Ind vs Aus : विराट कोहली, चेतेश्वर पुजाराने टीम इंडियाचं कसं वाढवलं टेन्शन?

मुंबई तक

• 01:42 AM • 07 Mar 2023

Border gavaskar test series:ऑस्ट्रेलिया विरूद्धचा शेवटचा सामना टीम इंडिया (Team India) येत्या ९ मार्च रोजी अहमदाबादमध्ये खेळणार आहे. हा सामना टीम इंडियासाठी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दृष्टीने महत्वाचा असणार आहे. मात्र या सामन्यापुर्वीच टीम इंडियाचे टेन्शन वाढलं आहे. कारण टीम इंडियाचे दिग्गज खेळाडू खराब फॉर्मचा सामना करत आहे. या त्याच्या कामगिरीचा फटका संघाला बसत आहे. त्यामुळे […]

Mumbaitak
follow google news

Border gavaskar test series:ऑस्ट्रेलिया विरूद्धचा शेवटचा सामना टीम इंडिया (Team India) येत्या ९ मार्च रोजी अहमदाबादमध्ये खेळणार आहे. हा सामना टीम इंडियासाठी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दृष्टीने महत्वाचा असणार आहे. मात्र या सामन्यापुर्वीच टीम इंडियाचे टेन्शन वाढलं आहे. कारण टीम इंडियाचे दिग्गज खेळाडू खराब फॉर्मचा सामना करत आहे. या त्याच्या कामगिरीचा फटका संघाला बसत आहे. त्यामुळे शेवटच्या सामन्यात जर या खेळाडूंची बॅट तळपली नाही, तर टीम इंडियासाठी विजय अशक्य असणार आहे. आता हे खेळाडू कोण आहेत, जे खराब फॉर्मचा सामना करत आहेत, हे जाणून घेऊयात. (ind vs aus test team india virat kohli cheteshwar pujara failed to convert big inning border gavasakar trophy)

हे वाचलं का?

बॉर्डर गावस्कर ट्रॉफी स्पर्धेत टीम इंडियाचा दिग्गज खेळाडू विराट कोहली (virat kohli) आणि चेतेश्वऱ पुजारा (cheteshwar Pujara) सपशेल अपयशी ठरले आहेत. दोघांनाही तीनही सामन्यात मोठी खेळी करता आली नाहीए. त्यामुळे आता चौथ्या आणि शेवटच्या सामन्यात जर या खेळाडूंची बॅट तळपली नाही, तर टीम इंडियासाठी विजय अशक्य असणार आहे. आता नजर टाकूयात या स्टार खेळाडूंच्या आकडेवारीवर…

विराटमध्ये टेस्टमध्ये आऊट ऑफ फॉर्म

विराट कोहली (virat Kohli)या स्पर्धेत फारशी अशी चमकदार कामगिरी करू शकला नाही आहे. गेल्या ५ खेळीत त्याला अर्धशतकही ठोकता आले नाही आहे. या स्पर्धेतील त्याचा सर्वोच्च स्कोर ४४ आहे. या सीरीजमध्ये आतापर्यंत विराट कोहली १२, ४४, २०, २२ आणि १३ च धावा करू शकला आहे. पण त्याच्या टेस्ट कामगिरीला बघायला गेले तर विराट कोहली २०१९ पासून खराब फॉर्ममध्ये आहे. विराटने टेस्टमध्ये शेवटच शतक २०१९ ला बांगलादेशविरूद्ध झळकावले होते. त्यावेळी त्याने १३६ धावांची खेळी केली होती. या खेळीनंतर त्याला टेस्टमध्ये एकही शतक ठोकता आले नाही.

WPL 2023 : मुंबई इंडियन्सची विजयी घोडदौड सुरूच: RCB चा केला दारुण पराभव

विराटने २०१९ नंतर २३ टेस्ट सामने खेळले आहेत. या टेस्ट सामन्यातील ४१ डावात त्याला १०२८ धावाच करता आल्या आहेत. यावेळी त्याला स्ट्राईक रेट २५.७० होता. या दरम्यान त्याच्या बॅटीतून ६ अर्धशतक आले होते. टेस्ट करीअर बद्दल बोलायचे झाले तर त्याने १०७ टेस्ट सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने ४८.१२ च्या स्ट्राईक रेटने ८ हजार २३० धावा केल्या आहेत. यामध्ये त्याने २७ शतक आणि २८ अर्धशतक ठोकली आहेत.

चेतेश्वर पुजाराकडून निराशा

टीम इंडिया अनुभवी टेस्ट क्रिकेटर चेतेश्वर पुजाराने (cheteshwar Pujara) नुकत्याच आपल्या करीअरच्या १०० टेस्ट पुर्ण केल्या आहेत. त्याने शेवटचे शतक बांग्लादेश विरूद्ध ठोकले होते. मात्र बॉर्डर गावस्कर ट्रॉफीत त्याला हवी तशी कामगिरी करता आली नाही आहे. या सीरीजमध्ये पुजाराने ७,०,३१,१,५९ ची खेळी केली आहे. मात्र एक अर्धशतक वगळता इतर कामगिरी निराशाजनक आहे.

WPL Kiran Navgire: सोलापूरच्या पोरीनं बॅटवर लिहलं धोनीचं नाव, ठोकलं अर्धशतक

ऑस्ट्रेलिया विरूद्ध बेस्ट रेकॉर्ड

पुजाराचा ऑस्ट्रेलिया विरूद्धचा रेकॉर्ड खुपच चांगला आहे. ऑस्ट्रेलिया विरूद्ध २३ सामन्यात ४२ डावात ५१.०५ च्या स्ट्राईक रेटने १९९१ धावा केल्या आहेत. या खेळीत त्याने ५ शतक आणि ११ अर्धशतक झळकावली आहेत.

पुजाराने बांगलादेशविरूद्ध शतक झळकावल्यानंतर गेल्या ४ वर्षात एकही शतक ठोकले नाही आहे. पुजाराने आतापर्यंत टेस्ट करीअरमध्ये १०१ टेस्ट सामने खेळले आहेत. यामध्ये ४३.९० च्या स्ट्राईक रेटने त्याने ७ हजार ११२ धावा केल्या आहेत. यामध्ये १९ शतक आणि ३५ अर्धशतकाचा समावेश आहे.

Ind Vs Aus : अहमदाबाद कसोटी सामना पंतप्रधान मोदीही बघायला जाणार, कारण…

दरम्यान टीम इंडियाचा विराट कोहली आणि चेतेश्वर पुजारा हे दोन्हीही खेळाडू टेस्टमध्ये फेल ठरत असल्याने टीम इंडियाची मोठी अडचण झाली आहे. तसेच टीम इंडियाला विजयासाठी मोठी कसरत करावी लागत आहे.चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत टीम इंडिया २-१ ने आघाडीवर आहे. आता तिसरा कसोटी सामना कोण जिंकतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

    follow whatsapp