Rishabh Pant : पंत अजूनही ICU मध्येच, रोहितने डॉक्टरांशी केली चर्चा

मुंबई तक

• 04:12 AM • 01 Jan 2023

Rishabh Pant Health Latest News : टीम इंडियाचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत कार अपघातात जखमी झाल्यामुळे सध्या रुग्णालयात उपचार घेत आहे. 25 वर्षीय ऋषभ पंतची मर्सिडीज कार देहरादून राष्ट्रीय महामार्गावर दुभाजकावर आदळून अपघातग्रस्त झाली होती. पंत अपघातात गंभीर जखमी झालेला असून, त्यांच्या तब्येतीबद्दल डॉक्टरांकडून अपडेट देण्यात आलीये. (rishabh pant latest health update and medical condition) […]

mumbaitak

mumbaitak

follow google news

Rishabh Pant Health Latest News : टीम इंडियाचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत कार अपघातात जखमी झाल्यामुळे सध्या रुग्णालयात उपचार घेत आहे. 25 वर्षीय ऋषभ पंतची मर्सिडीज कार देहरादून राष्ट्रीय महामार्गावर दुभाजकावर आदळून अपघातग्रस्त झाली होती. पंत अपघातात गंभीर जखमी झालेला असून, त्यांच्या तब्येतीबद्दल डॉक्टरांकडून अपडेट देण्यात आलीये. (rishabh pant latest health update and medical condition)

हे वाचलं का?

घरी निघालेल्या ऋषभ पंतच्या कारचा पहाटे 5.15 वाजता अपघात झाला होता. त्याला जबर मार लागलेला आहे. ऋषभ पंतच्या डोकं, पाठ आणि पायाला गंभीर जखमा झालेल्या आहेत. त्याच्यावर सध्या देहरादून येथील मॅक्स हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

डॉक्टरांनी दिलेल्या ताज्या माहितीनुसार ऋषभ पंतच्या प्रकृतीत पूर्वीपेक्षा जास्त सुधारणा झाली आहे. त्याचबरोबर पंतला दुसऱ्या रुग्णालयात दाखल करण्याबद्दल कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. तब्येतीत सुधारणा झाली असली, तरी ऋषभ पंत अजूनही आयसीयूमध्येच आहे. पंतच्या मित्रांनी त्याच्या भेटीनंतर ही माहिती दिली.

रोहित शर्माने डॉक्टरांशी केली चर्चा

दरम्यान, भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने ऋषभ पंतवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांशी संवाद केल्याची माहिती समोर आलीये. इनसाईड स्पोर्ट ने दिलेल्या वृत्तानुसार रोहित शर्माने पंतवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी चर्चा केली. रोहित शर्मा सध्या मालदीवमध्ये आहे.

रुग्णालयात कुटुंबियांसोबत असलेल्या उमेश कुमार यांनी पीटीआयशी बोलताना सांगितलं की, “ऋषभ पंतला दुसऱ्या रुग्णालयात हलवण्याबाबत कोणताही विचार नाही. पंतच्या तब्येतीत सुधारणा झाली आहे. पंतच्या कपाळावर शुक्रवारीच प्लास्टिक सर्जरी करण्यात आली. पहिली ड्रेसिंगही शनिवारी झाली. बीसीसीआयचे डॉक्टर मॅक्स रुग्णालयाच्या डॉक्टरांच्या संपर्कात आहेत आणि पंतला दुसरी रुग्णालयात दाखल करण्याची गरज आहे की नाही, याचा निर्णय घेतील.”

ऋषभ पंतच्या तब्येतीकडे बीसीसीआयचंही लक्ष

दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट संघाचे संचालक श्याम शर्मा, बॉलिवूड अभिनेते अनिल कपूर आणि अनुपम खेर यांनी मॅक्स हॉस्पिटलमध्ये जाऊन ऋषभ पंतची भेट घेतली. शर्मा यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की, “डॉक्टरांकडून पंतवर चांगल्या पद्धतीने उपचार केले जात आहेत. बीसीसीआयही डॉक्टरांच्या संपर्कात असून, तब्येतीबद्दल माहिती घेत आहे. सध्या तरी पंतला इथेच ठेवलं जाणार आहे. बीसीसीआयचे सर्व डॉक्टर पंतवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांच्या संपर्कात आहेत.”

    follow whatsapp