Vidhan Parishad Election : विधानपरिषदेसाठी महाविकास आघाडीत रस्सीखेच, मतांचा कोटा ठरवणार जागा कोणाची?

Vidhan Parishad Election : महाराष्ट्र विधान परिषदेच्या 11 जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे. त्यानुसार 12 जुलै रोजी मतदान होणार असून त्याच दिवशी संध्याकाळी मजमोजणीही पार पडणार आहे. विधानसभा आमदारांनी निवडून दिलेल्या विधान परिषद सदस्यांचा कार्यकाळ येत्या 27 जुलै रोजी संपत असल्यामुळे ही निवडणूक जाहीर झाली आहे.

विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीत रस्सीखेच सुरु झाला आहे.

vidhan parishad election 2024 maha vikas aghadi candidate sharad pawar ncp uddhav thackeray shiv sena ubt congress

ऋत्विक भालेकर

24 Jun 2024 (अपडेटेड: 24 Jun 2024, 11:06 AM)

follow google news

Vidhan Parishad Election : विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीत रस्सीखेच सुरु झाला आहे. लोकसभेत पराभूत झालेल्या उमेदवारांना पुन्हा संधी देण्याचा विचार सूरू असल्याची माहिती समोर आली आहे. उद्धव ठाकरेंच्या (Udhhav Thackeray) शिवसेनेकडून वाट्याला येणाऱ्या एका जागेवर विदर्भाला झुकतं माप देण्याचा विचार सुरु आहे. तर शरद पवार (Sharad Pawar) गटातून युवक पदाधिकाऱ्याला संधी देण्याची शक्यता आहे. आणि कांग्रेसकडून वरिष्ठ नेत्यांना संधी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. (vidhan parishad election 2024 maha vikas aghadi candidate sharad pawar ncp uddhav thackeray shiv sena ubt congress)  

हे वाचलं का?

महाराष्ट्र विधान परिषदेच्या 11  जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे. त्यानुसार 12 जुलै रोजी मतदान होणार असून त्याच दिवशी संध्याकाळी मजमोजणीही पार पडणार आहे. विधानसभा आमदारांनी निवडून दिलेल्या विधान परिषद सदस्यांचा कार्यकाळ येत्या 27 जुलै रोजी संपत असल्यामुळे ही निवडणूक जाहीर झाली आहे.या निवडणुकीसाठी जागांवरून महाविकास आघाडीत रस्सीखेच सुरु असल्याचं चित्र दिसून येत आहे.

हे ही वाचा :18th Lok Sabha Live : एनडीए सरकारची 'परीक्षा'; अधिवेशन वादळी ठरणार

विधान परिषदेच्या रिक्त होत असलेल्या 11 जागांसाठी मतांचा कोटा जागा कोणाला जाणार हे ठरवणार आहेत. या निवडणुकीत लोकसभेत पराभूत झालेल्या उमेदवारांना पुन्हा संधी देण्याचा विचार सूरू असल्याची माहिती समोर आली आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून वाट्याला येणाऱ्या एका जागेवर विदर्भाला झुकतं माप देण्याचा विचार सुरु आहे. त्यामुळे ठाकरे सेनेकडून विदर्भात सुधीर सुर्यवंशी आणि जयदीप पेंडके शर्यतीत आहेत.  

शरद पवार गटातून युवक पदाधिकाऱ्याला संधी देण्याची शक्यता आहे.  शरद पवार ग्रामीण भागातील युवकाला संधी देण्याच्या तयारीत आहेत. कांग्रेसकडून वरिष्ठ नेत्यांना संधी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.काँग्रेस मुंबईतील अल्पसंख्याक चेहरा मैदानात उतरवण्याच्या तयारीत आहे. 

हे ही वाचा : टीम इंडियाचा फायनलचा मार्ग मोकळा, अफगाणिस्तानच्या विजयाने 'असं' बदललं समीकरण

लोकसभा निवडणुकीत महायुतीला अपेक्षित यश मिळालं नाही. त्यामुळे राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गट यांच्यामध्ये अस्वस्थता असल्याचं चित्र आहे. या पार्श्वभूमीवर या निवडणुकीत क्रॉस व्होटींगची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 12 जुलै रोजी यासाठीची मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. तर विजयासाठी 23 मतांचा कोटा निश्चित करण्यात आला आहे.

    follow whatsapp