दोन गाड्या, दोन पिस्तूल, चांदीची भांडी... वैष्णवी हगवणे प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई

बावधन पोलिसांनी काल या प्रकरणाशी संबंधित एक थार आणि एक इंडीवर अशा दोन आलिशान गाड्या जप्त केल्या आहेत. पिंपरी-चिंचवड पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.

Mumbai Tak

मुंबई तक

25 May 2025 (अपडेटेड: 25 May 2025, 12:24 PM)

follow google news

Vaishnavi Hagawane Case : वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणी पिंपरी-चिंचवड पोलिसांनी तपासाची गती वाढवली आहे. या प्रकरणात वैष्णवीच्या दोन भावांसह तिच्या एका मैत्रिणीचे असे एकूण तीन साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. तसेच, वैष्णवीला स्त्रीधन म्हणून देण्यात आलेले चांदीचे पाच ताट, पाच तांबे, चार वाट्या आणि एक करंडा अशी भांडी पोलिसांनी जप्त केली आहेत.

हे वाचलं का?

हे ही वाचा >>नाश्ता, मटण, चिकन! वाल्मिक कराडला जेलमध्ये तब्बल 10 हजाराची... तुरुंगातून आलेले रंजीत कासले काय म्हणाले?

बावधन पोलिसांनी काल या प्रकरणाशी संबंधित एक थार आणि एक इंडीवर अशा दोन आलिशान गाड्या जप्त केल्या आहेत. पिंपरी-चिंचवड पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत असून, शशांक आणि राजेंद्र हगवणे यांनी वापरलेल्या सर्व वाहनांचा शोध घेऊन ती जप्त करण्याची प्रक्रिया सुरू आहे, अशी माहिती बावधन पोलिसांनी दिली.

हे ही वाचा >>विकृतीचं टोक गाठलं! तरूणानं शारिरीक भूक भागवण्यासाठी थेट घोड्यावरच... घटना नेमकी काय?

दरम्यान, पोलिसांच्या या कारवाईमुळे प्रकरणाला नवीन वळण मिळाले असून, पुढील तपासात आणखी महत्त्वाचे पुरावे समोर येण्याची शक्यता आहे.

    follow whatsapp