Ind vs Aus Final : भारत फायनलमध्ये हरला, कपिल देव म्हणाले…

प्रशांत गोमाणे

• 08:07 AM • 21 Nov 2023

वर्ल्ड कपमधील पराभवानंतर टीम इंडियाच्या अनेक खेळाडूंना मैदानातच अश्रू अनावर झाले होते. टीम इंडियाच्या (Team India) या वर्ल्ड कप (World cup) पराभवावर आता 1983 चा वर्ल्ड कप विजेता कर्णधार कपिल देवने प्रतिक्रिया दिली आहे.

ind vs aus final odi world cup 2023 kapil dev reaction on team india world cup loss

ind vs aus final odi world cup 2023 kapil dev reaction on team india world cup loss

follow google news

Kapil Dev Reaction on Team India world Cup Loss :वर्ल्ड कपच्या फायनल सामन्यात ऑस्ट्रेलियाने 6 विकेट राखून टीम इंडियाचा पराभव केला. या पराभवानंतर टीम इंडियाचं वर्ल्ड कप जिंकण्याचं स्वप्न भंगलं आहे. यासोबत करोडो भारतीय चाहत्यांची निराशा झाली आहे. या पराभवानंतर टीम इंडियाच्या अनेक खेळाडूंना मैदानातच अश्रू अनावर झाले होते. टीम इंडियाच्या (Team India) या वर्ल्ड कप (World cup) पराभवावर आता 1983 चा वर्ल्ड कप विजेता माजी कर्णधार कपिल देवने प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी कपिल देवने (Kapil Dev) एकाच वाक्यात खेळाडूंमध्ये उत्साह भरलाय. नेमकं ते काय म्हणाले आहेत? हे जाणून घेऊयात. (ind vs aus final odi world cup 2023 kapil dev reaction on team india world cup loss)

हे वाचलं का?

टीम इंडियाच्या वर्ल्ड कपमधील पराभवावर माध्यमांनी कपिल देव यांना प्रतिक्रिया विचारली होती. यावर कपिल देव म्हणाले, तुम्हाला पुढे जावेच लागेल. तुम्ही एक धक्का आयुष्यभर वाहून घेत चालू शकत नाही. तसेच हे चाहत्यांवरही तितकेच अवलंबून आहे. खेळाला पुढे जावचं लागेल. तुम्हाला पुढच्या दिवसाचा विचार करावा लागेल. तुम्ही भूतकाळात गेलेली गोष्ट पूर्ववत करू शकत नाही, असे कपिल देव यांनी टीम इंडियाच्या खेळाडूंना स्पष्ट सांगितले.

हे ही वाचा : World Cup 2027 : पुढचा विश्वचषक होणार खास! कधी, कुठे अन् किती असणार टीम… जाणून घ्या

वर्ल्ड कपमध्ये तुम्ही उत्कृष्ट क्रिकेट खेळलात. फायनलचा अडथळा पार करू शकला नाहीत. पण आता मेहनत करत राहा. ही खरी खिलाडूवृत्ती आहे. आपल्या चुकांमधून जो शिकू शकतो तो खरा खेळाडू आहे…” असा कानमंत्र देखील कपिल देव यांनी टीम इंडियाच्या खेळाडूंना दिला.

हे ही वाचा : Manoj Jarange : “आम्हाला खिंडीत…”, ठाण्यात येऊन जरांगेंनी शिंदे सरकारला ललकारले

दरम्यान या वर्ल्ड कपचा फायनल सामना पाहण्यासाठी कपिल देवला निमंत्रणच देण्यात आले नव्हते. त्यामुळे मोठा वादंग रंगला होता.

    follow whatsapp