हिंदी सक्तीच्या विरोधात आहोत. आम्हाला हिंदीचा द्वेश बिलकुल नाही, कारण बाळासाहेब आणि माझ्या आजोबांनी आम्हाला ज्या भाषा शिकता येईल त्या शिका, असं बोलले होते. पण हिंदीची सक्ती नको. तुम्ही हनुमान चालीसा आमच्यावर थोपू नका, आम्ही मारूती स्त्रोत म्हणतो ना होतंय काय, दोन्हीही देव एकच आहेत. हा देश संघराज्य पद्धतीने चालतो जर हे सर्व घालवून तुम्ही वन नेशन आणि वन इलेक्शन सुरु करणार असाल तर ते चुकीचं असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले.

प्रश्न : डोनाल्ड ट्रम्पच्या दबावाने ऑपरेशन सिंदूर मागे घेण्यात आलं, मग भारत आंतरराष्ट्रीय स्तरावर कुठे तरी कमजोर पडतोय का? 

यांचा जो व्यापार आहे त्या व्यापारासाठी त्यांनी माघार घेतली. त्यांना देशापेक्षा व्यापार फार महत्त्वाचा वाटतो. 

प्रश्न : जसं आपल्या देशात लुटमार होतेय, मग काही ठिकाणी जंगलं तोडली जातायत. तिच स्थिती मुंबईत दिसते, सर्वात मोठा आंतरराष्ट्रीय लँड स्कॅम धारावी हे सर्व गौतम अदानीसाठी सुरु आहे का?  

गौतम अदानीसाठीच हे सर्व सुरू आहे. आज मुंबईतून मराठी माणूस फेकला जात आहे. गौतम अदानीसाठी धारावी देण्यात आलेली आहे. त्या लोकांना डंपिंग ग्राऊंडची कचऱ्याची जागा का दिली जाते? गिरणी कामगार आज आझाद मैदानावर आंदोलन करत आहेत. तो आता मुंबईतून संपलाच, तिच परिस्थिती आता उरल्यासुरल्या मराठी माणसाची अवस्था झालेली आहे. त्यामुळे आता तेही एकत्र आलेले दिसत आहेत. त्यातही अहमदाबादहून ट्रेन आणणं सुरु आहे. तिथं हे अदानी मोठं मोठे टॉवर बांधणार आहेत. त्यांना माहितीये की, या लोकांना घरं घेता येणार नाहीत. तिथल्या घरांची किंमती मोठ्या प्रमाणात आहेत, हे सर्व सुरू आहे.  

प्रश्न : याच मुद्द्यामुळे महाराष्ट्र आणि इतर राज्यांमध्ये संघर्ष पेटलेला आहे..

नाही हा संघर्ष पेटलेला नाही. कारण पेटवण्याचा प्रयत्न हे भाजप करतंय पण मुद्दा पेटलेला नाही. कारण आमची भूमिका ही स्पष्ट भूमिका आहे. कारण आमचा हिंदी भाषेला तसेच अन्य भाषेला आमचा काहीही एक विरोध नाही. जसं आपण इतरांवर मराठी लादण्याचा आग्रह धरत नाही, तसं तुम्हीही हिंदी लादण्याचा आग्रह धरू नये. 

प्रश्न : हा मुद्दा बरोबर आहे, गुजरातमध्ये हिंदीची सक्ती नाही? 

बाळासाहेबांनी राज्यात मराठी माणसांसाठी शिवसेनेची स्थापना केली होती. त्यांचा अनेक भाषणांमध्ये उल्लेख आहे की, राज्याचा विचार केला तर मी मराठी आहे. तसेच देशाचा विचार केला तर मी हिंदू आहे. 

हेही वाचा : CM फडणवीस म्हणालेले, 'त्रिभाषा सूत्र लागू करूच..' उद्धव ठाकरेंनी पुन्हा दिलं आव्हान

प्रश्न : महापालिकेच्या निवडणुकीत राज आणि उद्धव एकत्र येणार का? 

यायला काय हरकत नाही. काहींना एकत्र आल्याने पोटशूळ उठलंय. महापालिका निवडणूक जरी असली तरी तुम्ही केवळ मुंबई आणि महाराष्ट्राचा वेगळा विचार करून चालणार नाही. एकत्र विचार करणं गरजेचं आहे. राज्य म्हणून प्रत्येक महापालिकेची स्वायत्त आहे. तिथं प्रत्येक युनिट शिवसेना आणि प्रत्येक पक्षाचा आहे. आता लढायचं तर नक्कीच आहे. महाराष्ट्रात अनेक अमराठी लोक राहतात, पण मी कोरोनाकाळात सर्व पाहिलं आहे. कोणी मुस्लिम होता म्हणून मदत केली नाही, असं झालेलं नाही. एवढंच नाहीतर मी ही हिंदू असल्याने कोरोनाकाळात जरा वेगळं वागवलं होतं. 

प्रश्न : महापालिकेवर शिवसेनेच्या मराठी माणसाचा भगवा ध्वज फडकत आलेला आहे, पण आता ही मुंबई मराठी माणसाच्या हातात राहू नये असा डाव आहे काय सांगाल? 

महापालिकेची निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन मराठी आणि अमराठींना पेटवण्याचा प्रयत्न केला जात आहे. पण त्याने काहीही एक होणार नाही. इथले जे मराठी आणि अमराठी भाषिक लोक आहे ते गुण्यागोविंदाने नांदतात. 


    follow whatsapp