IPL 2022 मध्ये कोरोनाचा शिरकाव, दिल्ली विरुद्ध राजस्थान सामना मुंबईला हलवला

दिल्ली कॅपिटल्स संघातील खेळाडू आणि सपोर्ट स्टाफमधील सदस्यांना झालेली कोरोनाची लागण हा सध्या बीसीसीआयसाठी चिंतेचा विषय बनला आहे. टीम सेफर्टला कोरोनाची लागण झाल्यानंतरही दिल्ली विरुद्ध पंजाब सामना ठरलेल्या वेळापत्रकाप्रमाणे मुंबईत खेळवण्यात येतो आहे. परंतू यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून बीसीसीआयने 22 एप्रिलला होणारा दिल्ली विरुद्ध राजस्थान सामना पुण्यावरुन मुंबईला हलवण्यात आला आहे. ? NEWS ?: Wankhede […]

Mumbai Tak

मुंबई तक

• 02:17 PM • 20 Apr 2022

follow google news

दिल्ली कॅपिटल्स संघातील खेळाडू आणि सपोर्ट स्टाफमधील सदस्यांना झालेली कोरोनाची लागण हा सध्या बीसीसीआयसाठी चिंतेचा विषय बनला आहे. टीम सेफर्टला कोरोनाची लागण झाल्यानंतरही दिल्ली विरुद्ध पंजाब सामना ठरलेल्या वेळापत्रकाप्रमाणे मुंबईत खेळवण्यात येतो आहे. परंतू यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून बीसीसीआयने 22 एप्रिलला होणारा दिल्ली विरुद्ध राजस्थान सामना पुण्यावरुन मुंबईला हलवण्यात आला आहे.

हे वाचलं का?

नवीन बदलांनुसार दिल्ली विरुद्ध राजस्थान हा सामना 22 एप्रिलला पुण्याच्या गहुंजे स्टेडीअमऐवजी मुंबईच्या वानखेडे मैदानावर खेळवला जाणार आहे. दिल्ली विरुद्ध पंजाब हा सामनाही पुण्यावरुन मुंबईतील ब्रेबॉन मैदानावर खेळवण्यात येत आहे.

ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू मिचेल मार्शला कोरोनाची लागण झाल्यानंतर त्याला खबरदारीचा उपाय म्हणून हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. यानंतर आज सामना सुरु व्हायला अवघे काही तास शिल्लक असताना टीम सेफर्टची कोरोना चाचणी पॉजिटीव्ह आली होती, ज्यामुळे दिल्लीच्या गोटात चिंतेचं वातावरण पसरलं होतं.

त्यामुळे दिल्लीच्या संघातील खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्यामुळे बीसीसीआयने हा सामना वानखेडे मैदानावर खेळवण्याचं ठरवलं आहे.

    follow whatsapp