CSK, IPL; ‘…नाहीतर कर्णधारपदच सोडून देईन’, एमएस धोनीचा गोलंदाजांना इशारा

मुंबई तक

04 Apr 2023 (अपडेटेड: 04 Apr 2023, 08:24 AM)

लखनौसमोर गोलंदाजी करताना चेन्नईच्या गोलंदाजांनी एकूण 18 अतिरिक्त धावा दिल्या. त्यामुळे गोलंदाजांवर धोनी बरसला. “आमच्या गोलंदाजांना आणखी सुधारावे लागेल. गोलंदाजांना वाइड आणि नो बॉलमध्ये काम करावं लागेल. मी त्यांना दुसऱ्यांदा इशारा देत आहे. अन्यथा त्यांना दुसर्‍या कर्णधाराचा सामना करावा लागेल.” त्याच्या नेतृत्वाखाली खेळण्यासाठी तयार रहा.”, असा थेट इशारा त्याने दिला.

mahendra singh dhoni angree on csk bowler

mahendra singh dhoni angree on csk bowler

follow google news

Indian primer league 2023: आयपीएलच्या चालू 16 व्या मोसमात, चेन्नई सुपर किंग्जने त्यांच्या घरच्या मैदानावर चेपॉक स्टेडियमवर चार वर्षांनंतर विजयाची नोंद करून चाहत्यांची मने जिंकली. धोनीच्या नेतृत्वाखाली लखनौ सुपर जायंट्सने पहिल्या सामन्यात 217 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात केएल राहुलच्या नेतृत्वाखालील संघ केवळ 205 धावाच करू शकला आणि 12 धावांनी पराभूत झाला. चेन्नईच्या पहिल्या विजयानंतर संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी मात्र गोलंदाजांवर नाराज दिसला आणि त्याने इशारा दिला. (Otherwise I will give up the captaincy”, MS Dhoni’s warning to the bowlers)

हे वाचलं का?

IPL : धोनीचा आणखी रेकॉर्ड! गेल, कोहली, डिव्हिलियर्सच्या क्लबमध्ये केली एन्ट्री

गोलंदाजांवर चिडला धोनी

लखनौसमोर गोलंदाजी करताना चेन्नईच्या गोलंदाजांनी एकूण 18 अतिरिक्त धावा दिल्या. ज्यामध्ये 13 वाईड, तीन नो बॉल आणि दोन लेग बाय यांचा समावेश होता. त्यामुळे गोलंदाजांवर धोनी बरसला. म्हणाला की, “आमच्या गोलंदाजांना आणखी सुधारावे लागेल. गोलंदाजांना वाइड आणि नो बॉलमध्ये काम करावं लागेल. मी त्यांना दुसऱ्यांदा इशारा देत आहे. अन्यथा त्यांना दुसर्‍या कर्णधाराचा सामना करावा लागेल.” त्याच्या नेतृत्वाखाली खेळण्यासाठी तयार रहा.”, असा थेट इशारा त्याने दिला.

तुषारने तीन नो बॉल टाकले

चेन्नईकडून लखनौविरुद्ध तुषार देशपांडेने सर्वाधिक वाईड आणि नो बॉल टाकला. लखनौविरुद्धच्या सामन्यात तुषारने चार वाईड आणि तीन नो बॉल फेकले. तर दीपक चहरने 5 वाइड आणि राजवर्धन हंगरगेकरने तीन वाइड आणि मोईन अलीने सर्वात कमी एक वाइड बॉल टाकला. त्यामुळेच विजयानंतर धोनी चेन्नईच्या गोलंदाजांच्या कामगिरीवर नाराज दिसला आणि त्याने इशाराही दिला.

IPL 2023 : चरणस्पर्श! धोनी समोर येताच अरिजीत सिंग पडला पाया, चाहत्यांची जिंकली मनं

चेन्नईने दुसऱ्या सामन्यात पहिला विजय मिळवला

याशिवाय धोनी पुढे म्हणाला, “माझ्या मते, गेल्या पाच-सहा वर्षांतील आमचा हा पहिलाच परफेक्ट खेळ होता. मला आधी वाटले होते की विकेट स्लो असेल पण हा सामना खूप जास्त धावा करणारा ठरला. धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नईला पहिल्या सामन्यात गुजरातविरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले होते. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात चेन्नईने चार वर्षांनंतर घरच्या मैदानावर खेळत IPL 2023 मध्ये विजयाचे खाते उघडले.

MS Dhoni : याला म्हणतात फिटनेस! 41 वर्षीय धोनीच्या बायसेप्सची चर्चा, Photo पाहिलेत का?

    follow whatsapp