Uddhav Thackeray on Ramdas Kadam, Pune : " बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray Death) यांचे निधन झाल्यानंतर दोन दिवस त्यांचा मृतदेह तसाच ठेवला होता. तसेच बाळासाहेब ठाकरे यांच्या हाताचेही ठसे घेण्यात आले होते. हे ठसे नेमके कशासाठी घेण्यात आले होते?" असा सवाल उपस्थित करत शिंदेंच्या शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर सनसनाटी आरोप केले होते. यावर आता ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुण्यातील पत्रकार परिषदेत प्रत्युत्तर दिलंय.
ADVERTISEMENT
हेही वाचा : रामदास कदमांच्या बायकोने 1993 मध्ये स्वत:ला जाळून घेतलं की कोणी तिला जाळलं? अनिल परब यांचे सनसनाटी आरोप
उद्धव ठाकरे म्हणाले, मी गद्दार आणि नमक हरामांना उत्तर देत नाही. तो माणूस गद्दार आणि नमक हराम आहे. त्याला उत्तर देण्याची मला गरज नाही. कारण ठाकरे म्हणजे काय आहे? हे संपूर्ण महाराष्ट्र आणि देश ओळखतो. त्यामुळे त्या गद्दाराला मी काही उत्तर देणार नाही.
शिव्या देणाऱ्यांपेक्षा आशीर्वाद देणाऱ्यांचे हात महत्त्वाचे
दरम्यान, कधीकाळी सोबत राहिलेले लोक अशा पद्धतीने आरोप करतात तेव्हा त्रास होतो का? असा सवाल पत्रकारांकडून विचारण्यात आला होता. यावर उद्धव ठाकरे म्हणाले, त्रास आणि वेदना होतातच.. पण त्याचवेळेला शिवाजी पार्कमध्ये माझ्या भाषणावेळी पावसात हजारो माणसं भिजत होते. त्यामुळे मी माझं भाषण थांबवू का असं विचारलं त्यावेळी समोरचे लोक म्हणाले, तुम्ही बोला म्हणतात. तेव्हा या वेदनांवर ते रामबाण औषध असतं. शिव्या देणाऱ्यांपेक्षा आशीर्वाद देणाऱ्यांचे हात महत्त्वाचे असतात. ते हात कितीतरी पटींनी माझ्या पाठीशी उभे आहेत. म्हणून तर उभा राहू शकतोय.
हेही वाचा : रामदास कदमांच्या बायकोने 1993 मध्ये स्वत:ला जाळून घेतलं की कोणी तिला जाळलं? अनिल परब यांचे सनसनाटी आरोप
पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, अजून निवडणूक जाहीर झालेली नाही. राज आणि माझ्या दोन तीन वेळेस भेटी देखील झालेल्या आहेत. महापालिकेच्या निवडणुका कशा लढवायच्या? हा प्रश्न महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांनी मिळून सोडवला पाहिजे. कारण लोकसभा आणि विधानसभा आम्ही महाविकास आघाडी म्हणून लढलो. आता सुद्धा शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने महाविकास आघाडी म्हणून लढायला काहीच हरकत नाही. मात्र, त्या व्यतिरिक्त आमची आघाडी आहे. तिन्ही पक्षांना स्वातंत्र्य आहे. वेगळं लढायचं असेल तर वेगळं लढतील. एकत्र लढायचं असेल तर एकत्र लढतील.
इतर महत्त्वाच्या बातम्या
ADVERTISEMENT
