Viral Video: आरारारारा खतरनाक! 6,4,4,6,4,6.. 'या' धडाकेबाज फलंदाजाने कायल मेयर्सला धू-धू-धुतलं

Nural Hasan Batting Viral Video : बांगलादेश प्रीमियर लीग 2025 चा 13 वा सामना गुरुवारी 9 जानेवारीला फॉर्च्यून बरिशल आणि रंगपूर रायडर्स यांच्यात रंगला. या सामन्यात रंगपूरच्या संघाचा धडाकेबाज फलंदाज आणि कर्णधार नुरल हसनने चौकार-षटकारांचा पाऊस पाडला.

Nurul Hasan Batting Video Viral

Nurul Hasan Batting Video Viral

मुंबई तक

10 Jan 2025 (अपडेटेड: 10 Jan 2025, 03:28 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

रंगपूर रायडर्सला तीन विकेट्सने मिळाला विजय

point

नुरुल हसनने मैदानात पाडला चौकार-षटकारांचा पाऊस

point

कायल मेयर्सच्या षटकात कुटल्या 30 धावा, पाहा व्हिडीओ

Nural Hasan Batting Viral Video : बांगलादेश प्रीमियर लीग 2025 चा 13 वा सामना गुरुवारी 9 जानेवारीला फॉर्च्यून बरिशल आणि रंगपूर रायडर्स यांच्यात रंगला. या सामन्यात रंगपूरच्या संघाचा धडाकेबाज फलंदाज आणि कर्णधार नुरुल हसनने चौकार-षटकारांचा पाऊस पाडला. रंगपूरचा संघ या सामन्यात पराभवाच्या छायेत असताना नुरलने धावांचा डोंगर रचला आणि या सामन्यात रंगपूरचा दणदणीत विजय झाला. परंतु, फॉर्च्यूनच्या संघाकडून कायल मेयर्सने 20 वे षटक टाकलं. यावेळी नुरुलने मेयर्सची धुलाई करत एकाच षटकात 30 धावा कुटल्या.

हे वाचलं का?

फॉर्च्यून बरिशल संघाकडून कायल मेयर्सने टाकलेली इनिंगची शेवटची ओव्हर खूप महाग पडली. नुरुल हसनने या षटकात तीन चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने एकूण 30 धावा कुटल्या. या धावांच्या जोरावर रंगपूर रायडर्सने फॉर्च्युन बरिशल संघावर विजय मिळवला. नुरुलने मेयर्सच्या या षटकातील पहिल्या, चौथ्या आणि सहाव्या चेंडूवर षटकार ठोकला. तर दुसऱ्या, तिसऱ्या आणि पाचव्या चेंडूवर चौकार ठोकण्यात हसनला यश आलं.

हे ही वाचा >> S. N. Subrahmanyam : "90 तास काम करा, बायकोकडे किती बघत बसणार...", L & T चे सर्वेसर्वा सुब्रमण्यम यांचं वक्तव्य

रंगपूर रायडर्सला तीन विकेट्सने मिळाला विजय

सिलहटमध्ये नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करणाऱ्या फॉर्च्युन बरिशलच्या संघाने 20 षटकांमध्ये 5 विकेट्स गमावून 197 धावा केल्या. संघासाठी तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करून कायल मेयर्सने 29 चेंडूत 210.34 च्या स्ट्राईक रेटने 61 धावांची नाबाद अर्धशतकी खेळी केली. याशिवाय कर्णधार तमीम इकबालने 34 चेंडूत 40 आणि नजमुल हुसैन शान्तोने 30 चेंडूत 41 धावांचं योगदान दिलं.

हे ही वाचा >> Mumbai : विद्यार्थीनीने बुटाच्या लेसने बाथरूमध्येच स्वत:ला संपवलं, मुंबईतील मोठ्या शाळेतील धक्कादायक घटना

सामन्यादरम्यान पाकिस्तानी फलंदाज इफ्तिखार अहमद आणि खुशदिल शाहने अप्रतिम फलंदाजी केली. या दोन्ही खेळाडूंनी अनुक्रमे 48-48 धावा केल्या. इफ्तिखार आणि खुशदिलने चांगली खेळी केली. परंतु, कर्णधार नुरुलने  संघाला विजय मिळवून देण्याचं काम केलं. नुरुलने सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करून 457.14 च्या स्ट्राईक रेटने नाबाद 32 धावा केल्या. 

    follow whatsapp