नवी दिल्ली : माजी भारतीय क्रिकेटपटू सुरेश रैना (Suresh Raina) आणि शिखर धवन (Shikhar Dhavan) यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. सट्टेबाजी आणि मनी लॉन्ड्रिंगशी संबंधित प्रकरणात ईडीने (Enforcement Directorate) दोघांची एकूण 11.14 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली असल्याची माहिती ईडीच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.
ADVERTISEMENT
सुरेश रैना आणि शिखर धवनवर ईडीची मोठी कारवाई
मिळालेल्या माहितीनुसार, हे प्रकरण बेकायदेशीर ऑनलाइन सट्टेबाजी आणि त्यातून कमावलेल्या काळ्या पैशाच्या व्यवहाराशी संबंधित आहे. या प्रकरणात ईडीने आधीपासूनच अनेक ठिकाणी छापे टाकले असून आता चौकशीच्या पुढील टप्प्यात दोन्ही क्रिकेटपटूंच्या आर्थिक व्यवहारांचा तपास करण्यात आला.
सूत्रांच्या माहितीनुसार, ईडीने ऑनलाईन सट्टेबाजी करणारी वेबसाईट 1xBet च्या विरोधात कारवाई करत असताना शिखर धवनची 4.5 कोटींची संपत्ती जप्त केली आहे. तर सुरेश रैनाची 6.64 कोटींची संपत्ती जप्त करण्यात आली आहे. याबाबत एएमएल अन्वये आदेश जारी केले होते.सुरैश रैना आणि शिखर धवन जाणूनबुजून विदेशी संस्थांसोबत मिळून 1xBet आणि सरोगेट्सच्या प्रचारासाठी जाहिराती करत आहेत, अशी माहिती ईडीला मिळाली होती.
या प्रकरणात ईडीने युवराज सिंग, रॉबिन उथप्पा, सोनू सुद, उर्वशी रौतेला, मिमी चक्रवर्ती, अनुष्का हजार यांच्यासह दोन माजी क्रिकेटपटूंची चौकशी केली आहे. ही चौकशी कथित अवैध बेटिंग अॅप प्रकरणात करण्यात आली आहे. या अॅपवर लोकांचे आणि गुंतवणूकदारांचे कोट्यावधी रुपये हडपल्याचा आरोप आहे. शिवाय त्यांनी टॅक्स चोरी केल्याचंही बोललं जात आहे.
या प्रकरणात इतर काही व्यक्ती आणि कंपन्यांचाही समावेश असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. ईडीने या संदर्भात विस्तृत चौकशी सुरू केली आहे. सुरेश रैना आणि शिखर धवन यांनी याप्रकरणी अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र या कारवाईनंतर क्रिकेट क्षेत्रात आणि चाहत्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
ADVERTISEMENT











