मुंबई महापालिकेत AIMIM पक्षाचे गटनेते झालेले विजय उबाळे कोण आहेत?

Vijay Ubale Profile Story : मुंबई महापालिकेत एमआयएमने 08 जागा जिंकल्या आहेत, नगरसेवकांची नोंदणी केल्यानंतर एमआयएमने विजय उबाळेंची बीएमसीच्या गटनेतेपदी निवड केली आहे. खैरुन्निसा खान यांना प्रभाग समितीवर तर जमीर कुरैशींना स्थायी समितीवर संधी देण्यात आलीय. ओवैसींच्या सूचनेनंतर हा निर्णय घेतल्याचं प्रदेशाध्यक्ष इम्तीयाज जलील यांनी पोस्ट करताना म्हटलंय.

Vijay Ubale Profile Story

Vijay Ubale Profile Story

अतिक शेख

22 Jan 2026 (अपडेटेड: 22 Jan 2026, 05:32 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

मुंबई महापालिकेत AIMIM चा 'हा' नगरसेवक झाला गटनेता

point

कोण आहेत विजय उबाळे?

Vijay Ubale Profile Story : मुंबई महानगरपालिकेत एमआयएम पक्षाच्या गटनेतेपदी हिंदू नगरसेवकाला संधी देत AIMIM चे सर्वेसर्वा  Asaduddin Owaisi यांनी नवा राजकीय डाव टाकलाय. बीएमसी निवडणुकीत एमआयएमने  08 जागा जिंकल्या होत्या. त्यामध्ये वॉर्ड क्रमांक  140 मधून विजय उबाळे हे निवडून आले होते. पेशाने शिक्षक असलेल्या विजय उबाळेंची आता लॉटरी लागलीय. शिक्षक, नगरसेवक आणि थेट मुंबईत एमआयएमचे गटनेते म्हणून निवडले गेलेल्या विजय उबाळेंची चांगलीच चर्चा रंगलीय. खिशात पैसे नसताना निवडणूक लढवणारे विजय उबाळे कोण आहेत? आणि असदुद्दीन ओवैसी यांनी मुस्लिम नगरसेवकाला डावलून हिंदू नगरसेवकाला गटनेता करणं, याचे कोणते राजकीय अर्थ आहेत? तेच आपल्याला या व्हिडिओतून समजून घ्यायचंय.

हे वाचलं का?

मुंबई महापालिकेत एमआयएमने 08 जागा जिंकल्या आहेत, नगरसेवकांची नोंदणी केल्यानंतर एमआयएमने विजय उबाळेंची बीएमसीच्या गटनेतेपदी निवड केली आहे. खैरुन्निसा खान यांना प्रभाग समितीवर तर जमीर कुरैशींना स्थायी समितीवर संधी देण्यात आलीय. ओवैसींच्या सूचनेनंतर हा निर्णय घेतल्याचं प्रदेशाध्यक्ष इम्तीयाज जलील यांनी पोस्ट करताना म्हटलंय. विजय उबाळेंना गटनेतेपदाची संधी देत ओवैसींनी दलित मतांना आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. संभाजीनगर महापालिकेतही एमआयएमने केवळ मुस्लिम मतांच्या भरवश्यावर न राहता अनेक हिंदू उमेदवारांना तिकीटं दिली होती. त्यातले काही उमेदवार निवडूनही आले. तो फॉर्म्यूला ओवैसींनी मुंबईतही वापरला. आगामी विधानसभा निवडणुकीपर्यंत दलित-मुस्लिम समीकरण जुळवण्याचे प्रयत्न एमआयएम करत असल्याचंही सांगितलं जातंय.

हेही वाचा : Govt Job: SBI कडून मोठ्या पदांसाठी भरती, पगाराचा आकडा वाचून थक्कच व्हाल... काय आहे पात्रता?

 एमआयएमच्या गटनेतेपदी निवड झालेले विजय उबाळे नक्की कोण आहेत? 

एमआयएमकडून नगरसेवक आणि त्यानंतर गटनेते झालेले विजय उबाळे हे गोवंडीत खासगी कोंचिग क्लासेस चालवतात. मुंबईच्या सोमैय्या कॉलेजमधून बीएससीची पदवी मिळवल्यानंतर त्यांनी कोचिंग सुरू केली. 2012 सालापासून ते खासगी क्लासेस चालवतात, गणित या विषयावर विशेष हातखंडा असल्याने अनेक विद्यार्थ्यी त्यांच्या वर्गात गर्दी करतात. शिवाजीनगर-मानखुर्दमध्ये शिक्षक म्हणून काम करत असल्याने विजय उबाळे हे विद्यार्थी आणि पालकांमध्ये चांगलेच प्रसिद्ध झाले. जात, धर्म न पाहता काम करणाऱ्या विजय उबाळेंवर असदुद्दीन ओवैसींची नजर पडली.

त्यानंतर 2024 च्या विधानसभा निवडणुकीवेळी विजय उबाळेंनी एमआयएमध्ये प्रवेश केला. त्यानंतर ओवैसींनी त्यांना BMC निवडणूक लढण्याच्या सूचना ओवैसींनी केल्या, परंतु त्यांच्याकडे अर्ज भरताना प्रतिज्ञापत्र तयार करण्यासाठी पैसे नव्हते, मतदानाच्या दोन दिवसांआधी ओवैसींनी जी सभा घेतली, त्यातून विजय उबाळेंच्या निवडीसाठी वातावरण तयार झाल्याचं सांगितलं जातं. विजय उबाळेंनी 16 उमेदवारांना पराभूत करून 4,945 मते मिळवली जी एकुण मतांच्या 20 टक्के इतकी होते. त्यामुळे आता उबाळेंना संधी दिल्याचा एमआयएमला पुढच्या काळात तोटा होणार की फायदा? याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे. 

इतर महत्त्वाच्या बातम्या

मुंबईची खबर: मेट्रो लाइन 2B वरील 'शून्य पूल' पूर्व-पश्चिम मुंबई जोडणार... लवकरच होणार कार्यान्वित!

    follow whatsapp