क्रिकेटपटू चेतेश्वर पुजाराच्या मेहुण्याची आत्महत्या, बलात्काराचा गुन्हा होता दाखल, हादरवणारी घटना

cheteshwar pujara brother in low suicide : टीम इंडियाचा क्रिकेटपटू चेतेश्वर पूजाराचा मेहुणा रसिकभाई पाबारी वय (28) याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेनं पाबारी कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

Jeet Pabari brother-in-law of indian cricketer cheteshwar pujari committed suicide

Jeet Pabari brother-in-law of indian cricketer cheteshwar pujari committed suicide

मुंबई तक

26 Nov 2025 (अपडेटेड: 26 Nov 2025, 09:32 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

क्रिकेटपटू चेतेश्वर पूजाराचा मेहुणा रसिकभाई पाबारीनं उचललं टोकचं पाऊल

point

नेमकं काय घडलं?

Cheteshwar Pujara brother in low suicide : टीम इंडियाचा क्रिकेटपटू चेतेश्वर पूजाराचा मेहुणा रसिकभाई पाबारी वय (28) याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेनं पाबारी कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. आत्महत्येनंतर त्याला रुग्णालयात नेण्यात आले असता, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. 26 नोव्हेंबर रोजी ज्या तरुणीसोबत विवाह ठरला होता, तिनेच मालवीय नगर पोलीस ठाण्यात रसिकभाई पाबारी विरोधात बलात्काराची तक्रार दाखल केली. यानंतर काहीच तासांमध्ये त्याने टोकाचं पाऊल उचललं. दरम्यान, रसिकभाई पाबारी हा सध्या गुजरातमधील राजकोट येथील मालवीयनगर येथील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे.

हे वाचलं का?

हे ही वाचा : तरुणीने प्रेमविवाह केल्यानं कुटुंबियांचा संताप, काकासह भावाने गळा दाबून संपवलं, नंतर तिचे कपडे काढून... रेल्वे ट्रॅकवर...

जीतने टोकाचं पाऊल उचलण्यामागचं कारण काय? 

 

रसिकभाई पाबारीच्या होणाऱ्या पत्नीने आरोप केला होता की, जीतने तिला विवाहाचं वचन दिलं होतं, पण नंतर तिच्याशी शारीरीक संबंध ठेवले होते. त्यानंतर त्याने तक्रारीत म्हटलं की, लग्नानंतर त्याचे संबंध होते, पण नंतर त्यांनी लग्न मोडले. दरम्यान, या प्रकरणात घटनेची माहिती मालवीय पोलिसांना मिळताच पोलिसांनी तपास सुरु केला असता, जीतच्या घरी सुसाईड नोट सापडली नाही. प्राथमिक तपासातून जीत बऱ्याच काळापासून नैराश्यात येऊन त्रस्त झाला असल्याने जीतने टोकाचं पाऊल उचललं. 

हे ही वाचा : कोल्हापूरच्या पुरुषावर पुण्यात अत्याचार, महिलेने गुंगीचं औषध देऊन डाव साधला अन्...

चेतेश्वर पूजाराचे सासरचे लोक मूळचे जामजोधपूरचे आहेत, परंतु कुटुंब हे गेल्या काही वर्षांपासून राजकोट येथे राहत आहेत. तसेच त्यांचा कॉटन जिनिंगचा व्यवसाय आहे. तसेच चेतेश्वर पुजाराची पत्नी पूजाला एक लहान भाऊ आणि एक बहीण आहे. पूजाचा जन्म हा गोंडल येथे झाला, तिने इयत्ता दहावीपर्यंतचे शिक्षण अबूमधील सोफिया शाळेत घेतलं.  नंतर पुढील अकरावी आणि बारावीचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी तिनं अहमदाबाद गाठली. नंतर पीजीचे शिक्षण घेण्यासाठी ती मुंबईत आली. 

    follow whatsapp