Champions Trophy 2025: सॅमसनपासून 'सूर्या'पर्यंत..'या' 5 खेळाडूंचं चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्याचं स्वप्न अधुरचं, कारण काय?

Champions Trophy 2025 Team India Squad : चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साठी भारतीय क्रिकेट संघात कोण कोणत्या खेळाडूंचा समावेश केला जाईल? असा सवाल तमाम क्रिकेट चाहत्यांना पडला होता.

Team India Squad For Champions Trophy 2025

Team India Squad For Champions Trophy 2025

मुंबई तक

• 05:42 PM • 19 Jan 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

स्टार खेळाडूंना चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 खेळण्याची संधी मिळाली नाही

point

चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 खेळण्याचं स्वप्न अधुरचं, कारण काय?

point

असा आहे ICC चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साठी भारतीय संघ

Champions Trophy 2025 Team India Squad : चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साठी भारतीय क्रिकेट संघात कोण कोणत्या खेळाडूंचा समावेश केला जाईल? असा सवाल तमाम क्रिकेट चाहत्यांना पडला होता. परंतु, क्रिकेटप्रेमींची ही प्रतिक्षा अखेर संपली असून आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आलीय. तर अनेक खेळाडूंचा चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 खेळण्याचं स्वप्न अधुरचं राहिलं आहे. कोणत्या खेळाडूंना आगामी टूर्नामेंटमध्ये भारतीय संघाकडून खेळण्याची संधी मिळाली नाही, याबाबत जाणून घेऊयात सविस्तर माहिती.

हे वाचलं का?

1) संजू सॅमसन

टीम इंडियाचा स्टार विकेटकीपर-फलंदाज संजू सॅमसनच्या पदरी पुन्हा एकदा निराशाच पडली आहे. वर्ल्डकप 2023 आणि टी-20 वर्ल्डकप 2024 पासून बाहेर राहणाऱ्या 30 वर्षीय खेळाडूला चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 खेळण्याची संधी मिळाली नाही. हे खूप आश्चर्यकारक असल्याचं चाहत्यांचं म्हणणं आहे.

2) सूर्यकुमार यादव

भारतीय टीमसाठी टी-20 वर्ल्डकप 2024 मध्ये अप्रतिम कामगिरी करणारा टी-20 कर्णधार सूर्यकुमार यादवलाही चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 खेळण्याची संधी मिळाली नाही. तसं पाहिलं तर हे खूप आश्चर्यकारक नाहीय. कारण चॅम्पियन्स ट्रॉफी वनडे फॉर्मेटमध्ये होणार आहे. या फॉर्मेटमध्ये सूर्यकुमारने खूप खास कामगिरी केली नाहीय.

हे ही वाचा >> Dhananjay Munde: "मला ठरवून टार्गेट केले जात आहे, पण मी..."; धनंजय मुंडेंनी विरोधकांना दिला इशारा

3) मोहम्मद सिराज

टीम इंडियाच वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजलाही चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 खेळण्याची संधी मिळाली नाही. नुकत्याच पार पडलेल्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफीत त्याला खूप संघर्ष करावा लागला. याच कारणामुळे सिराजची भारतीय संघाच्या स्क्वॉडमध्ये निवड झाली नाहीय. वेगवान गोलंदाज म्हणून शमीचं पुनरागमन झालं आहे. जसप्रीत बुमराह आणि अर्शदीप सिंग या गोलंदाजांचाही यात समावेश आहे.

4) नितीश कुमार रेड्डी

टीम इंडियाचा युवा ऑलराऊंडर नितीश कुमार रेड्डीलाही आगामी टूर्नामेंटमध्ये संधी मिळाली नाही. बॉर्डर गावसकर ट्रॉफीत अप्रतिम कामगिरी केल्यानंतर रेड्डीला टीम इंडियाच्या 15 सदस्यीय संघात संधी मिळेल, अशी आशा व्यक्त केली जात होती. परंतु, त्याच्याही पदरी निराशाच पडली.

हे ही वाचा >> Ladki Bahin Yojana : जानेवारीत 'या' महिलांना मिळणार नाहीत 1500 रुपये! यादीतून नाव कट होण्याचं कारण काय?

5) वरुण चक्रवर्ती

घरच्या मैदानात चमकदार कामगिरी केल्यानंतरही वरुण चक्रवर्तीला चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साठी टीम इंडियाच्या स्क्वॉडमध्ये सामील केलं नाही. त्याच्या जागेवर टीमने मुख्य फिरकीपटू म्हणून कुलदीप यादवची निवड केलीय.

ICC चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साठी भारतीय संघ

रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, शुभमन गिल (उप-कर्णधार), केएल राहुल, श्रेयस अय्यर, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, वॉशिंगटन सुंदर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह , मोहम्मद शमी, अर्शदीप सिंह, यशस्वी जैस्वाल, ऋषभ पंत आणि रवींद्र जडेजा.

    follow whatsapp