मनोज जरांगेंना जीवे मारण्यासाठी 2 कोटींची सुपारी, दोघे पोलिसांच्या ताब्यात, परळीतील नेत्यासह जुन्या सहकाऱ्याने रचला कट

मुंबई तक

2 crores betel nut to kill Manoj Jarange Patil : मनोज जरांगेंना जीवे मारण्यासाठी 2 कोटींची सुपारी, दोघांना अटक, परळीतील नेत्याने अन् जुन्या सहकाऱ्याने रचला कट

ADVERTISEMENT

Manoj Jarange Patil
Manoj Jarange Patil
social share
google news

बातम्या हायलाइट

point

मनोज जरांगेंना जीवे मारण्यासाठी 2 कोटींची सुपारी, दोघांना पोलिसांनी उचललं

point

परळीतील नेत्याने अन् जुन्या सहकाऱ्याने रचला कट

Manoj Jarange Patil, बीड / जालना; योगेश काशीद : मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील यांना जीवे मारण्यासाठी तब्बल दोन कोटी रुपयांची सुपारी दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी जालना स्थानिक गुन्हे शाखेने बीड जिल्ह्यातील दोघांना ताब्यात घेतले असून, त्यांची नावे अमोल खुणे आणि दादा गरुड अशी आहेत. विशेष म्हणजे, ताब्यात घेतलेला अमोल खुणे हा मनोज जरांगे पाटील यांचा जुना सहकारी असल्याचे समोर आले आहे.

मनोज जरांगेंना जीवे मारण्याच्या कटात परळीतील नेत्याचा सहभाग? 

पोलिसांच्या प्राथमिक चौकशीतून समोर आलेल्या माहितीनुसार, परळीतील एका नेत्याने काही कोटी रुपयांची ऑफर देत जरांगे यांच्या हत्येचा कट रचल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या दोघांची कसून चौकशी सुरू आहे. गुन्हे शाखेच्या कारवाईमुळे राजकीय वर्तुळात आणि मराठा आंदोलनाच्या कार्यकर्त्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

हेही वाचा : आमदार संग्राम जगताप यांनी जैन ट्रस्टच्या जागेवर ऑफिस बांधलं का? मंगुबाई व्होरा यांनी मृत्यूपत्रात काय लिहिलं होतं?

दरम्यान, जरांगे यांचे निकटवर्तीय आणि सहकारी गंगाधर काळकुटे यांनाही अज्ञात व्यक्तीकडून जिवे मारण्याची धमकी मिळाली आहे. काळकुटे यांनी स्वतः बीडचे पोलीस अधीक्षक यांची भेट घेऊन या प्रकरणाची सविस्तर माहिती देण्याचा निर्णय घेतला आहे. “या विषयावर मी कोणतेही भाष्य करणार नाही; मनोज जरांगे पाटीलच अधिकृत भूमिका मांडतील,” असे गंगाधर काळकुटे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

हे वाचलं का?

    follow whatsapp