Ujjwal Nikam : देशभरातील प्रसिद्ध असलेले वकील उज्ज्वल निकम यांची राष्ट्रपती नामनिर्देशित खासदार म्हणून राज्यसभेवरती निवड करण्यात आली आहे. राष्ट्रपतींच्या कोट्यातून ही नियुक्ती करण्यात आलेली आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून उज्ज्वल निकम यांना लोकसभेचं तिकीट देण्यात आलेलं होतं.
ADVERTISEMENT
लोकसभेत वर्षा गायकवाड यांच्याकडून पराभव
मात्र, निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. काँग्रेसच्या नेत्या वर्षा गायकवाड या उज्ज्वल निकम यांच्या विरोधात उभ्या होत्या. त्यांनीच उज्ज्वल निकम यांचा पराभव केला होता. मात्र, आता उज्ज्वल निकम यांचा पराभव होऊनही ते खासदार म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
याचसोबत देशाचे माजी परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रृंगला, शिक्षणतज्ज्ञ सी सदानंद मास्ते, शिक्षणतज्ज्ञ मीनाक्षी जैन यांचीही नामनिर्देशित सदस्य म्हणून राज्यसभेवरती नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच मुंबईत झालेल्या 26/11 बॉम्बस्फोटातील दहशतवादी असलेल्या कसाबला फाशीची शिक्षा मिळवून देणारे उज्ज्वल निकमच होते.
संबंधित माहिती ही एएनआय वृत्तमाध्यमाने X ट्विटरद्वारे दिलेली आहे. त्यात उज्ज्वल निकम यांचे राष्ट्रपतंच्या नामनिर्देशातून खासदार म्हणून राज्यसभेवरती निवड करण्यात आल्याची माहिती दिली आहे.
ADVERTISEMENT
