न्यूझीलंडचा माजी क्रिकेटपटू Chris Cairns ची मृत्यूशी झुंज, प्रकृती अत्यंत गंभीर

मुंबई तक

• 01:48 PM • 11 Aug 2021

कॅनबेरा: न्यूझीलंडचा माजी अष्टपैलू ख्रिस केर्न्स हा अचानक बेशुद्ध पडल्यानंतर त्याला काल ऑस्ट्रेलियाची राजधानी कॅनबेरामधील एका रुग्णालयात दाखाल करण्यात होतं. मात्र, अचानक त्याची प्रकृती अधिकच खालावत गेली त्यामुळे सध्या त्याला लाईफ सपोर्ट सिस्टमवर ठेवण्यात आलं आहे. न्यूझीलंड हेराल्डने दिलेल्या वृत्तानुसार, केर्न्सला गेल्या आठवड्यात कॅनबेरामध्ये गंभीर वैद्यकीय आणीबाणीचा सामना करावा लागला. ओरटिक डिसेक्सन याच गंभीर आजाराशी […]

Mumbaitak
follow google news

कॅनबेरा: न्यूझीलंडचा माजी अष्टपैलू ख्रिस केर्न्स हा अचानक बेशुद्ध पडल्यानंतर त्याला काल ऑस्ट्रेलियाची राजधानी कॅनबेरामधील एका रुग्णालयात दाखाल करण्यात होतं. मात्र, अचानक त्याची प्रकृती अधिकच खालावत गेली त्यामुळे सध्या त्याला लाईफ सपोर्ट सिस्टमवर ठेवण्यात आलं आहे.

हे वाचलं का?

न्यूझीलंड हेराल्डने दिलेल्या वृत्तानुसार, केर्न्सला गेल्या आठवड्यात कॅनबेरामध्ये गंभीर वैद्यकीय आणीबाणीचा सामना करावा लागला. ओरटिक डिसेक्सन याच गंभीर आजाराशी तो सध्या झुंज देत आहे. या आजारात शरीराच्या मुख्य धमनीचा आतील थर हा खराब होत जातो.

वृत्तानुसार, ‘सध्या तो ज्या रुग्णालयात दाखल आहे तिथे त्याच्यावर अनेक ऑपरेशन करण्यात आले आहेत. परंतु त्याचे शरीर अपेक्षेप्रमाणे उपचारांना प्रतिसाद देत नाही.’

आपल्या काळातील सर्वोत्तम अष्टपैलूंपैकी एक असलेल्या केर्न्सने 1989 ते 2006 दरम्यान न्यूझीलंडसाठी 62 कसोटी, 215 वडे आणि दोन टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहे. त्याचे वडील लान्स केर्न्स यांनीही न्यूझीलंडचे प्रतिनिधित्व केलं होतं.

2008 मध्ये खेळविण्यात आलेल्या इंडियन क्रिकेट लीगमध्ये केर्न्स खेळला होता. पण यावेळी त्याच्यावर मॅच फिक्सिंगचा आरोप लावण्यात आला होता. दरम्यान, त्यावेळी स्वत:ला निर्दोष सिद्ध करण्यासाठी त्याला अनेक कायदेशीर लढाया लढल्या होत्या. या दरम्यान, त्याने 2012 मध्ये इंडियन प्रीमियर लीगच्या ललित मोदीविरोधात मानहानीचा खटलाही जिंकला होता.

दरम्यान, त्याला आपल्याच संघातील सहकारी क्रिकेटपटू लू व्हिन्सेंट आणि ब्रेंडन मॅक्कुलम यांच्याकडून पुन्हा फिक्सिंगच्या आरोपांना सामोरे जावं लागलं होतं, परंतु लंडनमध्ये प्रदीर्घ काळ चाललेल्या खटल्यामध्ये 2015 साली त्याची निर्दोष मुक्तता करण्यात आली होती.

मराठमोळा माजी क्रिकेटर करणार विराटच्या RCB ला मदत

भ्रष्टाचाराच्या आरोपाशी लढण्याचा त्याच्या जीवनावरही परिणाम झाला आणि एकेकाळी त्याला वकिलांची फी देण्यासाठी चक्का ऑकलंड कौन्सिल येथे ट्रक चालवावे लागले किंवा बस स्टँडची साफसफाई देखील करावी लागली होती.

    follow whatsapp