Ind vs Aus : टीम इंडियाचा फायनलचा मार्ग मोकळा, अफगाणिस्तानच्या विजयाने 'असं' बदललं समीकरण

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

team india final scenario in t20 world cup 2024 afganistan beat australia points table change rain forecast guyana stadium
टीम इंडियाचं फायनलचं तिकीटही कन्फर्म मानलं जात आहे.
social share
google news

Team India Final Scenario in T20 World Cup 2024: कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडीया वर्ल्ड कपमध्ये सध्या उत्कृष्ट कामगिरी करते आहे. टीम इंडियाने अद्याप एकही सामना गमावला नाही. त्यामुळे टीम इंडियाचा आत्मविश्वास चांगलाच दुणावला आहे. त्यात रविवारी दुबळ्या अफगाणिस्तानने बलाढ्य ऑस्ट्रेलियाचा पराभव केल्याने ग्रुप 1 चं समीकरण पुर्णपणे बदलले आहे. विशेष म्हणजे बांग्लादेशच्या (Bangladesh) विजयाने टीम इंडियाचा (Team India) मोठा फायदा झाला आहे. टीम इंडियाचं फायनलचं तिकीटही कन्फर्म मानलं जात आहे. त्यामुळे नेमकं कसं समीकरण बदललं हे जाणून घेऊयात. (team india final scenario in t20 world cup 2024 afganistan beat australia points table change rain forecast guyana stadium) 

रविवारी झालेल्या सामन्यात अफगाणिस्तानने ऑस्ट्रेलियाला पराभूत करून गट-1 चे संपूर्ण समीकरणच बदलून टाकले आहे. या निकालानंतर भारतीय संघाचे उपांत्य फेरीतील (Semi Final) स्थान निश्चित झाले.आणि अफगाणिस्तान, ऑस्ट्रेलियाबरोबरच बांगलादेशसाठीही उपांत्य फेरीचे दरवाजे उघडले आहेत. विशेष म्हणजे अफगाणिस्तानच्या विजयाने टीम इंडियाला मोठी भेट मिळाली आहे. टीम इंडिया गुणतालिकेत अव्वल स्थानी पोहोचली आहे. हे स्थान जर टीम इंडियाने कायम ठेवलं तर त्यांचा फायनलचा मार्ग मोकळा असणार आहे.

हे ही वाचा : 18th Lok Sabha Live : एनडीए सरकारची 'परीक्षा'; अधिवेशन वादळी ठरणार

टीम इंडियाला 27 जून रोजी गयाना येथे उपांत्य फेरीचा सामना खेळायचा आहे. ज्या ठिकाणी त्या दिवशी पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे. अशा परिस्थितीत भारतीय संघाचा उपांत्य फेरीचा सामना पावसामुळे वाहून जाऊ शकतो. जर असे झाले तर गट टप्प्यात अव्वल असलेल्या संघाला फायदा होईल आणि थेट अंतिम फेरीत प्रवेश मिळेल.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

या विश्वचषकात आणखी एक सस्पेन्स आहे. म्हणजेच दुसऱ्या सेमीफायनलसाठी आयसीसीने कोणताही राखीव दिवस ठेवलेला नाही. तर पहिल्या उपांत्य फेरीसाठी राखीव दिवस ठेवण्यात आला आहे. दुसऱ्या उपांत्य फेरीत पाऊस पडल्यास राखीव दिवसाऐवजी त्या सामन्यासाठी 4 तास 10 मिनिटांचा अतिरिक्त वेळ ठेवण्यात आला आहे, जेणेकरून सामना त्याच दिवशी संपुष्टात येईल.

पावसामुळे सामना रद्द झाला तर काय होईल?

पण इथे अडचण अशी आहे की जर पाऊस थांबला नाही तर सामना रद्द करावा लागेल. अशा परिस्थितीत, नियमानुसार, केवळ त्यांच्या गटात अव्वल असलेल्या संघालाच फायदा मिळेल. भारतीय संघाने आपल्या गट-1 मध्ये अव्वल स्थान पटकावले आणि उपांत्य फेरीत प्रवेश केला, तर पावसामुळे सामना रद्द होईल, अशी भीती बाळगण्याची गरज नाही.

ADVERTISEMENT

हे ही वाचा : Chandrakant Patil : ''मी पालकमंत्री असताना अशा घटना घडल्या नाही''

भारताचे गटात अव्वल राहण्याचे समीकरण

जर भारतीय संघाने सुपर-8 च्या शेवटच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव केला तर तो गट-1 मध्ये अव्वल स्थानावर राहून उपांत्य फेरीसाठी पात्र ठरेल.

ADVERTISEMENT

सुपर-8 च्या शेवटच्या सामन्यात भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध हरला तर पराभवाचे अंतर जास्त नसावे याची काळजी घ्यावी लागेल. असे झाल्यास भारतीय संघ शेवटचा सामना गमावल्यानंतरही गट-1 मध्ये अव्वल स्थानावर राहून उपांत्य फेरीसाठी पात्र ठरता येईल.

भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकीपर), संजू सॅमसन, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह, हार्दीक पांड्या आणि मोहम्मद सिराज.

ऑस्ट्रेलिया संघ : मिचेल मार्श (कर्णधार), ॲश्टन आगर, पॅट कमिन्स, टीम डेव्हिड, नॅथन एलिस, कॅमेरॉन ग्रीन, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, ग्लेन मॅक्सवेल, मिचेल स्टार्क, मार्कस स्टॉइनिस, मॅथ्यू वेड, डेव्हिड वॉर्नर आणि ॲडम झम्पा. 

    follow whatsapp

    ADVERTISEMENT