"नरेंद्र मोदी रात्री झोपत नाहीत, आम्ही त्यांना वेड लावू... आणि ते चाणक्य.." राहुल गांधी का झाले एवढे आक्रमक?

मुंबई तक

• 06:46 PM • 13 Aug 2026

काँग्रेस नेते राहुल गांधींनी पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शाहांवर जोरदार टीका केली. अधिवेशन संपल्यानंतरही राहुल गांधी हे आक्रमक पद्धतीने भाजपवर सातत्याने लक्ष्य करण्याची रणनिती कायम ठेवत असल्याचं दिसून येत आहे.

pm modi doesnt sleep at night we will drive him mad rahul gandhi scathing attack at congress creative conference

Rahul Gandhi

Google CTA

नवी दिल्ली: काँग्रेसचे नेते राहुल गांधीं यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. नवी दिल्लीतील मावळंकर हॉलमध्ये झालेल्या रचनात्मक काँग्रेस अधिवेशनात बोलताना राहुल गांधी म्हणाले, "आमचं काम खूप सोपं आहे. आम्ही त्यांना वेड लावू. मी तुम्हाला सांगतो, नरेंद्र मोदी रात्री झोपत नाहीत. याची अनेक कारणं आहेत, एक मुख्य कारण आहे आणि बाकी छुपी कारणं. तुम्ही अमित शाह यांना पाहिलं. ज्यांना चाणक्य, सरदार पटेल म्हणायचे. ते कुठे पळून गेले? ते 20 दिवस संसदेत प्रवेश करू शकले नाहीत. कारण ते भारताची अभिव्यक्ती पहिल्यांदाच अनुभवत आहेत. त्यांना समजलं आहे की भारत आता स्वतःला व्यक्त करत आहे."

हे वाचलं का?

राहुल गांधींची प्रचंड घणाघाती टीका 

राहुल गांधी पुढे म्हणाले की, 'आपल्या देशातील अनेक लोक या भ्याड शक्तीसमोर भ्याडपणे वागत आहेत. ब्रिटिश राजवटीविरुद्धची त्यांची भूमिका मी समजू शकतो, पण हे लोक म्हणजे विदूषकांचा समूह आहे. तुम्ही त्यांच्याविरुद्ध असं का करत आहात? त्यांना आपल्या तत्त्वज्ञानाचं किंवा इतिहासाचं ज्ञान नाही. जे भारताशी जोडले जाऊ शकत नाहीत, ते भारताला समजू शकत नाहीत.'

हे ही वाचा>> अमित शाह यांची विरोधकांना विनंती, राहुल गांधी थेट आरोप करत काय बोलून गेले?

राहुल गांधी म्हणाले की, 'मोठ्या भांडवलदारांनी RSS चा वापर केला आहे. मिस्टर अंबानी आणि मिस्टर अदानी यांनी RSS ताब्यात घेतली आहे. RSS चे आता अस्तित्वच उरले नाही. आज RSS हे अदानींचे साधन आहे.'

'पूर्वी RSS म्हणजे छोटे व्यापारी, मिठाई विक्रेते, सोनार, लोहार आणि बनिया समाजातील लोक होते. तेच RSS होते. याच लोकांना त्यांनी मारले, त्यांची फसवणूक केली. त्यांनी जीएसटी आणि नोटाबंदी लागू केली. प्रमोद महाजन यांनी RSS मध्ये भांडवल गुंतवले आणि त्यानंतर नरेंद्र मोदी तेच करत आहेत. आज RSS हा अदानींचा नोकर आहे.'

हे ही वाचा>> ‘दाल में काला नहीं, पूरी दाल ही...’, राहुल गांधींचा हल्लाबोल, असं का म्हणाले?

राहुल गांधी पुढे म्हणाले, "मिठी मारणे हे परराष्ट्र धोरण आहे, ही कल्पना त्यांना कुठून सुचली हे मला माहीत नाही." यानंतर राहुल यांनी मंचावर काँग्रेस नेते संदीप दीक्षित यांना मिठी मारली आणि गर्दीला दाखवले. अन् म्हणाले की, आम्ही विदूषकांच्या टोळीला आमचे निर्णय ठरवू देणार नाही."

'पंतप्रधान पत्रकार परिषद घेत नाहीत, असा तुम्ही कधी विचार केला होता का? हे माझ्यासाठी मोठे आश्चर्य होते. मला वाटले होते की,स ही एक मार्केटिंगची रणनीती आहे. मग मी त्यांच्यासोबत खोलीत एका बैठकीला गेलो, आणि मग माझ्या लक्षात आले की ते येऊ शकत नाही.'

"व्यक्ती कोणीही असो, तिची अभिव्यक्ती दडपली जाऊ नये. आणि मला तुम्हाला सांगायचे आहे की, ज्या दिवशी आपण देशातून RSS ची अभिव्यक्ती संपवण्याबद्दल बोलू, त्या दिवशी मी त्यांचे समर्थन करेन. ज्याच्या मनात आहे त्याने आपले मत व्यक्त करावे. त्यानंतर आपण पाहू. जर आम्हाला ते आवडले नाही, तर आम्ही म्हणू, भाऊ, तुम्ही जे म्हणालात ते बरोबर नाही, त्यामुळे वातावरण खराब झाले. तुम्ही ते वेगळ्या पद्धतीने मांडायला हवे होते." असं म्हणत राहुल गांधींनी मोदी-शाहांवर जोरदार टीका केली.