Dasara Melava: ‘ठाकरेंनी पवार साहेबांकडे दोन माणसं पाठवलेली..’, मुख्यमंत्री पदावरून शिंदेंचा गौप्यस्फोट

रोहित गोळे

• 05:52 PM • 24 Oct 2023

CM Eknath Shinde: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदावरून उद्धव ठाकरे यांच्यावर काही गंभीर आरोप केले आहेत. पाहा एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले.

mumbaitak

mumbaitak

follow google news

Eknath Shinde cm post Uddhav Thackeray: मुंबई: ‘उद्धव ठाकरेंच्या नावाची शिफारस करा म्हणून तुम्ही शरद पवार साहेबांना दोन माणसं पाठवली होती.’ असा गौप्यस्फोट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी मुंबईतील आझाद मैदानावर दसरा मेळाव्यात केला आहे. यामुळे आता नव्या वादाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. यावेळी एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) बरीच टीकाही केली.

हे वाचलं का?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा खळबळजनक दावा

‘ते म्हणाले मी बाळासाहेबांना शब्द दिला.. शिवसैनिकाला मी मुख्यमंत्री बनवणार.. शिवसैनिकाला पालखीत बसवणार.. आम्ही सगळे विचार करू लागलो की, कुठल्या शिवसैनिकाला बसवणार? कोणाला संधी मिळणार.. परंतु हे महाशय टुणकन उडाले आणि टुणकन त्या खुर्चीत जाऊन बसले. सगळं सोडून दिलं.. परत म्हणाले मला कुठे मुख्यमंत्री व्हायचंय.. पवार साहेबांनी सांगितलं..’

हे ही वाचा >> Dasara Melava 2023: ‘त्यांचे तळवे चाटायचं काम तुम्ही…’, CM शिंदेंची ठाकरेंवर जहरी टीका

‘पवार साहेबांकडे (Sharad Pawar) दोन माणसं पाठवली तुम्ही आणि उद्धव ठाकरेंच्या नावाची शिफारस करा म्हणून पवार साहेबांना विनंती केली.. हे काही लपत नसतं.’ असा दावा एकनाथ शिंदे यांनी केला.

‘उद्धव ठाकरेंना 2004 पासून मुख्यमंत्रिपदावर बसायचं होतं, पण…’

‘तुमचं तर 2004 पासूनच बसायचं ठरलं होतं. रामदास भाई आणि गजा भाऊ यांना माहितीच आहे.. 2004 पासून.. सगळ्याच नेत्यांना माहिती आहे. परंतु ते जुगाड लागत नव्हता. जसं विधानसभेचे निकाल आले लगेच त्यांनी सांगितलं की, आम्हाला सगळे दरवाजे उघडे आहेत.’

हे ही वाचा >> Dasara Melava 2023: ‘पुढचं येणारं सरकार एका पक्षाचं नको…’, उद्धव ठाकरेंच्या वक्तव्याने खळबळ

‘अरे तुम्ही युतीत लढले.. कसे काय लगेच दरवाजे उघडले? म्हणून त्यांना मुख्यमंत्री व्हायचं होतं. दाखवायचं नव्हतं. सगळ्यांना त्यांचे चेहरे.. एक चेहरा.. पण त्या चेहऱ्याच्या मागे अनेक चेहरे दडलेले आहेत..’

‘त्यामुळे भोळेपणाने तिकडे आहेत त्यांनी सावध व्हावं.. चेहऱ्यावर जाऊ नका.. अरे पोटातलं पाणी पण हलून दिलं नाही त्यांनी. पोटात एक.. ओठात एक असं आमचं काम नाही. पण मी त्याचा साक्षीदार आहे. अरे शेवटपर्यंत कळू दिलं नाही. चेहऱ्यावर दाखवलं नाही. हीच तरी कमाल आहे. सीतेचं हरण करण्यासाठी साधूचा वेष घेतला होता. पण हे मुख्यमंत्री बनण्यासाठी संधीसाधू बनले.’ असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी अत्यंत जहरी टीका केली.

    follow whatsapp