Team India : दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा, सुर्या-राहुलच्या खांद्यावर मोठी जबाबदारी

प्रशांत गोमाणे

01 Dec 2023 (अपडेटेड: 01 Dec 2023, 03:27 AM)

भारत दक्षिण आफ्रिका दौऱ्यात तीन टी-२०, तीन एकदिवसीय आणि दोन कसोटी सामने खेळणार आहे. या दौऱ्यात रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी बोर्डाला विनंती केली की ते दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर टी-२० आणि वनडे खेळणार नाहीत.

ind vs sa team india squad announced for south africa tour t20 odi rohit sharma virat kohli rest

ind vs sa team india squad announced for south africa tour t20 odi rohit sharma virat kohli rest

follow google news

Team India Squad Announcement : दक्षिण आफ्रिका (South Africa) दौऱ्यासाठी भारतीय संघाची (Team India) घोषणा करण्यात आली आहे. बीसीसीआयचे मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांनी गुरुवारी (३० नोव्हेंबर) दिल्लीतील तिन्ही फॉरमॅटच्या मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा केली. टी-20ची कमान सूर्यकुमार यादवकडे सोपवण्यात आली आहे, तर केएल राहुल एकदिवसीय मालिकेची कमान सांभाळणार आहे. कसोटी संघाची कमान रोहित शर्माकडे सोपवण्यात आली आहे. (ind vs sa team india squad announced for south africa tour t20 odi rohit sharma virat kohli rest)

हे वाचलं का?

भारत दक्षिण आफ्रिका दौऱ्यात तीन टी-२०, तीन एकदिवसीय आणि दोन कसोटी सामने खेळणार आहे. या दौऱ्यात रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी बोर्डाला विनंती केली की ते दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर टी-२० आणि वनडे खेळणार नाहीत. तर मोहम्मद शमीवर सध्या वैद्यकीय उपचार सुरू असून त्याची उपलब्धता फिटनेसवर अवलंबून आहे.

हे ही वाचा : Exit Poll 2023: लोकसभेची सेमीफायनल, पाहा 5 राज्यांचा Poll of Polls, कोणत्या राज्यात कोणाची सत्ता?

वनडे संघात संजू सॅमसन आणि युझवेंद्र चहल यांचे पुनरागमन झाले आहे. रजत पाटीदार, साई सुदर्शन या नव्या चेहऱ्यांचाही संघात संघी मिळाली आहे.युझवेंद्र चहल आणि संजू सॅमसन यांनाही संघात स्थान मिळाले आहे. तर शुभमन गिलला वनडे संघात संधी मिळालेली नाही. सूर्याही वनडे संघातूनही गायब आहे.

जसप्रीत बुमराह आता कसोटी संघाचा उपकर्णधार असेल.तर केएस भरतला कसोटी संघातून वगळण्यात आले आहे. आता कसोटी संघात केएल राहुल आणि इशान किशन हे विशेषज्ञ यष्टीरक्षक आहेत.

टी-२० च्या कर्णधारपदासाठी सूर्यकुमार यादववर पुन्हा एकदा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे,तर उपकर्णधार रवींद्र जडेजा असेल. म्हणजेच रवींद्र जडेजावर पहिल्यांदाच मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. विशेष म्हणजे ऋतुराज गायकवाडचा तिन्ही फॉरमॅटमध्ये समावेश करण्यात आला आहे.

हे ही वाचा :Telangana Exit Poll 2023: तेलंगणचा Poll of Polls, काँग्रेस ठरणार जायंट किलर?

कसोटीसाठी भारतीय संघ:

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, ऋतुराज गायकवाड, इशान किशन (विकेटकीपर), केएल राहुल (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज , मुकेश कुमार, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), प्रसिद्ध कृष्णा.

केएल राहुल वनडे संघाचा कर्णधार झाला

तिसऱ्या वनडेसाठी भारतीय संघ: ऋतुराज गायकवाड, साई सुदर्शन, तिलक वर्मा, रजत पाटीदार, रिंकू सिंग, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, मुकेश कुमार, आवेश खान, अर्शदीप सिंग, दीपक चहर.

सूर्याकडे टी-20 कर्णधारपद

टी-20 सामन्यांसाठी भारतीय संघ: यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल, रुतुराज गायकवाड, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), रिंकू सिंग, श्रेयस अय्यर, इशान किशन (यष्टीरक्षक), जितेश शर्मा (यष्टीरक्षक), रवींद्र जैस्वाल (विकेटकीपर) कर्णधार), वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, दीपक चहर.

भारताच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्याचे वेळापत्रक

10 डिसेंबर 1ला T20, डर्बन
12 डिसेंबर, दुसरी टी२०, पोर्ट एलिझाबेथ
14 डिसेंबर, 3री T20, जोहान्सबर्ग
17 डिसेंबर, पहिला वनडे, जोहान्सबर्ग
19 डिसेंबर, दुसरा वनडे, पोर्ट एलिझाबेथ
21 डिसेंबर, तिसरी वनडे, पारल
26 ते 30 डिसेंबर, पहिली कसोटी, सेंच्युरियन
3 ते 7 जानेवारी, दुसरी कसोटी, जोहान्सबर्ग

    follow whatsapp