Mumbai News: मुंबईतून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. येथील पनवेलच्या कळंबोली परिसरात एका आईने आपल्या 6 वर्षीय निष्पाप मुलीची निर्घृण हत्या केल्याचं वृत्त समोर आलं आहे. खरं तर, आरोपी महिलेला मुलगा हवा होता त्यामुळे आपल्याला मुलगी झाल्याने ती मानसिक तणावात होती. इतकेच नव्हे तर, मुलगी सतत हिंदी भाषेत बोलत असल्यामुळे आरोपीला तिच्या मुलीचा प्रचंड राग यायचा. या प्रकरणी पोलिसांनी सुप्रिया प्रमोद म्हामुनकर (30) या आरोपी महिलेला अटक केली असून शुक्रवारी पनवेल कोर्टात सादर केल्यानंतर तिला 3 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी महिलेला मुलगा हवा होता मात्र तिला मुलगी झाल्याने ती बऱ्याच वर्षांपासून तणावात होती.
ADVERTISEMENT
हिंदीत बोलत असल्यामुळे मुलीची हत्या...
तसेच, मृत मुलगी नेहमी हिंदी भाषेत बोलत असल्यामुळे तिची आई तिला सतत मराठीत बोलण्यासाठी ओरडायची. घटनेच्या दिवशी देखील, पीडिता हिंदीत बोलत होती आणि त्यामुळे संतापलेल्या आईने आपल्या मुलीची गळा दाबून हत्या केली. कळंबोलीच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिलेचं नाव सुप्रिया म्हामुनकर असून तिची पती आयटी इंजीनिअर म्हणून कार्यरत आहे. ती तिच्या पती आणि मुलीसह कळंबोलीच्या सेक्टर-E येथील गुरु-संपल्प सोसायटीमध्ये राहते.
हे ही वाचा: पुणे: प्रेमविवाह केला, पण लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी दोघांचा घटस्फोट... एका रात्रीत असं घडलं तरी काय?
आजारामुळे मृत्यू झाल्याचा आरोपीचा दावा
सुरूवातीला आरोपी महिलेने स्वत:च्या बचावासाठी 23 डिसेंबर रोजी मुलीची तब्येत बिघडल्याने तिचा मृत्यू झाल्याचा दावा केला. त्यामुळे, प्राथमिक दृष्ट्या पीडितेचा आकस्मिक मृत्यू झाल्याचं समोर आलं. मात्र, पनवेल उप-जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांना या प्रकरणासंबंधी संशय आला आणि त्यांनी तातडीने पोलिसांना या घटनेची माहिती दिली. त्यानंतर, पोस्टमॉर्टम रिपोर्ट्सनुसार पीडितेची गळा दाबून हत्या करण्यात आल्याचं उघडकीस आलं.
हे ही वाचा: महाराष्ट्र हादरला, चौथीही मुलगीच झाल्याने विकृत बापाने चिमुकलीला क्रूरपणे संपवलं, डोक्यात लाकडी पाट घातला
महिलेच्या पतीने सगळंच सांगितलं...
शुक्रवारी पोलिसांनी आरोपीची कठोर चौकशी केली असता महिलेने आपल्या मुलीचं तोंड आणि नाक बंद करून तिची हत्या केल्याचं कबूल केलं. चौकशीत पुढे तिने सांगितलं की, तिला मुलगा हवा होता पण त्यांना मुलगी झाली आणि याच रागातून तिने आपल्या अल्पवयीन मुलीची हत्या केली. पोलिसांनी या प्रकरणाची माहिती देताना सांगितलं की, आरोपी महिलेचा पती प्रमोद याच्या म्हणण्यानुसार, 2019 मध्ये ते पालीतील रायगड येथे राहत होते आणि त्यांची मुलगी एका महिन्याची होती. त्यावेळी सुद्धा आरोपी महिलेने मुलीची गळा दाबून तिला मारून टाकण्याचा प्रयत्न केला होता.
ADVERTISEMENT











